Home » Tanha Pola : महाराष्ट्रातील ‘तान्हा पोळ्या’ची अनोखी परंपरा

Tanha Pola : महाराष्ट्रातील ‘तान्हा पोळ्या’ची अनोखी परंपरा

by Jyotsna Kulkarni
0 comment
Tanha Pola
Share

श्रावणात साजऱ्या होणाऱ्या अमावास्येला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोळ्याचा सण साजरा केला जातो. या दिवशी शेतकऱ्यांचा खरा मित्र आणि बळीराजाच्या खांद्याला खांदा लावून वर्षभर शेतीत मशागत करणाऱ्या बैलाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते. बैलांना छान तयार करून त्यांना गोडाधोडाचे जेवण दिले जाते, त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते या दिवशी बैलांना शेतीच्या कामातून सुट्टी असते. असा पोळ्याचा सण महाराष्ट्रामध्ये अतिशय जल्लोषात साजरा होतो. खासकरून गावाकडे तर यादिवशी एक वेगळेच वातावरण पाहायला मिळते. मात्र तुम्हाला माहित आहे का? की महाराष्ट्रामध्ये पोळा सण साजरा झाला की, दुसऱ्या दिवशी ‘तान्हा पोळा’ देखील साजरा होतो. (Marathi)

आता अनेकांसाठी ‘तान्हा पोळा’ हा शब्दच नवीन असेल त्यामुळे हा सण आणि त्याबद्दलची माहिती नसेलच. आज आपण याच तान्हा पोळा सणाबद्दल माहिती जाणून घेऊया. तान्हा पोळा हा सण महाराष्ट्रातील काही ठराविक भागातच साजरा केला जातो. या सणाला शेकडो वर्षांची मोठी परंपरा आहे. तान्हा पोळा हा सण विदर्भात बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी साजरा होणारा तान्हा पोळा हा लक्षवेधी असतो. यवतमाळ जिल्ह्यातील गावागावात ही परंपरा जोपासली जात आहे. (Marathi News)

नागपूरसह विशेषतः पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीनं पोळ्याचा सण साजरा केला जातोय. राज्याच्या इतर भागात ज्या प्रकारे बैल पोळा साजरा केला जातो, अगदी त्याचप्रकारे तान्हा पोळ्याचा हा उत्सव साजरा केला जातो. मात्र, पोळ्याच्या पाडव्याला विदर्भात तान्हा पोळा साजरा करण्याची परंपरा आहे. ही परंपरा गेल्या २१७ वर्षांपासून आजही सुरू आहे. (Todays Marathi Headline)

Tanha Pola

कसा साजरा होतो तान्हा पोळा?
विदर्भात बैल पोळाला मोठा पोळा आणि दुसऱ्या दिवशी साजरा होणारा तो तान्हा पोळा असतो. या दिवशी लहान मुले आपआपल्या लाकडी बैलाला सजवतात. त्यानंतर एखाद्या जवळच्या मंदिरात किंवा मैदानावर हा तान्हा पोळा भरवल्या जातो. तो परिसर फुगे, तोरण, पताका लावुन सजविल्या जातो. प्रसंगी महादेवाची गाणी वाजविली जातात. नंदी बैल भगवान महादेवाचे वाहन असल्याकारणाने महादेवाच्या नावाचा जयजयकार केल्या जातो. त्यानंतर मुलांना काकडी व खोबऱ्याचा प्रसाद वाटप केल्या जाते. आणि पोळा फुटला असे जाहीर केल्या जाते. (Latest Marathi Headline)

लहान मुलांना कृषीप्रधान भारताची ओळख व्हावी, त्यांच्यावर चांगले संस्कार घडावे यासाठी नागपूरच्या भोसले घराण्याने ही परंपरा सुरु केली होती. शहरात पोळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा भरवण्याची परंपरा वर्षानुवर्ष सुरु आहे. यंदा लाकडी बैलांच्या तान्हा पोळ्यास २३५ वर्ष पूर्ण होत आहेत. भारत हा कृषी प्रधान देश असून भारतात सर्वत्र पोळा साजरा केल्या जातो. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे तान्हा पोळा या दिवशी लहान मुले लाकडी बैलांचा पोळा साजरा करतात. (Top Marathi News)

विदर्भ वगळता कुठेच हा पोळा साजरा केला जात नाही. १७८९ मध्ये दुसरे श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले यांनी हा उत्सव सुरु केला. लहान बालगोपालांना बैलाचे महत्व कळावे. म्हणून तान्हा पोळ्याची सुरुवात केली. श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले यांनी लाकडी बैल तयार करून मागविले व सर्व लहान मुलांना ते वाटण्यात आले. जिवंत बैलाप्रमाणे त्या बैलांना सजविण्यात आले. आंब्याचे तोरण लावून त्याला जिलेबी, फळं, आता चॉकलेट, बिस्कीट पुडे, अशा विविध वस्तूंनी तयार केलेले तोरण बांधून त्यामध्ये मुलांना उभे करून बैलांची पूजा करण्यात यायची. पूजा संपल्यानंतर तोरण तोडून पोळा फोडून वाजत गाजत हनुमान खिडकीचे दर्शन घेऊन हनुमानाला नारळ फोडून परत आल्यावर मुलांना खाऊ, पैसे, वाटण्यात यायचे. (Top Trending News)

या प्रथेला २३५ वर्षे पूर्ण झाले आहे. राजे मुधोजी महाराज भोंसले यांनी ही प्रथा आजही कायम ठेवली आहे. राजे मुधोजी महाराज भोंसले यांच्या वाड्यात सर्वात मोठा लाकडी बैल आहे. आज सुद्धा एवढा मोठा बैल भोंसले घराण्याकडे आहे. मुधोजीराजे यांच्या निवासस्थानी, सीनियर भोसला पॅलेस, महाल, नागपूर येथे हा बैल आहे. या लाकडी बैलांची उंची आठ फूट लांबी सहा फूट असून या बैलांच्या पायात चांदीचा तोडा घातला आहे. (Top Marathi News)

==============

हे देखील वाचा : Haritalika Vrat : जाणून घ्या हरितालिका व्रताचा मुहूर्त आणि पूजा विधी

Ganesh Chaturthi : गणेश चतुर्थी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त आणि शुभ वेळ

===============

ज्या पद्धतीने श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले (द्वितीय) वाजत गाजत मिरवणूक काढायचे त्याच परंपरेला अनुसरून दरवर्षीप्रमाणे यावर्षी मोठ्या प्रमाणात मिरवणूक निघाली. २३५ वर्षानंतर आजही प्रथा राजे मुधोजी महाराज भोंसले यांनी नियमीत ठेवली व यापुढेही सुद्धा ही प्रथा चालू राहील असे मत महाराजांनी व्यक्त केलेले आहे. (Social News)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.