जर तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरण्यासाठी जात असाल तत्पूर्वी ट्रॅव्हल इंन्शुरन्स काढला पाहिजे. कारण प्रवासावेळी एखाद्या प्रकारची आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास तर ट्रॅव्हल इंन्शुरन्स तुमच्या कामी येतो. तुमच्यासह परिवार ही ट्रॅव्हल करत असेल तर त्यांचा ही तुम्ही ट्रॅव्हल इंन्शुरन्स काढू शकता. यामुळे प्रवासावेळी सामानाची चोरी ते आपत्कालीन स्थिती जरी उद्भवल्यास कोणतीही अधिक समस्या येणार नाही. (Travel Insurance)
प्रवासावेळी ट्रॅव्हल इंन्शुरन्स का?
ट्रॅव्हल इंन्शुरन्स काही प्रकारच्या आपत्कालीन स्थिती जसे की, मेडिकल खर्च त्यात भागवला जातो. यामध्ये मेडिकल खर्चाव्यतिरिक्त चेक-इन सामाना संदर्भात समस्या असेल किंवा प्रवासादरम्यान सामान हरवल्यास तर ट्रॅव्हल आपत्कालीन स्थितीत आर्थिक मदत तुम्हाला मिळू शकते.

यामुळे तुम्हाला अन्य काही फायदे सुद्धा होतात. ज्यामध्ये प्रवासाची जोखिम कवर केली जाते. बहुतांश कंपन्या ट्रॅव्हल इंन्शुरन्स देऊ करतात. परंतु त्यांचा प्रीमियम चार्ज वेगवेगळा असतो आणि सुविधा सुद्धा त्याचनुसार असते. बीमा कंपनी तुम्हाला ट्रॅव्हल इमरजेंसीमध्ये आर्थिक मदत करते आणि हा इंन्शुरन्स केवळ परदेशातील प्रवासच नव्हे तर देशाअंतर्गत ही प्रवासावेळी फायदेशीर ठरु शकतो.
ट्रॅव्हल इंन्शुरन्सचे फायदे काय?
-जर तुम्ही परदेशात सुट्टी मज्जा करण्यासाठी जाणार असाल आणि तुमच्या घरी चोरी झाल्यास तर तुम्हाला घरात चोरी झालेल्या नुकसान पॉलिसीमध्ये कवर केली जाते.
-या व्यतिरिक्त या इंन्शुरन्सच्या माध्यमातून तुम्ही परदेशात प्रवास करत असाल तर काही फायदे ही होतात. जसे तुमचा पासपोर्ट किंवा अन्य महत्वाचे कागदपत्र हरवल्यास, आरोग्यासंबंधित समस्या आल्यास तुम्ही या हेल्थ इंन्शुरन्सचा फायदा घेऊ शकता.
–तसेच देशाअंतर्गत किंवा परदेशात परिवारासोबत एखाद्या ठिकाणी जात असाल आणि त्यावेळी कोणत्याही प्रकारची दुर्घटना, आजार, फ्लाइट रद्द झाल्यास तुमच्यासह परिवाराला याचा पूर्ण फायदा मिळतो. परंतु जर त्यामध्ये परिवारासाठी सुद्धा तुम्ही इंन्शुरन्स काढला असेल तरच. या व्यतिरिक्त फ्लाइटला उशिर झाल्यानंतर ही कंपनी तुम्हाला नुकसान भरपाई देते. (Travel Insurance)
हे देखील वाचा- एकही रस्ता नसलेलं गाव! लोक कार आणि बाईकऐवजी खरेदी करतात बोट
ट्रॅव्हल इंन्शुरन्स कसा काढाल?
जेव्हा तुम्ही ऑनलाईन तिकिट बुकिंग करता तेव्हा वेबसाइट किंवा अॅपवर ट्रॅव्हल इंन्शुरन्सचा ऑप्शन मिळतो. बहुतांश लोक या ऑप्शनकडे लक्ष देत नाही. तिकिट बुकिंग करताना इंन्शुरन्सचा ऑप्शन जरुर निवडा. इंन्शुरन्ससाठी तुम्हाला थोडा खर्च करावा लागू शकतो. यासाठी तुम्ही जो इंन्शुरन्स प्लॅन निवडला आहे त्यासाठी तुम्हाला मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडीवर एक लिंक येते. ही लिंक इंन्शुरन्स कंपनीकडून पाठवली जाते. त्या लिंकवर जाऊन तुम्ही नॉमिनी डिटेल्स ही जरुर भरा. कारण इंन्शुरन्स पॉलिसीत नॉमिनी असल्यास त्याचा क्लेम करताना सोप्पे होते.