ज्यावेळी आपण फिरायला जायचा प्लॅन करतो तत्पूर्वी आपल्याकडे किती पैसे आहेत त्यावर एकदा लक्ष देतोच. त्यानुसारच आपली ट्रिप ठरवतो. प्रत्येकाला खिशाला परवडेल अशा किंमतीत ट्रिप करावी असे वाटत असते. अशातच तुम्हाला विविध ठिकाणी फिरायला आवडत असेल आणि अधिक पैसे खर्च करायचे नसतील तर असे काही ऑप्शन आहेत जेथे तुम्हाला फुकटात रहायला मिळते. ही ठिकाण तुम्हाला राहायला तर देतात पण त्याच्या आजूबाजूला असलेल्या निसर्गामुळे सुद्धा तुम्हाला तुमची परफेक्ट ट्रिप झाल्याचा आनंद ही देतील. तर जाणून घेऊयात याच बद्दल अधिक.(Travel & Stay Free)
तिबेट बुद्धिस्ट मॉनेस्ट्री
तिबेट बद्धिस्ट मॉनेस्ट्री ही उत्तर प्रदेशात आहे. येथे तुम्हाला रहायचे असेल तर एका रात्रीचे भाडे फक्त ५० रुपये आहे. या मॉनेस्ट्री मध्ये भगवान बुद्ध यांचे एक रुप शाक्यमुनी यांची प्रतिमा आहे.
गीता भवन
गीता भवन हे ऋशिकेश येथे आहे. ऋशिकेश मध्ये फिरण्यासाठी येणारी बहुतांश लोक कोणत्याही खर्चाशिवाय येथे राहण्याचा ऑप्शन निवडतात. गीता भवनात १००० खोल्या आहेत. येथे जगभरातून येणारी लोक आवर्जून राहतात.या आश्रमात लक्ष्मी नारायण मंदिर, एक आयुर्वेदिक विभाग आणि एक लायब्रेरी आहे. येथे शुद्ध शाकाहारी जेवण दिले जाते. हे आश्रम गंगा नदीच्या किनाऱ्यावरच आहे.
आनंदाश्रम
ज्यांना फुकटात रहायचे असते त्यांच्यासाठी आनंदाश्रम ऑप्शन आहे. हे केरळात आहे. येथे तुम्हाला फुकटात तर राहता येतेच पण तीन वेळचं खाणं सुद्धा आनंदाश्रमकडून दिले जाते. आनंदाश्रम पूर्णपणे देहाती शैलीने बनवलेले आहे. चहूबाजूने निसर्ग आपले मन प्रसन्न करतोच. पण येथे राहणाऱ्यांना आपण घरी राहत असल्यासारखे सुद्धा वाटते.(Travel & Stay Free)
मणिकरण साहब
मणिकरण साहिब गुरुद्वारा हिमाचल प्रदेशात आहे. तो पार्वती नदीच्या जवळ आहे. येथे तुम्हाला फ्री मध्ये राहण्यासह खाण्याची सुविधा दिली जाते.
हे देखील वाचा- भारतातील ‘या’ ऐतिहासिक गुहांना नक्की भेट द्या
ईशा फाउंडेशन
ईशा फाउंडेशन हे तमिळनाडू येथे आहे. हे ठिकाण कोयंबटूर पासून ४० किमी दूर आहे. हे सदगुरुंचे धार्मिक केंद्र आहे. येथे तुम्हाला आदियोगाचा मोठा स्टॅच्यू सुद्धा दिसतो. येथे तुम्ही कोणत्याही खर्चाशिवाय राहू शकता.आश्रमातील डारेमेट्रीच्या स्वयंसेवी कार्यक्रमात भाग घेणाऱ्यांना फ्री मध्ये राहता येते. तर ईशा फाउंडेशन हे वेल्लियांगिरी पर्वतरांनी घेरलेले आहे.