केरळातील कोझिकोड मध्ये राहणाऱ्या एका ट्रांन्सजेंडर कपल्सच्या घरी लवकरच एका लहान बाळाचे आगमन होणार आहे. या कपल्सची सध्या सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरु आहे. जिया आणि जहाद यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पालक होणार असल्याची बातमी दिली आहे. कपलला अशी अपेक्षा आहे की, मार्च महिन्यात त्यांचे बाळ जन्माला येईल. जिया आणि जहाद यांनी इंस्टाग्रामच्या माध्यमातून माहिती दिली आहे की, गेल्या वर्षांपासून ते एकत्र राहत आहेत. (Trans Couple)
जियाने प्रग्रेंसीचे फोटो सुद्धा इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्याचसोबत एक पोस्ट लिहित असे म्हटले की, जन्मापासून माझे शरिर एका महिलेच्या रुपातन नव्हते. पण एखाद्या मुलाने मला आई म्हणावे असे माझे स्वप्न होते. तीन वर्ष झाली आम्ही दोघ एकत्रित आहोत. जसे माझे स्वप्न आई होण्याचे आहे तसेच स्वप्न जहादचे ही वडील बनण्याचे आहे. आज त्याच्याच पूर्ण संम्मतीने आठ महिन्याचे मुलं पोटात वाढत आहे.

स्री मधून ते पुरुष झाल्यानंतर ही झाली गर्भधारणा
रिपोर्ट्सनुसार, ट्रांन्स कपलने लिंग बदलण्यासाठी सर्जरीची मदत घेतली. जिया जन्मापासून पुरुष होती. मात्र सर्जरी नंतर ती महिला बनली. तर जहादने स्रीच्या रुपात जन्म घेतला होता. मात्र तिने ही सर्जरी करुन घेत पुरुष बनण्याचा निर्णय घेतला. तरी सुद्धा जहाद गर्भवती झाली. असे सांगितले जात आहे की, पुरुष बनण्यादरम्यान, त्याचे गर्भाशय आणि अन्य काही अवयवांना काढले नाही. (Trans Couple)
परिवाराने आणि डॉक्टरांचे मानले धन्यवाद
ट्रांन्सजेंडर कपलने आपले स्वप्न पूर्ण होत असल्याने अत्यंत आनंदात आहे. या दोघांनी या निर्णयामागे त्यांचा परिवार आणि डॉक्टरांच्या मिळालेल्या पाठिंब्यामुळे त्यांचे आभार मानले आहेत. जहाद आणि जिया यांच्या मते, जन्माला आलेल्या बाळाला मेडिकल कॉलेजमधून ब्रेस्ट मिल्क बँक मधून दूध मिळण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा- थर्ड जेंडर मधील बालकं कशी जन्माला येतात?
सोशल मीडियात शुभेच्छांचा वर्षाव
प्रेग्नेंसीचे फोटो त्या दोघांनी इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या पोस्टला १९ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. त्याचसोबत सोशल मीडियात त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. एका इंस्टाग्राम युजरने कमेंट करत असे म्हटले की, खुप शुभेच्छा! ही अत्यंत सुंदर गोष्ट असून जी मी इंस्टाग्रामवर पाहिली की, खऱ्या प्रेमाला मर्यादा नसते. तसेच देवाचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहो असे ही एका युजरने म्हटले.