Home » अमेरिकेतील पहिल्या ट्रांसजेंडर महिलेला दिली जाणार मृत्यूदंडाची शिक्षा, नक्की काय आहे प्रकरण

अमेरिकेतील पहिल्या ट्रांसजेंडर महिलेला दिली जाणार मृत्यूदंडाची शिक्षा, नक्की काय आहे प्रकरण

by Team Gajawaja
0 comment
Transgender woman sentenced death
Share

अमेरिकेतील मिसौरी मध्ये एम्बर मॅकलॉघनिन सध्या चर्चेत आहे. एम्बरने २००३ मध्ये एक्स प्रेयसीची हत्या केली होती. दोषी आढळल्यानंतर तिला आता मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. जर मिसौरीचे गवर्नर यांनी माफी दिली नाही तर तिला मृत्यूची शिक्षा होणार हे नक्की. अमेरिकेच्या इतिहासातील पहिलीच मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाणारी ट्रांसजेंडर महिला आहे. ४९ वर्षीय एम्बर हिच्या वकीलांचे असे म्हणणे आहे की, आता कोर्टात तिची कोणतीही अपील लांबलेली नाही. शिक्षा माफ होणार की नाही हे आता गवर्नवर अवलंबून आहे. जर ती शिक्षेस पात्र ठरल्यास तिला डेथ इंजेक्शनच्या माध्यमातून मृत्यूची शिक्षा दिली जाणार आहे. तर जाणून घेऊयात एम्बरचा आता पर्यंतचा प्रवास… (Transgender woman sentenced death)

आता पर्यंत काय झाले?
लिंग परिवर्तनापूर्वी एम्बर प्रेयसी बेवर्ली गुएन्थर सोबत रिलेशनशिपमध्ये होती. मात्र एका काळानंतर त्या दोघांच्या नातात फूट पडली. प्रेयसीने तिच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र एम्बरने तिचा पाठलाग केला. कधी ऑफिस तर कधी घरी. नोव्हेंबर २००३ मध्ये एम्बरने प्रेयसीची हत्या केली. हे प्रकरण कोर्टात पोहचले आणि २०१६ मध्ये एम्बरला हत्येसाठी शिक्षा सुनावण्यात आली. मृत्यूची शिक्षा मिळू नये म्हणन तिने याचिका सुद्धा दाखल केली होती. २०१६ मध्ये कोर्टाने पुन्हा सुनावणी सुरु केली. २०२१ मध्ये कोर्टाचा निर्णय आला आणि त्यांनी एम्बरला मृत्यूची शिक्षा द्यावी असाच निर्णय कायम ठेवले.

असा आजार ज्याच्या आधारावर याचिका तयार केली
एम्बरचे असे म्हणणे होते की, तिचे बालपण अगदी वाईट होते. तिने मानसिक समस्यांचा सामना ही केला. सेक्स डिस्फोरिया नावच्या आजारपणामुळे त्रस्त होती. याच आधारावर तिने तिला माफी द्यावी असे अपील केले.

याचिकेत असे ही म्हटले गेले होते की, ज्या आई-वडिलांनी तिला दत्तक घेतले होते त्यांनी सुद्धा हाल केले. ऐवढेच नव्हे तर लहानपणी वडिलांनी बेशुद्ध करण्यासाठी बंदुकीचा वापर केला होता. यामुळे ती दीर्घकाळ तणावाखाली होती. काही वेळा आत्महत्या करण्याचा सुद्धा प्रयत्न केला. ऐवढेच नव्हे तर याचिकेत जेंडर डिस्फोरिया नावाच्या आजाराच्या उपचाराबद्दल ही सांगितले गेले.(Transgender woman sentenced death)

वकील लॅरीने असे म्हटले की, एम्बर हिला खुप काही आयुष्यात सहन करावे लागले आहे. तरीही ती हिंम्मतीने काही गोष्टी केल्या, अमेरिकेच्या इतिहासात आता पर्यंत कोणत्याही ट्रांन्सजेंडर कैद्याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेली नाही. मिसौरी मध्ये आता पर्यंत एकच महिला बॉनी हेडी हिला मृत्यूची शिक्षा सुनावली होती. तिने ६ वर्षाच्या मुलाची हत्या केली होती.

हे देखील वाचा- हिटलरसोबत मिळून हजारो लोकांना केले ठार, वयाच्या ९७ व्या वर्षी मिळाली आरोपीला शिक्षा

असे इंजेक्शन ज्यामुळे कायमचे डोळे बंद करतो व्यक्ती
जर एम्बरला गवर्नर यांनी माफी दिली नाही तर तिला इंजेक्शनच्या माध्यमातून मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाणार आहे. ज्या इंजेक्शनमुळे मृत्यूची शिक्षा दिली जाते त्यामध्ये काही औषधं एकत्रित करण्यात आलेली असतात. यामुळे ते दिल्यानंतर मेंदू आणि शरिर लगेच सुन्न होते. शरिर पॅरालाइज होते. हृदयाचे ठोके थांबतात.

अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदा ७ डिसेंबर १९८२ रोजी इंजेक्शनच्या माध्यमातून शिक्षा दिली गेली होती. हत्येचा दोषी चार्ल्स ब्रुक्स ज्युनियरला विषारी इंजेक्शन दिले होते. चार्ल्स ब्रुक्सने डेविड ग्रेगरी नावाच्या ऑटो मॅकेनिकची हत्या केली होती. सुनावणी दरम्यान, दोषी आढळल्याने त्याला मृत्यूची शिक्षा सुनावली गेली होती.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.