Home » त्र्यंबकेश्वर मंदिरावर मुघल शासक औरंगजेबाने केला होता हल्ला

त्र्यंबकेश्वर मंदिरावर मुघल शासक औरंगजेबाने केला होता हल्ला

by Team Gajawaja
0 comment
Trimbakeshwar Temple
Share

सध्या महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर मंदिरावरुन जोरदार चर्चा सुरु आहे. खरंतर या मंदिराचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत. त्या व्हिडिओत मुस्लिम समुदायातील काही लोकांनी मंदिरात चादर चढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. पुजारी आणि सुरक्षा रक्षकांनी त्यांना मंदिरात जाण्यापासून अडवले, याच दरम्यान त्या दोघांत जोरदार वाद सुद्धा झाला. (Trimbakeshwar Temple)

ही घटना समोर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली. त्यांनी कायद्याचे पालन करण्याचे अपील केलेय. त्याचसोबत या प्रकरणाची एसआयटीकडून तपास केला जाईल असे ही म्हटले. खास गोष्ट अशी की, या मंदिरात दुसऱ्या समुदायातील लोकांनी सुद्धा गेल्या वर्षात घुसण्याचा प्रयत्न केला होता.

त्र्यंबकेश्वर हे भगवान शंकराच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हिंदू मान्यतांनुसार, त्र्यंबकेश्वर मंदिराला अत्यंत पवित्र स्थळ मानले जाते. हे भगवान शंकराच्या भक्तांसाठी मोठे तीर्थस्थळ आहे. पौराणिक मंदिरांपैकी एक असलेले हे मंदिर नाशिक विमानतळापासून ३० किमी दूर आहे. येथील गावाचे नाव त्र्यंबक आहे. तर गोदावरीच्या रुपात गंगा पृथ्वीवर आल्याची कथा ही सांगितली जाते. येथे भगवान म्हणजेच ब्रम्हा, विष्णू आणि महेशचा अवतार मानले जाते.

Trimbakeshwar Temple
Trimbakeshwar Temple

मुघलांच्या हल्ल्यानंतर या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे श्रेय पेशवांना जाते. तिसरे पेशवांच्या रुपात विख्यात बालाजी म्हणजेच श्रीमंत नानासाहेब पेशवा यांनी १७५५ ते १७८६ दरम्यान ते उभारले. पौराणिक मान्यतेनुसार असे सांगितले जाते की, सोनं आणि किंमती रत्नांनी बनवलेल्या लिंगावरील मुकूट हे महाभारताच्या पांडवांनी स्थापित केला होता.

असे ही म्हटले जाते की, सतराव्या शतकात ही जेव्हा या मंदिराचा जीर्णोद्दार केला जात होतो तेव्हा या कार्यासाठी १६ लाखांचा खर्च आला होता. त्र्यंबकला गौतम ऋषि यांच्या तपोभुमिच्या नावाने सुद्धा ओळखले जाते.

काळ्या दगडांवरील कोरिव नक्षीकाम आणि आपल्या भव्यतेसाठी त्र्यंबकेश्वर मंदिर जगभरात प्रसिद्ध आहे. हे संपूर्ण मंदिर काळ्या दगडाने तयार करण्यात आलेले आहे. चौकोनी मंडप आणि मोठे प्रवेशद्वार ही मंदिराची शान आहे. मंदिरात आतमध्ये सोन्याचा कलश आणि शिवलिंगाजवळ हिरे आणि अन्य किंमती रत्नाचे मुकूट आहे. या मंदिराला पौराणिकदृष्टीकोनातून फार महत्व आहे. (Trimbakeshwar Temple)

हेही वाचा- भोलेबाबांच्या भक्तांसाठी खुशखबर

औरंगजेबाने केला होता हल्ला
मुघलकाळात भारतातील काही हिंदू मंदिरातील देवी देवतांची तीर्थस्थळ पाडण्यात आली होती. त्यापैकीच एक नाशिक मधील त्र्यंबकेश्वर मंदिर सुद्धा होते. इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी आपले पुस्तक हिस्ट्री ऑफ औरंगजेबमध्ये याचा उल्लेख केला आहे.

त्यांनी असे लिहिले की, सन १९६० मध्ये मुघल शासक औरंगजेबाच्या सैन्याने नाशिक मधील त्र्यंबकेश्वर मंदिरातील शिवलिंग ध्वस्त केले होते. मंदिराचे खुप नुकसान झाले होते. त्यावर मस्जिदचा घुमट बांधला गेला होता. ऐवढेच नव्हे तर औरंगजेबाने नाशिकचे नाव सुद्धा बदलले होते. पण १७५१ मध्ये मराठ्यांनी पुन्हा नाशिकवर आपल्या ताब्यात घेतले आणि मंदिराची पुर्ननिर्मिती केली.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.