Home » इंटरनेटशिवाय Gmail पाठवण्यासाठी ‘या’ सोप्प्या ट्रिक्स वापरा

इंटरनेटशिवाय Gmail पाठवण्यासाठी ‘या’ सोप्प्या ट्रिक्स वापरा

by Team Gajawaja
0 comment
Tricks for Gmail
Share

इंटरनेटची समस्या ही सामान्य आहे. तुम्हाला इंटरनेटच्या समस्येशिवाय आपली काही महत्वाची कामे करु शकत नाहीत. अशातच जर आता इंटरनेटच्या समस्येमुळे तुम्हाला महत्वाचा ईमेल पाठवायचा असेल तर तो पाठवता येत नाही. पण तुम्ही इंटरनेटशिवाय ईमेल पाठवू शकता. हे थोडे विचित्र वाटेल पण खरं आहे. तुम्ही mail.google.com वर जाऊन इंटरनेटशिवाय तुम्ही जीमेल मधील मेल वाचू शकता. त्याचसोबत त्याला उत्तर ही देऊ शकतो. या व्यतिरिक्त जुने ईमेल सुद्धा सर्च करता येऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला क्रोम ब्राउजरवर mail.google.com ला बुकमार्क करावे लागेल.(Tricks for Gmail)

क्रोम ब्राउजरचा वापर करा
ऑफलाईन जीमेलचा वापर केवळ क्रोम ब्राउजवरच करता येतो. क्रोम व्यतिरिक्त हे फीचर कोणत्याही अन्य ब्राउजवर उपलब्ध नाही आहे. त्यासाठी तुमच्या डिवाइसवर क्रोम डाउनलोड करा. या व्यतिरिक्त क्रोमवर तुम्ही अगदी सहज ऑफलाइन मेल सुद्धा एक्सेस करण्यासाठी बुकमार्क करु शकतात.

Tricks for Gmail
Tricks for Gmail

इंटरनेटशिवाय ईमेल कसा पाठवाल?
इंटरनेटशिवाय ईमेल पाठवण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या कंप्युटरवर क्रोम डाऊनलोड करा. त्यानंतर जीमेल ऑफलाईन केवळ क्रोम ब्राउजर विंडो मध्ये उपयोग करु शकतो. त्यानंतर जीमेल ऑफलाइन सेटिंगमध्ये जाऊन https://mail.google.com/mail/u/0/#settings/offline या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर ऑफलाईन मेल अनेबल करा. आता सेटिंग निवडा, जसे तुम्ही किती दिवसांचे मेसेज सिंक करु पाहत आहात. त्यानंतर सेव्ह चेंजेसवर क्लिक करुन सेटिंग्स सेव्ह करा.(Tricks for Gmail)

हे देखील वाचा- आता UAN सह महत्वाची कागदपत्रं डिजिलॉकरच्या माध्यमातून करता येणार डाउनलोड

जीमेल बुकमार्क करु शकता
जीमेलचा ऑफलाईन पद्धतीने वापर करण्यासाठी बुकमार्क सुद्धा करु शकता.आपले ईमेल सहज एक्सेस करण्यासाठी तुम्ही आपल्या इनबॉक्सला बुकमार्क करु शकता. त्यासाठी क्रोममध्ये आपला जीमेल इनबॉक्स सुरु करा आणि अॅड्रेस बारच्या डाव्या बाजूला स्टारवर क्लिक करा.

या व्यतिरिक्त तुम्ही पाठवण्यात आलेला ईमेल Undo करण्यासाठी ५ सेकंदाचा वेळ मिळतो. काही वेळा असे वाटते की, आणखी काही वेळ मिळाला असता तर उत्तमच असते. मात्र तुम्ही जीमेलवर अंडूची वेळ वाढवू शकतो. त्यासाठी प्रथम तुम्हाला जीमेलच्या वेब वर्जनवर जावे लागणार आहे. आता वरती डाव्या बाजूला सेटिंग्सवर क्लिक करा आणि आता पुन्हा See all settings वर जावे. येथे General टॅब अंतर्गत Undo Send चा ऑप्शन मिळेल. आता अंडू करतेवेळी तुम्ही ५ सेकंद बदलून १० सेकंद, २० सेकंद आणि ३० सेकंद करु शकतात. अखेर तुम्ही टाइम लिमिट निवडल्यानंतर Save Changes वर क्लिक करा.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.