भारतातील रेल्वे केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. रेल्वे हे असे एक माध्यम आहे की, ज्याच्या माध्यमातून एका शहरातून दुसऱ्या शहरात किंवा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पोहचण्याचा उत्तम पर्यायी मार्ग मानला जातो. ट्रेनच्या माध्यमातून खुप तासांचा प्रवास करणे सुरक्षित मानले जाते. अशातच भारतीय ट्रेनला देशाची लाइफलाइन असे ही म्हटले जाते. परंतु जेव्हा तुम्ही एखाद्या ट्रेनचे तिकिट खरेदी करता त्यामध्ये वेगवेगळे कोच असतात. जसे की, जनरल, स्लिपर किंवा एसी असे. मात्र CC किंव EC च्या डब्ब्यांबद्दल बहुतांशजण गोंधळतात.(Train Ticket Codes)
CC म्हणजे काय?
सर्वात प्रथम जाणून घेऊयात सीसी म्हणजे काय. याचा अर्थ होतो की, AC Chair Car. हे एक प्रकराचे कोच असते. या डब्ब्यामध्ये स्लीपिंग सीट्स प्रमाणे सीट्स नसतात.तर बसण्यासाठी खुर्च्या असतात. यामध्ये एका लाइनमध्ये ५ खुर्च्या असतात. या कोचमध्ये एसीची सुविधा मिळते. त्यामध्ये सीट ही आलिशान असतात आणि कॅटरिंग सुविधा ही मिळते.
सीसी सीट्स कोणत्या ट्रेनमध्ये असतात?
असे मानले जाते की, सीसी डब्बे हे वंदे भारत, तेजस एक्सप्रेस, शताब्दी एक्सप्रेस, युवा एक्सप्रेस आणि डबल डेकर एक्सप्रेसमध्ये असतात. यामध्ये अन्य डब्ब्यांप्रमाणे सर्व सुविधा ही मिळतात.
EC म्हणजे काय?
जर EC बद्दल बोलायचे झाल्यास याचा अर्थ एक्झिक्युटिव्ह क्लास असा होते. हा कोच केबनिच्या रुपात असतात. प्रत्येक केबिनमध्ये जवळजवळ ४ सीट्स असतात. असे सांगितले जाते की, याचे तिकिट प्रीमियम क्लासचे असते. तसेच विमानाच्या तिकिटाप्रमाणे त्याचे दर असतात. यामध्ये सुद्धा एसी क्लास डब्बे असतात.तर फार कमी वेळाच्या प्रवासासाठी ज्या ट्रेन असतात त्यामध्ये ते असतात. याचे कोच शताब्दी एक्सप्रेस, वंदे भारत सारख्या ट्रेनमध्ये असतात. या व्यतिरिक्त काही आलिशान ट्रेनमध्ये सुद्धा असतात.(Train Ticket Codes)
हे देखील वाचा- विमानांचा रंग नेहमीच सफेद का असतो?
या व्यतिरिक्त काही वेळेस रेल्वेच्या तिकिटावर H1, H2 किंवा A1 असे लिहिलेले असते. त्यामध्ये ही लोक गोंधळतात. तर फर्स्ट क्लास एसीसाठी जर तुम्ही तिकिट बुक केली असेल तर त्यावर H1 असे लिहिलेले असते. खरंतर फर्स्ट एसी मध्ये क्युब केबिन असतात.त्याचसोबत H2 लिहिले असेल तर त्याचा अर्थ ही फर्स्ट क्लास एसीच असतो. फर्स्ट एसी हे दोन भागात विभागलेले असतात. एकामध्ये H1 आणि दुसऱ्यावर H2 असे लिहिलेले असते. तर A1 आणि A2 असेल तर तुमचे तिकिट सेकंड एसी असे आहे.