Home » अवघ्या 40 मिनिटात फिरू शकता असा जगातील सर्वाधिक लहान देश

अवघ्या 40 मिनिटात फिरू शकता असा जगातील सर्वाधिक लहान देश

वेटिकन सिटीला जगातील सर्वाधिक लहान देशांपैकी एक ओळखले जाते. हा देश युरोप खंडात आहे. याचे क्षेत्रफल केवळ 44 हेक्टरचे आहे.

by Team Gajawaja
0 comment
Travel
Share

Travel : आतापर्यंत तुम्ही एखाद्या लहान, शहर, गाव किंवा राज्याबद्दल ऐकले असेल. पण देशातील सर्वाधिक लहान देश कोणताय हे माहितेय का? हा देश तुम्ही अवघ्या 30-40 मिनिटांमध्ये फिरू शकता. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे? याबद्दलच जाणून घेऊया सविस्तर….

युरोप खंडात अससेल्या वेटिकन सिटीला जगातील सर्वाधिक लहान देश मानले जाते. या देशाचे क्षेत्रफल केवळ 44 हेक्टर म्हणजेच 108 एकर आहे. पण येथील जग हे स्वप्नातील जगासारखे वाटते. इटलीची राजधानी असलेल्या रोममें येथे स्थित अससेल्या या देशाची लोकसंख्या एक हजारांहूनही कमी आहे. रोम शहरातील या देशाची भाषा लॅटिन आहे.

13 Top-Rated Tourist Attractions in the Vatican | PlanetWare

ख्रिस्ती धर्मियांसाठी खास
वेटिकन सिटी ख्रिस्ती समुदायातील बांधवांसाठी धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळ आहे. हे जगभरातील कॅथलिक चर्चचे पोप येथे राहतात. येथील गल्ल्यांमध्ये फिरताना तुमच्या मनाला शांतता मिळते.

या ठिकाणी नक्की भेट द्या
वेटिकन सिटीमध्ये सेंट पीटर्स बेसिलिका येथेही फिरायला जाऊ शकता. याला ‘बेसिलिका डी सॅन पिएत्रो’ नावाने देखील ओळखले जाते. कॅथलिक परंपरेनुसार, हे ठिकाण सेंटर पीटर यांना दफन केल्याचे ठिकाण असल्याचे मानले जाते. ते येशूच्या 12 प्रेरितांपैकी एक होते. सेंट पीटर्स बेसिलिकाच्या परिसरात जवळजवळ एक हजार थडगे असून हे ठिकाणी तीर्थ क्षेत्राच्या रूपात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी तुम्ही एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान भेट देऊ शकता. (Travel)

ख्रिसमस सेलिब्रेशन
ख्रिसमस सेलिब्रेशनदरम्यान येथील नजारा पाहण्यासारखा असतो. वेटिकन सिटीचे धार्मिक महत्त्व असल्याने येथे ख्रिसमसनिमित्त नागरिकांची खूप गर्दी होते. दुसऱ्या देशातील नागरिकही ख्रिसमसचा नजारा पाहण्यासाठी येथे येतात.


आणखी वाचा:
New Year 2024: नव्या वर्षात घराबाहेर जाऊ शकत नसल्यास असे करा सेलिब्रेशन
पेंटागॉनपेक्षा सरस आहे सुरत डायमंड बाजार
रेल्वे स्थानकाच्या नावामागे ‘रोड’ शब्द लावण्यामागे ‘हे’ आहे कारण

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.