Home » Trump And Zelensky : ट्रम्प झेलेन्स्की वादामागचा खजिना !

Trump And Zelensky : ट्रम्प झेलेन्स्की वादामागचा खजिना !

by Team Gajawaja
0 comment
Trump And Zelensky
Share

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यात ओव्हल ऑफिसमध्ये झालेले वाद अवघ्या जगानं बघितले. अमेरिकेसारख्या देशाबरोबर झेलेन्स्की यांनी घेतलेले हे वैर आता कुठे पर्यंत जाणार याची चर्चा सुरु झाली आहे. वास्तविक रशिया आणि युक्रेन यांचे युद्ध सुरु झाले तेव्हा युक्रेनला अवघ्या काही दिवसात रशिया नमवणार अशी चर्चा होती. मात्र जर्मन, अमेरिका, फ्रान्स या देशांकडून मिळालेल्या मदतीनं हे युद्ध दिर्घकाळ चालू आहे. युक्रेनचा पूर्णपणे पाडाव करण्यात रशिया अपयशी ठरले आहे. यामागे युक्रेनच्या मागे असलेला अमेरिकेचा हात स्पष्टच आहे. पण आता झेलेन्स्की यांनी याच अमेरिकेला दुखवले आहे. राष्ट्राध्यक्षपदी येताच ट्रम्प यांनी युक्रेनला देण्यात येत असलेल्या मदतीवर आक्षेप घेतले होते. (Trump And Zelensky)

जगात शांतता नांदायला हवी, यासाठी युद्ध बंद होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. रशियाच्या दौ-यावर ट्रम्प पुढच्या काही दिवसात जाणार आहेत. त्याआधी त्यांची आणि झेलेन्स्की यांची ही भेट महत्त्वाची होती. मात्र या भेटीत दोन्हीही नेत्यांमध्ये जाहीरपणे झालेल्या वादानंतर शांतता करार बिघडला आहे. ओव्हल ऑफिसमध्ये डोनाल्ड ट्रम्प आणि व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्यात पत्रकारांसमोर वाद झालाच. शिवाय उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी झेलेन्स्की यांच्यावर अमेरिकेचा अपमान केल्याचा आरोपही केला. झेलेन्स्की या प्रकारानंतर व्हाईट हाऊसमधून जेवण न करताच बाहेर निघाले. किंबहुना त्यांना बाहेर काढण्यात आले. या सर्वांनंतर आता युक्रेनचे भविष्य काय असेल, याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र या सर्वात एक महत्त्वाचा विषय दुर्लक्षित झाला, तो म्हणजे, युक्रेनमध्ये असलेला खनिजांचा साठा. झेलेन्स्की यांना व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रण फक्त याच खनिजांच्या साठ्यामुळे मिळालं होतं. (International News)

यासंदर्भातच वाटाघाटी करण्यासाठी झेलेन्स्की वॉशिंग्टन डीसीच्या दौऱ्यावर होते. हे खनिजांचे साठे ज्या देशाकडे असतील, त्या देशाला जगावर पुढची दोनशे वर्ष तरी राज्य करता येणार आहे. कारण यात लिथियम या खनिजाचा समावेश आहे. याच लिथियमच्या साठ्यामुळे आता युक्रेनला महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवाय युक्रेनवर कुठला देश वर्चस्व मिळवतोय, याची स्पर्धाही सुरु झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीपासूनच खनिज पदार्थांचा उपसा झाला पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे. त्यात युक्रेनमधील खनिज पदार्थांचाही समावेश आहे. याच खनिज पदार्थांच्या साठ्यावरील मालकी हक्कावरही ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यात चर्चा होणार होती. करारावर स्वाक्ष-याही होणार होत्या. मात्र या पूर्वीच झेलेन्स्की यांनी व्हाईट हाऊस सोडले. आता युक्रेनमधील या खनिज साठ्यांवर वर्चस्व मिळणवण्यासाठी अमेरिका काय भूमिका घेणार याकडे अवघ्या जगाचे लक्ष लागले आहे. (Trump And Zelensky)

या दोन देशातील वादात खनिज पदार्थांची मोठी भूमिका असणार आहे. युक्रेन हा खनिजांबाबत सर्वात श्रीमंत देश समजला जातो. युरोपच्या एकूण लिथियम साठ्यापैकी 20% लिथियम युक्रेनमध्ये आहे. हे लिथियम इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरी आणि ऊर्जा साठवणुकीसाठी महत्त्वाचे असते. याव्यतिरिक्त, लिथियम जगातील सर्वात मोठ्या टायटॅनियम उत्पादकांपैकी एक आहे. अवकाश आणि लष्करी उपकरणातही त्याचा मोठा वापर होतो. या लिथियमची आता सर्वाधिक गरज अमेरिकेला आहे. त्यामुळेच झेलेन्स्की यांनी अमेरिकेसमोर झुकण्याचे मान्य केले नाही. या वादानंतर अवघ्या युरोपमध्ये दोन भाग पडले आहेत. झेलेन्स्की यांना पाठिंबा देणा-या देशांची संख्याही मोठी आहे. वास्तविक हे देश झेलेन्स्की यांना पाठिंबा देत असले तरी त्यांचीही नजर युक्रेनमधील लिथियमच्या साठ्यांवर आहे. (International News)

=============

हे देखील वाचा : Indrajeet Sawant : मार्टिनची डायरी आणि कोरटकर-सावंत वाद का घडला ?

Mahakumbh : प्रयागराज महाकुंभाची ‘इतिश्री’

=============

या वादानंतर युक्रेनला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण आतापर्यंत युक्रेनला अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रांची मदत होत असे. ही मदत थांबली तर रशिया कधीही युक्रेनचा पाडाव करु शकतो. शिवाय या सर्व शस्त्र पुरवठ्यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप ट्रम्प यांनी निवडणूक प्रचारादरम्यान केला होता. आता त्यांनी या घोटाळ्याचा शोध अधिक जलद गतीनं करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांचे विश्वासू एलॉन मस्क यांच्या नेतृत्वाखाली या सर्व व्यवहाराची चौकशी होत आहे. याशिवाय झेलेन्स्की युक्रेनच्या नाटोमधील प्रवेशासाठी प्रयत्नशील आहेत. ट्रम्प आता या प्रवेशाला विरोध कऱण्याची शक्यता आहे. ट्रम्प आता झेलेन्स्की बाबत काय भूमिका घेतात याकडे जगाचे लक्ष आहे. (Trump And Zelensky)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.