Travel Tips : उन्हाळ्याच्या सुट्टीत थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लॅन हमखास केला जातो. या ट्रिपची मजा लुटली जाते. खरंतर, उन्हाळ्याच्या दिवसात थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याचे दिसून येते. अशातच तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत एखाद्या हिल स्टेशनला जायचा प्लॅन करत असल्यास तर ई-पासची गरज भासू शकते.
खरंतर, तमिळनाडूमधील डोंगराळ शहर उटी अथवा कोडईकनाल येथे जाणाऱ्या प्रवाशांना ई-पास सोबत ठेवावा लागणार आहे. ई-पास शिवाय पर्यटकांना फिरण्याची परवानगी नसणार आहे. दरम्यान, मद्रास हाय कोर्टाच्या स्पेशल डिव्हिजन बेंचमध्ये न्यायाधीश एन. सतीश आणि बी. भारत चक्रवर्ती यांनी या दोन्ही हिल्स स्टेशनच्या येथे जाणाऱ्या इच्छुक वाहनांसाठी ई-पास जारी करण्यास सांगितले आहे.
ई-पास का गरजेचा
उन्हाळ्याच्या दिवसात हिल स्टेशनच्या ठिकाणी पर्यटकांची वाढती गर्दी पाहता ई-पासचा निर्णय घेण्यात आला आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांचा कोणताही डेटा उपलब्ध नाही. अशातच ई-पासच्या माध्यमातून सर्व पर्यटकांचे रेकॉर्ड ठेवणे शक्य होणार आहे. पण सध्या हिल्स स्टेशनच्या येथे प्रवेश करण्यासाठी ई-पासची गरज 30 जून, 2024 पर्यंत लागू असणार आहे.
तीन रंगामध्ये असणार ई-पास
उटी आणि कोडईकनलसह निलगिरी जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीसाठी ई-पासची गरज असते. स्थानिक नागरिकाला देखील ई-पास आवश्यक आहे. पण प्रत्येक व्यक्तीला तमिळनाडूतील सरकार वेगवेगळ्या रंगातील ई-पास जारी करणार आहे. स्थानिक नागरिकांसाठी हिरव्या रंगाचा, शेती आणि दुसऱ्या ठिकाणाहून येणाऱ्यांसाठी निळ्या रंगाचा पास दिला जाणार आहे. याशिवाय पर्यटकांना जांभळ्या रंगाचा पास जारी केला जाणार आहे. (Travel Tips)
असा करा अर्ज
-मोबाईल किंवा लॅपटॉपच्या माध्यमातून https://epass.tnega.org वर लॉग इन करा.
-आपल्या नागरिकत्वाच्या आधारावर Within India किंवा Outside India असा पर्याय निवडा.
-आता ओटीपीसाठी मोबाइल क्रमांक टाका
-ओटीपी दिल्यानंतर रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल
-यानंतर संपूर्ण माहिती जसे की, नाव, पत्ता, राहण्याचे ठिकाण, वाहन क्रमांक द्या.