दिवाळीचा मोठा सण सुरु झाला आहे. दिवाळी म्हणजे फराळ, फटाक्यांची आतिषबाजी, रांगोळी यासोबतच असते ती मोठी खरेदी. दिवाळीमध्ये अनेक लोकं महागडी खरेदी करतात. दिवाळीच्या पाच शुभ दिवसांचे औचित्य साधत दिवाळीमध्ये जोरदार खरेदी केली जाते. अनेक घरांमध्ये तर काही खरेदी या दिवाळीसाठी राखीव ठेवल्या जातात. दिवाळीमध्ये मोठ्या वस्तूंची जास्त प्रमाणात खरेदी केली जाते. यात टीव्ही, फ्रिज, विविध प्रकारच्या गाड्या, घरं, सोनं आदी गोष्टींचा समावेश होतो. मात्र मधल्या काही काळापासून दिवाळीमध्ये मोबाईल फोन्सची सर्वात जास्त विक्री होताना दिसते. (Mobiles)
आजच्या आधुनिक काळात मोबाईलचे वाढते वेड पाहता दिवाळी सारख्या सणामध्ये तर नवीन लेटेस्ट स्मार्ट मोबाईल घेण्याची इच्छा सगळ्यांची असते. मात्र दिवाळीमध्ये होणारा खर्च बघता अनेकदा लोकं मन मारून मोबाइल घेण्याचे टाळतात. मात्र आज आम्ही तुमच्यासाठी तुमच्या बजेटमध्ये बसणारे भन्नाट फीचर्स असलेले ट्रेंडिंग फोन घेऊन आलो आहोत. जे तुम्ही खरेदी करू शकता आणि मुख्य म्हणजे येणाऱ्या पाडव्याला बायकोला साडी न देता नवीन कोरा मोबाईल देऊ शकता. (Diwali)
Vivo V60e 5G
या स्मार्टफोनचा फोकस एरिया फोटोग्राफी आहे. या स्मार्टफोनमुळे दिवाळीत कॅमेऱ्याची कमतरता भासणार नाही. कॅमेरा-सेंट्रिक फोनमध्ये चांगला कॅमेरा सेटअप आणि फोटोज अधिक चांगलं बनवते. या स्मार्टफोनमध्ये 200MP चा प्राइमरी सेंसर लावला आहे, सेल्फसाठी कंपनीने या डिव्हाईमध्ये 50MP चा सेंसर दिला आहे. अॅमेझॉनवर हा स्मार्टफोन 30,000 रुपयांहून कमी किंमतीत खरेदी केला जाऊ शकतो. (Marathi News)
Samsung Galaxy M36 5G
Samsung Galaxy M36 5G मध्ये 6.70 इंचाचा डिस्प्ले आहे ज्याचे रिझोल्यूशन 2340x1080P आहे. हा फोन Samsung Exynos 1380 प्रोसेसरने सुसज्ज आहे, ज्यामध्ये 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे आणि 5000mAh बॅटरी आहे. फोनमध्ये 50MP+8MP+2MP रियर कॅमेरा आणि 13MP फ्रंट कॅमेरा आहे. (Todays Marathi Headline)
Realme 15 Pro 5G
हा एक ‘AI पार्टी फोन’ आहे. Realme 15 Pro 5G फोन लो-लाइट मध्ये देखील क्रिस्प डिटेलसह फोटो क्लिक करते. यामुळे, दिवाळीसाठी हा फोन एक उत्तम पर्याय असू शकतो. यात 50MP Sony IMX896 मुख्य कॅमेरा आणि 50MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. अमेझॉन सेल दरम्यान हा फोन डिस्काउंटसह खरेदी केला जाऊ शकतो. (Latest Marathi News)
Samsung Galaxy S24 FE 5G
Galaxy S24 FE 5G मध्ये 6.7-इंच FHD+ डिस्प्ले आहे, जो Exynos 2400e प्रोसेसरसह येतो. यात 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 12 मेगापिक्सलचा सेकंडरी रियर कॅमेरा आहे. 4700mAh ची बॅटरी दिवसभर टिकण्याची क्षमता देते. (Top Marathi Headline)
Nothing Phone (3a) Pro
Nothing Phone (3a) Pro त्याच्या अद्वितीय डिझाइन आणि शक्तिशाली वैशिष्ट्यांमुळे चर्चेत आहे. यात 6.77-इंच FHD+ डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 7s Gen3 प्रोसेसर आणि 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. सेल्फी प्रेमींसाठी 50 एमपीचा फ्रंट कॅमेरा योग्य आहे. (Marathi Trending Headline)
Motorola Edge 60 Fusion 5G
हा 6.67-इंच डिस्प्ले, 256GB स्टोरेज आणि डायमेंशन 7400 प्रोसेसरसह एक परवडणारा प्रीमियम फोन आहे. यात 50MP + 13MP रिअर कॅमेरा आणि 32MP फ्रंट कॅमेरा मिळतो. यात 5500mAh ची बॅटरी आणि 68W फास्ट चार्जर देखील आहे. (Top Marathi News)
Motorola G96 5G
या बजेट-फ्रेंडली 5G फोनमध्ये 6.67-इंच FHD+ डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन 7s Gen 2 प्रोसेसर आणि 5500mAh बॅटरी आहे. यात 50 मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा आणि 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे. 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज परफॉर्मन्सच्या बाबतीत मजबूत आहे. (Latest Marathi Headline)
OnePlus Nord 5 5G
30,000 रुपयांहून कमी किंमतीत खरेदी केल्या जाणाऱ्या स्मार्टफोनच्या यादीत OnePlus Nord 5 चा देखील समावेश आहे. हा स्मार्टफोन या रेंजमध्ये चांगला कॅमेरा ऑफर करतो. नॉर्ड 5 मध्ये 50MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे, यासोबतच रियर पॅनल 50MP Sony LYT 700 मेन आणि 8MP अल्ट्रावाइड सेंसरने सुसज्ज आहे. (Top Trending News)
vivo T4 Lite 5G
Vivo T4 Lite 5G अशा युजर्ससाठी आहे ज्यांना कमी बजेटमध्ये चांगला 5G फोन हवा आहे. यात 6.74 इंचाचा एचडी+ डिस्प्ले, 50MP + 2MP कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा आहे. याची 6000mAh बॅटरी बराच काळ टिकेल आणि Dimensity 6300 प्रोसेसरची परफॉर्मन्सही चांगली असेल. (Top Stories)
Moto g06 Power
Moto G06 Power त्याच्या नावाप्रमाणेच एक शक्तिशाली बॅटरीसह येतो. यात 7000mAh बॅटरी, 6.88-इंच HD+ डिस्प्ले आणि 50MP रिअर कॅमेरा आहे. Helio G81 प्रोसेसर त्याला एंट्री-लेव्हल सेगमेंटमध्ये सर्वोत्तम पर्याय बनवते. (Social News)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics