Home » तृतीयपंथी आपला धर्म का बदलतात?

तृतीयपंथी आपला धर्म का बदलतात?

by Team Gajawaja
0 comment
Transgender Life
Share

तृतीयपंथांचे आयुष्य रहस्यमय असते. त्यांचे रितीरिवाज, राहण्याची पद्धत ही वेगळीच असते. मुघल काळात तृतीयपंथीयांना खास महत्व होते. त्यांना हरम ते दरबार मध्ये स्थान दिले गेले होते. त्या दरम्यान तृतीयपंथीयांनी मोठ्या प्रमाणात मुस्लिम धर्माचा स्वितार केला होता. मुस्लिम तृतीयपंथी या काळात अधिक बलवान आणि संपन्न सुद्धा होते. परंतु तृतीयपंथी आपला धर्म का बदलतात याच बद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. (Transgender Life)

इतिसाह असे सांगतो की, मुघल काळात मोठ्या संख्येने लोकांना धर्म बदलण्यास भाग पाडण्यातआले होते. तसेच काहीसे तृतीयपंथीयांसोबत झाले होते. तृतीयपंथीयांनी हिंदू मधून मुस्लिम धर्म स्विकारला होता. दरम्यान, मुघल शासन काळात तृतीयपंथीयांना हरम ते नोकऱ्यांमध्ये सुद्धा महत्व आणि पैसे सुद्धा मिळत होते. इस्लाम धर्म स्विकारणाऱ्या तृतीयपंथीयांचे राहणे सुद्धा त्यांच्याप्रमाणे होत गेले.

मुस्लि शासक तृतीयपंथीयांची वीरता, त्याग आणि समर्पण यामुळे फार प्रभावित होते. त्यांना कोणताच त्यांच्यामध्ये धोका वाटत नव्हता. ते तृतीयपंथीयांना आपले विश्वासहर्ता मानत होते. त्यांना महत्वपूर्ण कामे दिली जायची. तृतीयपंथीयांना राणी आणि हरमच्या सुरक्षिततेसाठी आणले जायचे. राण्यांना त्यांच्यासोबत जरी शारिरीक संबंध ठेवावेसे वाटत असले तरीही तसे त्या करु शकत नव्हत्या. तृतीयपंथी हरममध्ये राण्यांसोबत नेहमीच असायचे. राण्यांना सजवणे ते नृत्य, गायन करत राण्यांचे मनोरंजन करायचे.

मुस्लिम शासनकाळात राण्यांची काळजी घेण्याव्यतिरिक्त राजदरबारात त्यांना महत्वपूर्ण जबाबदारी दिली होती. काही तृतीयपंथी शासकाच्या अगदी जवळचे गोते. त्यांच्याकडे सुद्धा काही अधिकार होते. तसेच सैन्यात सुद्धा त्यांना महत्वाचे स्थान दिले गेले होते. जेव्हा इंग्रज आले तेव्हा बहुतांश तृतीयपंथीयांनी मुस्लिम धर्माचा स्विकार केला. मात्र आता हिंदू बाहुल्य असणाऱ्या देशात सुद्धा बहुतांश तृतीयपंथी हे मुस्लिम बनतात.

मुघल शानसकाळात खुप तृतीयपंथीयांनी काम केले. पण त्यामधील जावेद याचे नाव इतिहासात कोरले गेले. तो असा होता की, त्याला माहिती होते आपलं डोकं कुठे वापरावे. त्याने असेच केले. तो मुघल शासन काळातील सर्वाधिक प्रभावशाली तृतीयपंथी होता. जावेद याची भर्ती मोहम्मद शाह रंगीला याच्या शासनकाळात झाली होती. मात्र बादशहाच्या मृ्त्यूनंतर तो प्रभावशाली तृतीयपंथी बनला. (Transgender Life)

हेही वाचा- आपल्या भावाचे शिर कापल्यानंतर खुप रडला होता औरंगजेब

तृतीयपंथी ज्या प्रकारे आयुष्यभर अपेक्षित आणि छळाचा सामना करत असतात त्यामुळे त्यांना त्यांचा पुढचा जन्म यामध्ये नको असतो. केवळ हिंदू धर्मातच पुर्नजन्माची मान्यता आहे. तृतीयपंथीयांच्या डोक्यात त्यांच्यासोबतचे मुस्लिम तृतीयपंथी असे भरवतात की, जर ते मुस्लिम बनले तर त्यांचा पुर्नजन्म होणार नाही. जर जन्म झालाच तरी ते सामान्य स्री अथवा पुरुष असतील.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.