Home » सुकलेल्या झाडांना पुन्हा जीवनदान देण्यासाठी फॉलो करा या 3 खास टिप्स

सुकलेल्या झाडांना पुन्हा जीवनदान देण्यासाठी फॉलो करा या 3 खास टिप्स

उन्हामुळे सुकलेल्या फुलांच्या झाडांची पावसाळ्यात योग्य काळजी घेतल्यास त्यांना पुन्हा जीवनदान देता येते. यासाठी कोणत्या टिप्स फॉलो केल्या पाहिजेत याबद्दल जाणून घेऊया...

by Team Gajawaja
0 comment
Tree Plantation Tips
Share

Tree Plantation Tips : सर्वत्र पावसाळ्याची सुरुवात झाली आहे. यामुळे सुकलेल्या झाडांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत असल्याने नवी पालवी फुटण्यास मदत होते. पण घरातील सुकलेली झाडे मृताव्यवस्थेत गेली असल्यास त्यांना पुन्हा जीवनदान देण्यासाठी काही गोष्टी केल्या पाहिजेत. जेणेकरुन झाडे पुन्हा हिरवीगार आणि टवटवीत दिसतील. जाणून घेऊया फुल झाडांची काळजी घेण्यासाठी काही खास टिप्स सविस्तर…

सुकलेली झाडे पुन्हा हिरवीगार करण्यासाठी टिप्स

दालचिनी पावडर
सुकलेल्या झाडांना पुन्हा हिरवीगार करण्यासाठी दालचिनी पावडरचा वापर करा. दालचिनी पावडर वापरल्यानंतर झाडे हिरवीगार होण्यास थोडा वेळ लागेल हे लक्षात घ्या. यासाठी झाडांच्या मूळांपाशी दालचिनी पावडर टाका. झाडांची मूळ जशी मजबूत होतील तेव्हा ती पुन्हा हिरवीगार होण्यास सक्षम होतील. पण तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसात झाडांना पाणी दिले नसल्यास आणि ते सुकले असल्यास झाडे पुन्हा जिवंत होणार नाहीत.

How to Revive a Dying Houseplant—and When It’s Time to Say Goodbye

तांदळाचे पाणी
तांदळाचे पाणी वापरुनही झाडे पुन्हा टवटवीत करु शकता. यासाठी एक लीटर गरम पाण्यात मूठभर तांदूळ घाला. यानंतर त्यामध्ये व्हिनेगर आणि एक चमचा सोडा मिक्स करा. आता मिश्रण झाडांच्या मूळांना टाका. यामुळे झाडं पुन्हा हिरवेगार होण्यास मदत होईल. (Tree Plantation Tips)

लसूणचे पाणी
उन्हाळ्यादरम्यान झाडांवर लहान किटक, किडे लागतात. यामुळे झाडाचे नुकसान होते. पण तुम्ही झाडांवरील किटक दूर करण्यासाठी लसूणच्या पाण्याचा वापर करू शकता. यासाठी सर्वप्रथम लसणाच्या पाकळ्या 30 मिनिटांपर्यंत गरम पाण्यात भिजवून ठेवा. यानंतर पाणी गाळून घ्या आणि थोड्यावेळाने झाडांना घाला. हे पाणी स्प्रे बॉटलमध्ये भरुन दररोज झाडांनाही घालू शकता.


आणखी वाचा :
कामाख्या देवीचं मंदिर म्हणजे एक शक्तीपीठ !
भारतातील ही शिवमंदिरे कपल्ससाठी आहेत खास, लग्नानंतर नक्कीच दर्शन घ्या

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.