Home » प्रवासावेळी ट्रॅव्हल एंग्जायटीचा सामना करता? लक्षात ठेवा या गोष्टी

प्रवासावेळी ट्रॅव्हल एंग्जायटीचा सामना करता? लक्षात ठेवा या गोष्टी

प्रवासावेळी ट्रॅव्हल एंग्जायटीपासून कसे दूर रहायचे याबद्दलच्या काही खास टिप्स जाणून घेणार आहोत.

by Team Gajawaja
0 comment
Travel & Stay Free
Share

Travel and Health Care : काहीजणांना ट्रॅव्हल करणे फार आवडते. पण काहीजण असे असतात त्यांना ट्रॅव्हल करताना तणाखाली असतात. यामागे काही कारणे असू शकतात. त्यापैकीच एक म्हणजे ट्रॅव्हल एंग्जायटीचा समावेश आहे. या स्थितीत व्यक्तीला प्रवासावेळी सतत भीती आणि चिंता वाटत राहते. या समस्येपासून दूर राहण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याबद्दल जाणून घेऊया…

आधीच तयारी करून ठेवा
तुम्हाला ट्रॅव्हल एंग्जायटी असल्यास प्रवासाला निघण्याआधी संपूर्ण तयारी करा. अखेरच्या वेळेत तयारी करणे टाळा. जेणेकरुन एंग्जायटी ट्रिगर होईल. याशिवाय वेळेआधीच ट्रेन अथवा बसच्या ठिकाणी पोहोचा.

ट्रॅव्हलवेळी स्वत:ला व्यस्त ठेवा
प्रवासावेळी एंग्जायटीपासून दूर राहण्यासाठी स्वत:ला व्यस्त ठेवा. यावेळी स्वत:सोबत अशा काही गोष्टी ठेवा ज्यामध्ये तुमचे लक्ष लागले जाईल. जसे की, पुस्तक, मोबाइलमध्ये एखादा सिनेमा. एवढेच नव्हे प्रवासाआधी हलका वॉक किंवा योगा देखील करू शकता.

ट्रिगर ओळखा
प्रवासावेळी कोणत्या गोष्टीचा सर्वाधिक त्रास होतो हे ओळखा. यामुळे ट्रॅव्हल एंग्जायटी कमी होण्यास मदत होईल. प्रवासावेळी तुमचे लक्ष नेहमीच दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतवा. जेणेकरुन प्रवासादरम्यान चिडचिड किंवा तणाव येणार नाही.

दीर्घ श्वास घ्या
प्रवासावेळी एंग्जायटी समस्या उद्भवणे सर्वसामान्य बाब आहे. यावेळी तुम्ही दीर्घ श्वास घ्या. जेणेकरुन पुरेसे ऑक्सिजन शरिराला मिळेल. यामुळे हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर कमी होईल. काहींना ट्रेन आणि फ्लाइटमध्ये बसल्यानंतर एंग्जायटी समस्या उद्भवते. अशा व्यक्तींनी नक्कीच वाहनात बसल्यानंतर दीर्घ श्वास घ्यावा.

प्रवासावेळी हाइड्रेट रहा
प्रवासाआधी स्वत:ला हाइड्रेट ठेवणे आवश्यक आहे. प्रवासावेळी थोडाथोडावेळाने पाणी प्यावे. यामुळे शरिरातील पाण्याचे संतुलन कायम राहते.


आणखी वाचा :
प्रेग्नेंसीमध्ये महिलांनी या 5 गोष्टींची घ्यावी खास काळजी
पोटफुगीच्या समस्येवर प्या हे 5 ड्रिंक्स

Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.