Home » Traffic Signal : ट्रॅफिक सिग्नलचा शोध कसा लागला?

Traffic Signal : ट्रॅफिक सिग्नलचा शोध कसा लागला?

by Team Gajawaja
0 comment
Traffic Signal
Share

वाहतूक नियंत्रित करण्यासाठी आणि आपल्या तळपायाची आग मस्तकात घालवण्यासाठी शहरात चौकाचौकात ट्रॅफिक सिग्नल असतात. काही शहाणी माणसं त्याला इगनोर करून गाडी चालवत असतात. आपल्या आयुष्यातील 60 सेकंद त्याच्यामुळे रस्त्यावर वाट पाहण्यात जात असली, तरी त्यामुळे रस्त्यावर गाड्यांची गर्दी न होता प्रवास सुरळीत राहतो. पण ही ट्रॅफिक सिग्नलची आयडिया आली कुठून? पहिलं ट्रॅफिक सिग्नल कुठे वापरलं गेलं होतं? ट्रॅफिक सिग्नलचा इतिहासच जाणून घेऊ. (Traffic Signal)

युरोपमध्ये औद्योगिक क्रांतीनंतर शहरांचा विकास झपाट्याने झाला. तेव्हा रस्त्यावर घोडागाडी, बग्गी यांची संख्या वाढली. लंडनमध्ये सुद्धा असंच झालं होतं. घोडे, गाड्या आणि प्रवाशांनी लंडनचे रस्ते गजबजलेले असायचे. त्यात लंडनच्या पार्लियामेंट स्क्वायर चौकात रोज कोणाचा ना कोणाचा घोड्यांना धडकून अपघात होत होता. या अशा आपघतांमुळे हजारहूंंन अधिक लोक मरण पावले होते आणि तेवढेच लोक जखमी झाले होते. हे इंजिनिअर जे. पी. नाईट यांच्या लक्षात आलं, आणि त्यांनी यावर उपाय काढण्याचे प्रयत्न सुरू केले.

जे.पी. नाईट हे रेल्वे ऑपरेटर सुद्धा होते. त्यामुळे रेल्वे सिग्नलिंगवर आधारीतच रसत्यांसाठी एक नियंत्रित सिस्टम असायला हवी असं त्यांनी सुचवलं. मग रेल्वे सिग्नलिंगवर आधारित सेमाफोर सिस्टम वापरण्याचा निर्णय घेतला गेला. या आधारावर पहिला सिग्नल १८६८ साली बनवला गेला. रेल्वे इंजिनिअर जे. पी. नाइट यांनीच ही सिस्टीम तयार केली. या सिस्टीममध्ये दोन वेगवेगळ्या रंगांच्या फळ्या होत्या. हे सिग्नल चालवण्यासाठी पोलिसांना नेमलं गेलं. जर पोलिसाने एक फळी आडवी केली, तर “थांबा” असा इशारा मिळायचा. जर फळी तिरकी म्हणजेच ४५ अंशाच्या कोनात असेल, तर तो सावधानतेचा इशारा असे. रात्री ही सिस्टिम वापरता येत नव्हती, त्यामुळे मग म्हणून रात्रीच्या वेळी गॅस लाइट्स वापरल्या गेल्या. (Traffic Signal)

जगातील पहिला ट्रॅफिक सिग्नल ९ डिसेंबर १८६८ लंडनमधील पार्लमेंटजवळ जॉर्ज आणि ब्रिज स्ट्रीटच्या चौकात बसवण्यात आला. पण हे ट्रॅफिक सिग्नल सिस्टम फार काळ टिकलं नाही. अपघात होऊ नये म्हणून बनवलेल्या या ट्रॅफिक सिग्नलचाच अपघात झाला. जानेवारी १८६९ मध्ये गॅस लाईट्सचा स्फोट झाला आणि ते ऑपरेट करणारा पोलिस अधकारी जखमी झाला. इथेच जे. पी. नाइटच्या यांच्या ट्रॅफिक सिग्नलचा the end झाला. जे. पी. नाइटच्या यांचा ट्रॅफिक सिग्नल फार काल टिकला नसला, तरी त्यामुळे बऱ्याच ठिकाणी त्यांच्या सेमाफोर सिस्टमचा वापर वाहतून नियंत्रणासाठी केला गेला.(Story)

जगभरात अशी वाहतूक नियंत्रण यंत्रणा वापरली गेली. १९१०-१९२० च्या दशकात, अमेरिकेतील काही शहरांमध्ये सेमाफोर ऑपरेटर्ससाठी लहान छोटे बूथ्स उभे केले गेले. यामुळे त्यांना ट्रॅफिकचा चांगला अंदाज येऊ शकेल, आणि गाड्यांपासून सुरक्षितही राहता येईल. हे बूथ्स चौकाच्या मध्यात किंवा बाजूला, थोड्या उंचीवर असायचे. (Traffic Signal)

==============

हे देखील वाचा : Ganesh Idols : POP च्या गणेश मूर्ती आता बंद होतील का ?

==============

अमेरिकेतच जगातील पहिला विजेवर चालणारा ट्रॅफिक सिग्नल तयार केला गेला. ५ ऑगस्ट १९१२ रोजी, अमेरिकन ट्रॅफिक सिग्नल कंपनीने ट्रॅफिक लाईट्स यशस्वीपणे तयार केली. आणि ओहायो राज्यातील क्लीव्हलँडमधील युक्लिड अव्हेन्यू येथे ही लाईट्स बसवण्यात आली. या सिग्नल्समध्ये सुरुवातीला फक्त दोन रंग होते – लाल आणि हिरवा. यामध्ये एक बझर देखील जोडला गेला होता, जो सिग्नल बदलताना वाजत असे. आपल्या भारतात भारतामध्ये पहिल्या ट्रॅफिक लाइट्स १९२८ साली कोलकातामध्ये बसवण्यात आल्या होत्या, त्या वेळेस एस्प्लानेड आणि डालहौसी स्क्वेअरच्या चौकात, नंतर काही दशकांनी भारतातील मोठ्या शहरांमध्ये सुद्धा त्याचा वापर केला गेला. (Traffic Signal)

वाहतूकीशी रीलेटेड तुमच्यासाठी आणखी एक बोनस फॅक्ट.. ट्रॅफिक सिग्नल प्रमाणेच माणूस आणखी एका गोष्टीला वैतागतो ते म्हणजे स्पीडब्रेकर्स.. या स्पीड ब्रेकरच सुद्धा अपघात टाळण्यासाठी निर्माण केले गेले. स्पीड ब्रेकरची आयडिया सुचली ती Nobel Prize-winning physicist आर्थर होली कॉम्पटन यांना. तर स्पीड ब्रेकर असू द्या नाहीतर ट्रॅफिक सिग्नल यामुळे आज आपण सुरक्षितपणे रस्त्यावर प्रवास करू शकतो. जरी आपण कधी कधी ट्रॅफिक सिग्नल इगनोर करत असलो. तरीही हा शोध महत्त्वाचा आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.