Home » बाळाच्या जन्मानंतर आई करतेय प्रवास? तर ‘या’ गोष्टींची घ्यावी विशेष काळजी

बाळाच्या जन्मानंतर आई करतेय प्रवास? तर ‘या’ गोष्टींची घ्यावी विशेष काळजी

by Team Gajawaja
0 comment
Share

मातृत्व अनुभवणे ही प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. या काळात महिलांची विशेष काळजी घेतली जाते. जेव्हा एखादी स्त्री आई बनणार असते, तेव्हा तिला चालणे, उठणे, बसणे आणि आहार इत्यादीबाबत अनेक सल्ले दिले जातात. वेळोवेळी आरोग्य तपासणी केली जाते. प्रसूतीपूर्वी गर्भवतींना प्रवास न करण्याचाही सल्ला डॉक्टर देतात. प्रवासाशी संबंधित माहिती जवळपास प्रत्येक गर्भवती आणि तिच्या कुटुंबाकडे असते. परंतु मुलाच्या जन्मानंतर महिलेला आपल्या नवजात बाळासोबत प्रवास करायचा असेल, तर तिने काय केले पाहिजे, हे फार कमी लोकांना माहिती आहे. (Travel tips for new mother)

प्रसूतीनंतर किती दिवसांनी तुम्ही प्रवास करत आहात? 

जर गर्भवती महिलेची सिझेरियन प्रसूती झाली असेल, तर तिने किमान महिनाभर लांबच्या प्रवासाला जाऊ नये. ऑपरेशननंतर टाके कच्चे असतात आणि त्यांना नियमित ड्रेसिंगची आवश्यकता असू शकते. लांबच्या प्रवासात टाके निघू शकतात. म्हणून, नवीन आईला एक महिना अंथरुणावर विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जातो. (Travel tips for new mother

डॉक्टरांकडून सल्ला घ्या 

जर बाळाच्या जन्मानंतर आई आणि बाळ प्रवास करणार असतील, तर प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रवासासाठी आई आणि बाळ दोघेही निरोगी असल्याची खात्री केल्यानंतरच प्रवासाला जा. (Travel tips for new mother)

विमानाचा प्रवास 

गर्भवतीची जर शस्त्रक्रिया झाली असेल, तर तिने प्रसूतीनंतर किमान एक महिना विमानाने प्रवास करू नये. सामान्य प्रसूतीच्या बाबतीत रिकव्हरीचा कालावधी एक आठवडा असू शकतो. अशावेळी तुम्ही विमानाने प्रवास करू शकता. जर तुम्हाला कमी अंतराचा प्रवास करायचा असेल, तर तुम्ही रस्त्याने प्रवास करू शकता. परंतु लांबच्या प्रवासासाठी कार किंवा बसने प्रवास करू नका. प्रसूतीनंतर रेल्वे प्रवास तुलनेने सोयीचा ठरू शकतो. (Travel tips for new mother)

खाण्या-पिण्याची घ्या काळजी

बाळाच्या जन्मानंतर, बाळासोबतच आईच्याही खाण्या-पिण्याची काळजी घ्या. नवीन आई झालेल्या महिलेने पौष्टिक आणि हलके अन्न खावे. अशात प्रवासात घरी शिजवलेले पदार्थ सोबत घ्या आणि बाहेरचे कमी खा. बाहेर काही खाऊ वाटले, तर जंक फूड वगैरे खाणे टाळावे. (Travel tips for new mother)

कपडे आणि सामान

प्रसूतीनंतर महिला प्रवासाला जात असेल, तर तिने आरामदायी आणि बाळाला पाजता येईल असे सैल कपडे घालावेत. प्रसूतीनंतर जड वस्तू उचलणे योग्य नसते. अशा परिस्थितीत आई आणि मूल एकटेच प्रवास करत असतील, तर बॅग जास्त जड नसावी. बॅगेत फक्त आवश्यक वस्तू ठेवा. ज्यामध्ये मुलाला आवश्यक असलेल्या गोष्टींव्यतिरिक्त, स्वतःचे कपडे आणि औषध पॅक करा. (Travel tips for new mother)

झोपेची घ्या विशेष काळजी 

प्रवासादरम्यान आईच्या झोपेची पूर्ण काळजी घ्यावी. प्रसूतीनंतर आईला विश्रांतीची गरज असते. परंतु बाळाची काळजी, त्याचे खानपान आणि पोषण यामध्ये व्यस्त असल्यामुळे, आईची झोप पूर्ण होत नाही आणि तिला प्रसूतीनंतरच्या नैराश्याचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत, जर नवीन आई मुलासह प्रवासाला जात असेल, तर तिच्या विश्रांती आणि झोपेची काळजी घ्या.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.