डोनाल्ड ट्रंप हे चांगलेच वादाच्या भोवऱ्यात अडकले गेले आहेत, त्यांच्यावर एडल्ट स्टार स्टॉर्मी डेनियल्सचे तोंड बंद ठेवण्यासाठी बक्कळ पैसे दिल्याचा आरोप लावण्यात आला आहे. ही रक्कम ट्रंप यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूकीच्या कॅपेनिंपूर्वी २०१६ मध्ये दिली होती. न्यूयॉर्कचे ग्रँन्ड ज्युरी यांच्याकडून या प्रकरणी त्यांना दोषी मानले गेले आहे. ट्रंप हे अमेरिकेचे असे पहिलेच राष्ट्राध्यक्ष असतील त्यांच्यावर गुन्हेगाराचे आरोप लावले गेले आहेत. खास गोष्ट अशी की, या प्रकरणी ट्रंप यांना अटक ही होऊ शकते. अखेर नक्की कोणते खुलासे डेनियल्स हिने केले आहेत जे न सांगण्यासाठी ट्रंप यांनी तिला ऐवढी मोठी रक्कम दिली होती. याच बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात.(Trump Hush Money Case)
स्टॉर्मी डेनियल्स ही एक एडल्ट स्टार आहे, ती लुइसियाना येथे राहणारी आहे. तिने काही एडल्ट फिल्ममध्ये काम ही केलेय. डेनियल्सने असा दावा केला आहे की, २००६ मध्ये ट्रंप यांनी तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवले होते. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा ट्रंप यांनी मेलानिया हिच्याशी लग्न केले नव्हते. स्टॉर्मीने दावा केला आहे की, ट्रंप यांच्याशी तिची पहिली भेट जुलै २००६ मध्ये झाली होती. तेव्हा लेक ताहो येथे आयोजित करण्यात आलेल्या एका गोल्फ टुर्नामेंट मध्ये ते भेटले होते. त्यानंतर ट्रंप यांनी स्टॉर्मीला डिनरसाठी विचारले. हे डिनर त्यांनी हॉटेलच्या एका खोलीत ठेवले होते.
स्टॉर्मीने २०१८ मध्ये सीबीएसला दिलेल्या एका मुलाखतीत असा खुलासा केला होता की, त्यावेळी ट्रंप यांनी स्टॉर्मीला आपल्या टीवी रिअॅलिटी टीवी शो द अपरेंटिसचा हिस्सा बनण्याचा प्रस्ताव दिला होता. स्टॉर्मीच्या मते, ट्रंप यांनी म्हटले की, तु खुप खास आहे, तुला पाहता मला माझ्या मुलीची आठवण येते. डिनर नंतर ट्रंप यांनी असे म्हटले की, मला तु आवडतेस, तु स्मार्ट, सुंदर आहेस. त्यानंतर स्टॉर्मी आणि ट्रंप यांनी सहमतीने शारिरिक संबंध ठेवले.
स्टॉर्मीने असा सुद्धा दावा केला की, ट्रंप यांनी पुढील वर्षात पुन्हा तिला लॉस एजलिंसच्या एका हॉटेलमध्ये बोलावले. ती त्यांना भेटण्यासाठी गेली असता ट्रंप यांनी पुन्हा तिला शारिरीक संबंधासाठी विचारले. स्टॉर्मीने नकार दिला. एका महिन्यानंतर ट्रंप यांनी फोन केला आणि ती आता त्यांच्या रिअॅलिटी शो चा हिस्सा बनू शकत नाही.
ट्रंप यांनी २०१६ मध्ये जेव्हा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरला तेव्हा स्टॉर्मी डेनियल्सने त्यांच्याशी असलेले संबंध सार्वजनिक करण्याबद्दल बोलली होती. डेली मेलच्या रिपोर्टनुसार, दोघांमध्ये एक करार सुद्धा झाला. तिला तोंड बंद ठेवण्यासाठी १ लाख ३० हजार डॉलरची मोठी रक्कम दिली गेली.(Trump Hush Money Case)
हे देखील वाचा- जो बिडेन अमेरिकेला संपवण्याचा प्रयत्न करतायत, डोनाल्ड ट्रंप यांचा राष्ट्राध्यक्षांवर हल्लाबोल
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यंनी स्टॉर्मीला तोंड बंद ठेवण्यासाठी हे पैसे राष्ट्राध्यक्ष होण्यापूर्वी दिले होते. कायदेशीर पेच आता असा आहे की, पैसे देण्यासाठी ट्रंप यांनी केवळ सांगितले होते पण त्यांच्या खासगी वकील माइकन कोहेन यांनी पैसे दिले होते. २०१८ मध्ये वॉल स्ट्रीटने एडल्ट स्टारला केलेल्या पेमेंटवर एक रिपोर्ट प्रकाशित केला होता. त्यानंतर कोहेन समोर आले आणि त्यांनी ही गोष्ट सार्वजनिक केली की त्यांनी पैसे दिले होते. ट्रंप यांनी नाही. त्यानंतर ट्रंप यांच्यावर असे आरोप लावण्यात आले होते की, स्टॉर्मीला दिलेले पैसे पेमेंट करण्यासाठी ट्रंप यांनी पदाचा दुरपयोग करत कोहन यांच्या मासिक वेतनात ३५ हजार डॉलरची वाढ केली आहे. न्यूयॉर्कच्या ग्रंन्ड ज्युरीमध्ये ट्रंपवर हे आरोप लावण्यात आले आहेत.
ट्रंप यांनी स्टॉर्मी डेनियल्स सोबतच्या संबंधांचे खंडन केले आहे. त्यांनी असे म्हटले की, जे पैसे स्टॉर्मीला दिले गेले होते त्याचा निवडणूकीच्या विजयाशी काहीही संबंध नाही. ट्रंप यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोपांना राजकीय कट आणि आपले व्यक्तिमत्व खराब करण्याचा अयशस्वी प्रयत्न असल्याचे म्हटले आहे.