Home » Donald Trump : पुतिनच्या वाटेवर ट्रम्प !

Donald Trump : पुतिनच्या वाटेवर ट्रम्प !

by Team Gajawaja
0 comment
Donald Trump
Share

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची कमान डोनाल्ड ट्रम्प यांनी स्विकारल्यावर अवघा एक आठवडाही झाला नसतांना आता त्यांना तिस-यांदा राष्ट्राध्यक्ष पदाची स्वप्न पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळेच आता अमेरिकेच्या राज्यघटनेत बदल करण्याची त्यांनी हालचाल करायला सुरुवात केली आहे. 1951 मध्ये अमेरिकेच्या संविधानातील बाविसाव्या दुरुस्तीपासून, कोणतीही व्यक्ती दोनदापेक्षा जास्त वेळा राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून येऊ शकत नाही. यापूर्वी, 1940 मध्ये, फ्रँकलिन डी. रुझवेल्ट चार वेळा अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. परंतु राज्यघटनेतील 22 व्या दुरुस्तीनंतर आता अमेरिकेत कोणतीही व्यक्ती जास्तीत जास्त 8 वर्षेच राष्ट्रपती राहू शकते. 14 जून, 1946 रोजी जन्म झालेले ट्रम्प आता 79 वर्षाचे आहेत. अजून चार वर्षांनी ते 83 वर्षाचे होतील. असे झाले तर सर्वाधिक वयाचे राष्ट्रधक्ष होण्याचा मानही त्यांच्याकडेच जाणार आहे. (Donald Trump)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्र हाती घेताच अनेक कायदे बदलण्यास सुरुवात केली आहे. त्यातच त्यांनी राष्ट्राध्यक्षपदाबाबतही नियम बदलण्याचे सुतोवाच केले आहे. रशियाचा अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनीही असाच प्रयोग करत स्वतःकडे रशियाचे अध्यक्ष अबादितपणे राहिल असे बदल रशियाच्या राज्यघटनेत करुन घेतले आहेत. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांनी गेल्या वर्षी रशियाच्या संविधानात सुधारणा करत 2036 पर्यंत अध्यक्षपद स्वतःकडे ठेवले आहे. आता डोनाल्ड ट्रम्पही अमेरिकेच्या राज्यघटनेत बदल करुन आणखी चार वर्षांसाठी स्वतःचे स्थान भक्कम करीत आहेत. (International News)

अमेरिकेच्या राज्यघटनेनुसार कोणताही राष्ट्राध्यक्ष दोन वेळापेक्षा जास्त काळ आपल्या पदावर राहू शकत नाही. अमेरिकन कायद्यानुसार, दोन वेळा राष्ट्रपती झालेल्या व्यक्तीला निवडणूक लढवण्याची परवानगी नाही. परंतु ट्रम्प यांनी यात बदल करण्यासाठी हालचाल करायला सुरुवात केली आहे. त्याचा एक पुरावा त्यांच्याच एक नेत्याचा कृतीतून मिळाला. डोनाल्ड ट्रम्प यांना तिसऱ्यांदा अध्यक्ष बनण्याची परवानगी देण्यासाठी रिपब्लिकन काँग्रेसमन अँडी ओगल्स यांनी घटनादुरुस्तीचा मसुदा तयार केला आहे. त्यात म्हटले आहे की, ट्रम्प यांनी आधुनिक इतिहासातील एकमेव नेते असल्याचे सिद्ध केले आहे. ट्रम्प हेच अमेरिकेची जगात कमी झालेली पत परत मिळवू शकतात. अमेरिकेला महान आणि सर्वशक्तिमान कऱण्यासाठी ट्रम्प यांच्यासारखा दुसरा नेता सध्या अमेरिकेत नाही, त्यामुळे त्यांनी तिस-यावेळाही अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदावर येणे गरजेचे असल्याचे त्यात म्हटले आहे. (Donald Trump)

आता डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. त्यांनी राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यावर माजी राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी घेतलेले अनेक निर्णय बदलायला सुरुवात केली आहे. तसेच घटनादुरुस्तीसंदर्भातही अनेक प्रस्तांवांवर स्वाक्षरी केली आहे. त्यातच राष्ट्राध्यक्षाला तिस-यांदाही संधी देण्याचा प्रस्ताव आता लवकरच संसदेत मांडण्यात येणार आहे. ट्रम्प हे राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकले तर ते झपाट्यानं अमेरिकेचे कायदे बदलतील. त्यामुळे आपल्या देशातील लोकशाही संपून हूकूमशाही निर्माण होईल, असा इशारा यापूर्वी माजी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी आपल्या प्रचारादरम्यान दिला होता. हा इशारा आता खरा ठरत आहे. ट्रम्प यांनी जन्मसिद्ध नागरिकत्व आणि स्थलांतर कायदे बदलण्यासाठी पावले टाकायला सुरुवात केली आहे. यापूर्वीही अमेरिकेच्या राज्यघटनेतील 22 व्या दुरस्तीला आव्हान देण्याचा प्रयत्न झाला आहे. (International News)

================

हे देखील वाचा :  Prayagraj : मस्क्युलर बाबा आणि एमटेक बाबा

Saif Ali Khan : पतौडी कुटुंबाचा शेवटचा नवाब

================

बराक ओबामा यांनी हा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना त्यात अपयश आले आणि राष्ट्राध्यक्ष पदावरुन पायउतार व्हावे लागले. अमेरिकेच्या राज्यघटनेतील ही दुरुस्ती 1951 मध्ये लागू झाली. या दुरुस्तीचा उद्देश राष्ट्रपती पदावर कार्यकाळ मर्यादा घालणे हा होता. 1932 ते 1945 पर्यंत चार वेळा अध्यक्ष म्हणून निवडून आलेले फ्रँकलिन डी. रुझवेल्ट हे अमेरिकेच्या इतिहासात दोनपेक्षा जास्त वेळा अध्यक्षपद भूषवणारे एकमेव अध्यक्ष आहेत. ट्रम्प यांनाही अशाचप्रकारे अमेरिकेचे राष्ट्रध्यक्षपद हवे आहे. यासाठी त्यांनी अमेरिकेचा कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतिन यांचा आदर्श घेतला आहे. पुतिन यांनी रशियाच्या राज्यघटनेत दुरुस्तीकरत 2036 पर्यंत तेच रशियाचे अध्यक्ष असतील अशी तरतूद केली आहे. पुतिन यांना त्यांचा सध्याचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रत्येकी सहा वर्षांच्या दोन अतिरिक्त टर्मसाठी परवानगी देणाऱ्या कायदेशीर दुरुस्तीला जनतेने सहमती दर्शवली आहे. (Donald Trump)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.