Home » ती ट्रेन बोगद्यात शिरली आणि प्रवाश्यांसह गायब झाली

ती ट्रेन बोगद्यात शिरली आणि प्रवाश्यांसह गायब झाली

by Team Gajawaja
0 comment
Train
Share

ट्रेनने प्रवास करणं म्हणजे एक वेगळाच अनुभव असतो. खिडकीतून दिसणारे नजारे या प्रवासाची मज्जा आणखी वाढवत असतात. त्यात मग ट्रेन डोंगर चिरत एखाद्या बोगद्यात घुसल्यावर, ट्रेनमध्ये होणारा अंधार हाही एक अनुभवच असतो. पण जर एखादी ट्रेन बोगद्यात घुसली आणि दुसऱ्या बाजूने बाहेरच आली नाही तर? बोगद्यात ट्रेनचा अॅक्सिडेंट सुद्धा झालेला नाही. फक्त ट्रेन बोगद्यातून गायब झाली आहे. हो, इटलीत १९११ साली एक ट्रेन बोगद्यात तर शिरली, पण दुसऱ्या बाजूने कधीच बाहेर आली नाही. असं बोललं जातं की, ही ट्रेन टाइम ट्रॅवल करून १८४० साली पोहचली होती. काय आहे या रहस्यमयी पद्धतीन गायब झालेल्या ट्रेनच सत्य? जाणून घेऊया. (Train)

१९११ साल चालू होतं, इटलीमध्ये झानेट्टी कंपनी एक नवी ट्रेन लाँच करणारी होती. या ट्रेनचा भरपूर प्रचार सुद्धा त्यांनी केला होता. ही ट्रेन रोम शहरातून मिलान या शहरात जाणार होती आणि या प्रवासाचं आकर्षण होतं ते म्हणजे या प्रवासा दरम्यान असणारा सुमारे १ किलोमीटर लांब बोगदा. जो त्या काळात जगातला सर्वात लांब बोगदा समजला जायचा. १०० प्रवासी आणि ६ कर्मचाऱ्यांनी मिळून ही ट्रेन तिचा पहिला प्रवास करणार होती.
सर्वच प्रवासी आणि रेल्वेचे कर्मचारी उत्साहात रेल्वेचा प्रवास सुरू होण्याची वाट पाहत होते. मग सगळ्यांना ज्याची आतुरता होती ती वेळ आली ट्रेन स्टेशनवरुन निघाली. सर्व प्रवाशांनी जल्लोष केला. एक एक स्टेशन आणि निसर्गरम्य नजारे मागे टाकतं ही ट्रेन धावत होती. मग आला या प्रवासाचं आकर्षण असलेला, १ कीमी लांब बोगदा. सर्व प्रवासी खिडक्यांमधून बाहेर बघत होते. आणि मग ट्रेन बोगद्यात शिरली खूप वेळ झाला तरी ती दुसऱ्या बाजूने बाहेर आली नाही. बोगद्याच्या दुसऱ्याबाजूला लोकांनी खूप वाट पाहिली, पण ट्रेन दिसलीच नाही. काही जण तपास करण्यासाठी पोलिसांना घेऊन बोगद्यात गेले, तिथे त्यांना ट्रेनमधील २ प्रवासी जख्मी आणि गोंधळलेल्या अवस्थेत सापडले. ट्रेन आणि इतर प्रवासी गायब झाले होते. ट्रेन ना बोगद्याच्या दुसऱ्या बाजूने बाहेर आली ना पुन्हा मागे गेली. ट्रेन खरंच गायब झाली होती. (International News)

जे दोन प्रवासी बोगद्यात सापडले होते. त्यांनी असं सांगितलं की, जेव्हा ट्रेन बोगद्यात शिरत होती तेव्हा त्यांना विचित्र पांढरा धूर दिसला. ट्रेन धुक्यात दिसेनाशी झाली आणि घाबरून या दोन प्रवाशांनी त्या ट्रेन मधून उडी मारली. हे दोन प्रवासी वाचले पण बाकीच्या १०४ प्रवाशांच काय? त्या ट्रेनच काय?
पुढे बरीच वर्ष या ट्रेनच शोधकार्य सुरूच होतं. मग पहिल्या महायुद्धादरम्यान या बोगद्याला सील करण्यात आल आणि या ट्रेनच शोधकार्य थांबलं. पण ट्रेनच गायब झाल्याच कोड काही सुटल नाही. सर्वाधिक रहस्यमय गोष्ट म्हणजे काही लोकांचा विश्वास होता की ही ट्रेन टाइम ट्रॅवल करून १८४० मध्ये मेक्सिको शहरात पोहचली. जिथे एका हॉस्पिटलमध्ये १०४ इटालियन लोकांना भर्ती करण्यात आलं होतं जे थोडे वेडसर वागत होते. (Train)

=====

हे देखील वाचा : ऋषिकेशमध्ये सनबर्न फेस्टिवल

======

काही वर्षानंतर या ट्रेनची रहस्यमय कथा सर्वत्र प्रसिद्ध झाली. १९९२ मध्ये युक्रेनमधील एका वर्तमानपत्रात ‘भूत ट्रेन’ बद्दल लेख प्रसिद्ध झाला. त्यात लिहिलं होतं की झानेट्टीची ट्रेन कधीतरी युक्रेनमधील एका रेल्वे मार्गावर दिसली आहे, ज्यात कोणीही नाही आणि ती धावत असताना कोणतीही आवाज होत नाही. या ट्रेनची कथा ऐकायला खूप भारी वाटते. पण ही ट्रेन किंवा ती झानेट्टी कंपनी खरंच अस्तित्वात होती का? याचा कोणताही पुरावा सापडलेला नाही आहे. या ट्रेन बद्दल इंटरनेटवर खूप माहिती उपलब्ध आहे. पण ती अस्तित्वात असल्याचे पुरावे उपलब्ध नाही. मग ही फक्त कान गोष्ट आहे की? हे पण त्या गायब झालेल्या ट्रेन सारखं एक गूढ आहे. (International News)


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.