Home » ट्रेन मधील बर्थवर झोपण्यासाठीचे काय आहेत नवीन नियम?

ट्रेन मधील बर्थवर झोपण्यासाठीचे काय आहेत नवीन नियम?

by Team Gajawaja
0 comment
Train Berth Seats
Share

भारतात दररोज लाखो-करोडो लोक रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करत असतात. मात्र ट्रेनमधून प्रवास करण्यासंदर्भातील काही नियम सुद्धा आहेत त्याबद्दल फार कमी जणांना माहिती असतात. अशातच तुम्हाला रेल्वेच्या ज्या बर्थ सिटवर तुम्ही उठताबसता त्या संदर्भात ही काही नियम आहेत. काही वेळा ट्रेनमध्ये आपल्याला हवी ती बर्थ मिळत नाही, कारण रेल्वेकडे मर्यादीत जागा असतात. त्याचसोबत बर्थवर झोपण्यावरुन ही वाद होतात. अशातच हे जाणून घेणे महत्वाचे आहे की, प्रवास करताना कोणत्या नियमांचे पालन केले पाहिजे. (Train Berth Seats)

ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान, बहुतांश लोक मिडल बर्थ घेत नाहीत. कारण लोअर बर्थवर प्रवासी रात्री उशिरापर्यंत बसून राहतात. त्यामुळे मिडल बर्थ असणाऱ्या प्रवाशाला समस्या येते. या व्यतिरिक्त काही वेळेस मिडल बर्थवर बसणारा पॅसेंजर ट्रेन सुटल्यानंतर लगेच आपला बर्थ उघडतो. त्यामुळे लोअर बर्थला बसलेल्या लोकांना समस्या येते.

Train Berth Seats
Train Berth Seats

ट्रेनमध्ये मिडल आणि लोअर बर्थ संदर्भातील ‘हे’ आहेत नवे नियम
प्रवासादरम्यान ट्रेनमध्ये बर्थ संदर्भात होणाऱ्या असुविधेला लक्षात घेता भारतीय रेल्वेने काही नियम बनवले आहेत. रेल्वेच्या या नियमानुसार, मिडल बर्थ असणारा प्रवासी रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत आपला बर्थ उघडू शकतो. परंतु जर त्या आधी त्याने आपला बर्थ उघडला तर त्याला तुम्ही तसे करण्यापासून रोखू शकता. त्याचप्रमाणे जर तुमचे मिडल बर्थ आहे आणि लोअर बर्थ असणारा प्रवासी हा तुम्हाला बर्थ उघडण्यास थांबवत असेल तर तुम्ही त्याला रेल्वेच्या या नियमाची माहिती देऊन आपला बर्थ उघडू शकता.

तसेट सकाळी ६ वाजल्यानंतर मिडल बर्थ मधील प्रवाशाला आपला बर्थ खाली करावा लागतो. ज्यामुळे लोअर बर्थच्या येथे प्रवासी बसतील. लोअर बर्थवरील प्रवाशांना उठून बसावे लागेल. असे करण्यासाठी नकार देणाऱ्या प्रवाशाला तुम्ही हा नियम सांगू शकता. (Train Berth Seats)

हे देखील वाचा- रेल्वेवर असलेली गोलाकार झाकणं ही प्रवाशांना कशी सुरुक्षित ठेवतात? जाणून घ्या

रेल्वे प्रवासासंदर्भात आणखी काही नियम आहेत जे प्रवाशांसाठी तयार करण्यात आलेले आहेत. एका नियमानुसार, ट्रेनमध्ये प्रवास करताना रात्री १० नंतर TTE तुम्हाला तिकिट तपासणीसाठी त्रास देऊ शकत नाही. रेल्वेच्या नियमानुसार, TTE सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंतच तिकिटाची तपासणी करु शकतो. दरम्यान, हा नियम त्या प्रवाशांना लागू होत नाही जे रात्री १० नंतर प्रवास करणार असतात.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.