जर तुम्ही सुद्धा अज्ञात क्रमांकावरुन वारंवार येणाऱ्या फोन कॉल्समुळे त्रस्त असाल तर आता त्यावर लगाम बसणार आहे. कारण अशा फोन कॉल्सला चाप बसण्यासाठी मोबाईलवर फोन करणाऱ्या व्यक्तीचे नाव दिसण्याच्या व्यवस्थेसंदर्भात ट्रायने सार्वजनिक सल्लामसलीतला सुरुवात केली आहे. टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI) एका विधानात असे म्हटले आहे की, दूरसंचार नेटवर्कमध्ये कॉल करणाऱ्या व्यक्तीचे खरं नाव दाखवण्याची व्यवस्था लागू करण्यासंदर्भातील एक पत्र जारी केले आहे.
२७ डिसेंबर पर्यंत सल्ला मागितला
जर ही व्यवस्था लागू झाल्यास मोबाईलवर कॉल करणाऱ्या व्यक्तीबद्दल तुम्हाला कळू शकणार आहे. यामुळे व्यक्तिची माहिती स्क्रिनवर दिसणार आहे, ज्याच्या नावे सिम कार्डचे रजिस्ट्रेशन झाले आहे. जारी करण्यात आलेल्या पत्रावर पक्षांना २७ डिसेंबर पर्यंत सल्ला मागितला आहे. मिळणाऱ्या सल्ल्यांवर १० जानेवारी २०२३ पर्यंत उत्तरे दिली जातील.
सध्या या अॅपवर मिळते सुविधा
आता पर्यंत ट्रुकॉलर आणि भारत कॉलर आयडी अॅन्ड एंन्टी स्पॅम सारखे मोबाईल अॅपच्या मदतीने तुम्ही तुम्हाला आलेल्या क्रमांकावरुन व्यक्तीला ओळखू शकता. मात्र या अॅपवर दिसणारे नाव पूर्णपणे विश्वासू स्रोतावर आधारित नसतात.
फिचर फोनवर सुद्धा मिळणार ही सुविधा
ट्रायच्या मते, दूरसंचार विभागाचे असे म्हणे आहे की, सीएनएपी सुरु झाल्यानंतर कोणत्याही मोबाईल फोन धारकाला फोन आल्यानंतर कॉलरची ओळख करता येऊ शकते. या सुविधेला स्मार्टफोनसह फिचर फोनवर सुद्धा वापर करण्यासाठी दूरसंचार नेटवर्कची तयारी आणि व्यवहार्यताही तपासली जाईल. (TRAI)
दरम्यान, देशातील दूरसंचाक कंपन्यांच्या एकूण मोबाईल ग्राहकांची संख्या या वर्षातील सप्टेंबर महिन्यादरम्यान ३६ लाखांनी कमी झाली आहे. ट्रायने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, वोडाफोन आयडियाच्या ग्राहकांच्या संख्येत फार मोठी घट झाली आहे. तर रिलायंन्स जिओ आणि भारती एअरटेलने ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर मध्ये अधिक नवे ग्राहक जोडले आहेत. तर ट्रायने सप्टेंबर महिन्यातील आकडेवारी जाहीर करत असे म्हटले की, ऑगस्ट २०२२ च्या अखेर पर्यंत दूरसंचाक कंपन्यांच्या मोबाईल ग्राहकांची संख्या ११४.९१ कोटी होती. मात्र ती सप्टेंबरच्या अखेरीस ०.३२ टक्क्यांनी कमी होऊन ११४.५४ कोटी झाली.
हे देखील वाचा- Facebook युजर्सने कधीच करु नयेत ‘या’ चूका अन्यथा बँक खाते होईल रिकामे
या उसट रिलायंन्स जिओने सप्टेंबर महिन्यात ७.२ लाख नवे ग्राहक जोडत मार्केटमध्ये आपली स्थिती आणखी मजबूत केली. भारती एअरटेल यांच्या कनेक्शनमध्ये सुद्धा ४.१२ लाखांची वाढ झाली आहे.