जगभरात पासपोर्टची सुविधा सुरु करुन १०२ वर्ष झाली. राष्ट्रपती ते पंतप्रधान सुद्धा एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करतात तेव्हा त्यांना डिप्लोमेटिक पासपोर्ट ठेवावा लागतो. मात्र या पृथ्वीच्या २०० हून अधिक देशांमध्ये अशी ३ खाल लोक आहेत जी कोणत्याही देशात पासपोर्ट शिवाय जाऊ शकतात. त्यांना कोणीही पासपोर्ट विचारत नाही. मात्र जेव्हा ही लोक कुठे जातात तेव्हा त्यांची अधिक काळजी घेतली जाते आणि प्रोटोकॉलनुसार त्यांना सन्मान ही दिला जातो. (Travel without passport)
२० वे शतक सुरु झाल्यानंतर असे दिसून आले की, जर एका देशातून दुसऱ्या देशात येणाऱ्यांवर नियंत्रण न ठेवल्यास तर काही समस्या उद्भवू शकतात. खरंतर समस्या उद्भवू लागल्या होत्या. तेव्हा आजच्या प्रमाणेच पासपोर्टमध्ये काही सिक्युरिटी फिचर्स नव्हते. त्यामुळे बनावट पासपोर्ट लगेच ओळखता यायचे नाही. जगातील देशांमध्ये कोणताही करार नव्हता. पण जेव्हा कोणत्याही देशाचा नागरिक दुसऱ्या देशात जाईल तर त्याच्याकडे काहीतरी कागदपत्र असतील. त्याचे तेथे त्या देशात येणे सुद्धा नियमांमध्ये जोडले जायचे. या सर्व गोष्टी दरम्यान पहिले महायुद्ध सुद्धा सुरु होतो. प्रत्येक देशाला कळू लागले होते की, पासपोर्ट सारखी सिस्टिम बनवणे गरजेचे आहे.
त्यानंतर १०२० मध्ये सर्वकाही अचनाक बदलले गेले. लीग ऑफ नेशंन्समध्ये याबद्दल गांभीर्याने विचार झाला की, पासपोर्ट सारखी व्यवस्था संपूर्ण जगात बनवण्यासाठी पुढाकार अमेरिकेने घेतला. जेणेकरुन देशात चोरीछुप्या पद्धतीने येणाऱ्यांवर बंदी घातली जाईल. १९२४ मध्ये अमेरिकेने आपली नवी पासपोर्ट प्रणाली जाहीर केली.

कोण आहेत ती ३ खास लोक
पासपोर्ट शिवाय जगात कुठेही फिरण्यासाठी ज्यांना परवानगी असते अशा खास ३ लोकांमध्ये ब्रिटेनचा राजा आणि जापानचा राजा आणि राणी यांचा समावेश आहे. चार्ल्स राजा बनवण्यापूर्वी हा विशेष अधिकार राणी एलिजाबेथ यांच्याकडे होता.(Travel without passport)
परंतु ब्रिटेनचे राजा म्हणून चार्ल्स झाले असले तरीही त्यांच्या पत्नीला मात्र हा अधिकार नसणार आहे. त्यांना दुसऱ्या देशात जाण्याच्या स्थितीवेळी डिप्लोमेटिक पासपोर्ट ठेवावा लागणार आहे. अशा प्रकारे रॉयल परिवारातील मुख्य लोकांना डिप्लोमॅटिक पासपोर्ट ठेवण्याचा अधिकार आहे.
हे देखील वाचा- आता पोस्ट ऑफिसमध्ये सुद्धा मिळणार पासपोर्टसाठीचे पोलीस क्लियरेंस सर्टिफिकेट
जापानमध्ये कधी सुरु केली ही व्यवस्था
जापानमध्ये डिप्लोमॅटिक रेकॉर्ड सांगतात की, तेथील परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या सम्राट आणि राणीसाठी खास व्यवस्था १९७१ पासून सुरु केली होती. जेव्हा जापानचे सम्राट आणि राणी परदेशात जातील तेव्हा त्यांना पासपोर्टची गरज भासणार नाही. जापानमध्ये परराष्ट्र मंत्रालयाने ही व्यवस्था करण्यापूर्वी खुप विचार ही केला आहे.
दरम्यान, भारतात तीन रंगाचे पासपोर्ट जारी केले जातात. सामान्य लोकांसाठी निळ्या रंगाचा पासपोर्ट. सरकार संबंधित उच्चाधिकारी आणि मंत्र्यांसाठी अधिकृत पासपोर्ट तर डिप्लोमेटिक पासपोर्ट मरुन रंगाचा असतो आणि तो देशातील पंतप्रधान, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना दिला जातो.
