विमानातून प्रवास करण्याची एक वेगळीच मजा असते. याच दरम्यान जर विंडो सीट मिळाल्यास अधिकच मज्जा वाटते. मात्र विमानातून प्रवास करताना काही गोष्टी घाणे घातक ठरु शकते. मात्र हा नियम अधिक फूड खाण्याप्रमाणेच आहे. विमानात प्रवेश करण्यापूर्वी काही लोक स्नॅक्स खातात. मात्र हे खाऊ नये असा सल्ला दिला जाते. हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते क्विक स्नॅक्समुळे तुम्हाला पचनासह ब्लोटिंगची समस्या उद्भवू शकते. अशातच आम्ही तुम्हाला अशा फूड्स बद्दल सांगणार आहोत जे विमानातून प्रवास करण्यापूर्वी कधीच खाऊ नयेत.(Travel Tips)
-सफरचंद
खरंतर सफरचंद हे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते. मात्र हे सुद्धा खाणे घातक ठरु शकते. सफरचंदात भरपूर प्रमाणात फायबर असते जे पाचन होण्यास फार मुश्किल होते. यामुळे तुम्हाला अॅसिडिटी किंवा गॅसची समस्या होऊ शकते. सफरचंदात साखरेचे प्रमाण अधिक असते, ज्यामुळे तुमच्या गट हेल्थला नुकसान होऊ शकते. या व्यतिरिक्त तुम्ही फ्लाइटपूर्वी पपई अथवा संत्र खाऊ शकता.
-तळलेले पदार्थ
आपण नेहमीच विमानतळावर फँन्सी फूड पाहून त्याकडे आकर्षित होते. तळलेल्या पदार्थांमध्ये सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण अधिक असते. विमान टेक ऑफ करण्यापूर्वी बर्गर अथवा पिझ्जा खाल्याने समस्या येऊ शकते.
-तिखट पदार्थ
फ्लाइटमध्ये प्रवास करण्यापूर्वी तळलेले आणि अधिक तिखट पदार्थ जसे की, हॉट सॉस, बिर्याणी, पराठा अथवा लोणचं खाल्ल्याने तुम्हाला पोटासंबंधित समस्या उद्भवू शकतात. यामुळे हार्ट बर्न आणि ब्लॅडर इरिटेशनची समस्या होऊ शकते. या फूड्स मध्ये हाय कॅलरी असते. त्यामुळे तुमच्या तोंडातून दुर्गंधी सुद्धा येऊ शकते.
-ब्रोकली
ब्रोकली तुमच्या दररोजच्या डाएटमध्ये जरुर खा. पण विमानातून प्रवास करण्यापूर्वी हेल्दी खावे. अशातच त्यावेळी तुम्ही ब्रोकली खल्ल्यास पचनासंबंधित समस्या उद्भवू शकते. तर विमानातून प्रवास करण्यापूर्वी कच्चे सलाड खाऊ नये असा सल्ला दिला जातो.(Travel Tips)
-कॉफी
रात्री उशिरापर्यंत जागे राहणे आणि फ्रेश वाटावे म्हणून बहुतांश लोक कॉफीचे सेवन करतात. कारण कॉफीमध्ये असलेल्या कॅफेनमुळे झोप येत नाही. मात्र असे केल्यास तुम्हाला डिहाइड्रेशनची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे विमानातून प्रवास करण्यापूर्वी कॉफी पिणे टाळा. हवं असल्यास हायड्रेट राहण्यासाठी लिंबू पाणी अथवा नारळाचे पाणी प्या.
हे देखील वाचा- रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक
-बीन्स
यामध्ये काही विशिष्ट फायबर असतात जे पचनास काही लोकांना समस्या होते. बीन्स मध्ये प्रोटीन आणि मिनिरल्स असात. मात्र ते गॅस आणि अॅसिडिटी सारख्या समस्या निर्माण करु शकतात. खासकरुन उड्डाण करताना. त्यामुळे विमानातून प्रवास करण्यापूर्वी नेहमीच हलक्या स्वरुपाचे भोजन करावे.