Home » Truecaller च्या युजर्ससाठी लाइव कॉलर आयडी फिचर लॉन्च, असा करा वापर

Truecaller च्या युजर्ससाठी लाइव कॉलर आयडी फिचर लॉन्च, असा करा वापर

by Team Gajawaja
0 comment
True caller
Share

Truecaller चा वापर हा आपण आपल्याला नक्की कोणी फोन केला आहे किंवा कोठून फोन आलाय हे वेरिफाय करण्यासाठी वापरतो. परंतु आता ट्रुकॉलरसाठी एक नवे फिचर आणले आहे. मात्र हे फिचर केवळ आयफोन युजर्ससाठीच असणार आहे. त्यानुसार युजर्ससाठी एक नवे लाइव कॉलर आयडी फिचर लॉन्च करण्यात आले आहे. या फिचरच्या माध्यमातून त्यांना कॉलर संदर्भातील माहिती सर्च करण्यास सोप्पे होणार आहे. प्लॅटफॉर्म मध्ये खरंतर अॅप्पलच्या वर्च्युअल असिस्टेंटला सिस्टिममध्ये इंटिग्रेट करण्यात आले आहे. जेणेकरुन युजर्सला लगेच कॉलरची माहिती मिळू शकेल. दरम्यान हे फिचर सर्वांसाठी आता उपलब्ध करुन देण्यात आलेले नाही. अशातच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हे फिचर कशा पद्धतीने एक्सेस करु शकता.

आता जेव्हा कधीही आयफोन युजरला एका अज्ञात क्रमांकावरुन फोन येईळ तेव्हा तो केवळ हे सिरी सर्च ट्रु कॉलर असे म्हणता आपल्या आवाजातून ट्रुकॉलरला इनेबल करु शकतात. यामध्ये अॅफ क्रमांकाला लवकरात लवकर कॅप्चर केले जाईल आणि कॉल केलेल्या व्यक्तीची माहिती मोबाईल स्क्रिनवर दाखवली जाईल. दरम्यान हे नवे फिचर केवळ आयओएस 16 आणि नव्या डिवाइसवर ट्रुकॉलरच्या प्रीमियम युजर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. म्हणजेच या अॅपचा लाभ घेण्यासाठी आता प्रीमियम सब्सक्रिप्शन खरेदी करावे लागणार आहे.

आयफोनवर ट्रुकॉलर लाइव कॉलर आयडी असा करा सेट
-यासाठी सर्वात प्रथम अॅपच्या प्रीमियम टॅबमध्ये जाऊन अॅड टू सिरीवर क्लिक करा
-लक्षात असू द्या की, तुम्हाला एका टॅपच्या मदतीने शॉर्टकट कनेक्टेड होण्यास मदत होईल. पहिल्यांदा जेव्हा तुम्ही या फिचरचा वापर करता तेव्हा तुम्हाला ट्रुकलरच्या एक्सेसची परवानगी मागितली जाईल ती स्विकारा.
-सिरी शॉर्टकर्ट सेट केल्यानंतर तुम्हाला केवळ सिरी सर्च ट्रु कॉलर असे म्हणावे लागेल. त्यानंतर ट्रु-कॉलर तुम्हाला इंस्टेट कॉलरची माहिती सांगेल.

हे देखील वाचा- AI चॅटबॉट तुम्हाला फसवू शकतात, वापरण्यापूर्वी ‘या’ गोष्टी जरुर वाचा

Truecaller iPhone मध्ये मिळणार नवे फिचर
नव्या अपडेटमध्ये स्पॅमच्या नावाने निवडण्यात आलेले क्रमांक पाहणे आणि त्यावर कमेंट्स करण्यासाठी एबिलिटीला कनेक्ट करता येणार आहे. हे तुम्हाला स्पॅमरवर युजर्सची अॅक्टिव्हिटी दाखवतील. हे युजर्सला स्पॅप कॉल्सवर फिडबॅक रिपोर्ट करण्याची परवानगी देतो. यामध्ये तुम्हाला एक नवे एसएमएस फिल्टरिंग फिचर सुद्धा पहायला मिळेल. यामधून येणारे एसएमएस मेसेज हे ऑटोमेटिकली फाइनेंस, ऑर्डर आणि रिमाइंजर्स, कुपन्स, ऑफर्स आणि जंक अशा कॅटेगरीत दाखवले जातील.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.