जर तुम्हाला वीकेंडला कमी पैशात ॲडवेंचर ट्रिपला जायचं असेल, तर तुमच्याकडे अनेक पर्याय आहेत. तुम्हाला तुमच्या मित्रांसह, जोडीदारासह किंवा कुटुंबासह भेट देण्यासाठी देशभरात अनेक ठिकाणे सापडतील. पण रोड ट्रिप हा अनेकांचा आवडता पर्याय आहे. (Road Trip Destinations)
कोरोना काळात तर, कोविडपासून बचाव करण्यासाठी लोक गर्दीच्या प्रवासाऐवजी, रोड ट्रिपला प्राधान्य देऊ लागले. रोड ट्रिप हा एक वेगळा आणि साहसी अनुभव असतो.
रोड ट्रिपचा फायदा म्हणजे तुम्ही तुमच्या राहत्या घरापासून ट्रिपची योजना करू शकता. प्रवासादरम्यान, अनेक सुंदर ठिकाणे, टेकड्या, जंगले, स्थानिक ठिकाणचे स्वादिष्ट खाद्यपदार्थांची लज्जत अनुभवायला मिळते.
भारतात असे काही मार्ग आहेत, ज्या मार्गांवरचा प्रवास नेहमीच रोमांचक, नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण आणि मजेदार अनुभव असतो. या मार्गांद्वारे, तुम्ही सर्वोत्तम रोड ट्रिपचा आनंद घेऊ शकता. चला तर जाणून घेऊया, रोड ट्रिपसाठी भारतातील सर्वोत्तम ठिकाणांबद्दल. (Road Trip Destinations)
१. दिल्ली ते लेह
जर तुम्ही तुमची रोड ट्रिप दिल्लीपासून सुरू करत असाल, तर तुम्हाला अनेक सुंदर आणि रोमांचक ट्रिपचे पर्याय मिळू शकतात. तुम्ही दिल्ली ते जयपूर, दिल्ली ते आग्रा, दिल्ली ते मनाली जाऊ शकता. (Road Trip Destinations)
जर तुम्हाला डोंगरावर जायचे असेल, तर तुम्ही दिल्ली ते मनाली आणि नंतर मनाली ते लेह अशा रोड ट्रिपला जाऊ शकता. दिल्ली ते लेह हे अंतर सुमारे १०२० किमी आहे. तुम्ही दिल्ली ते लेह रोड ट्रिप एकूण २५ तासांत पूर्ण करू शकता.
२. चंदीगड ते कसोल
वीकेंडला कसोलला जाण्याचा प्लॅन असेल, तर कसोलपर्यंत रोड ट्रिपचा प्लॅन करता येईल. दिल्लीहून कसोलला जाता येते. तुम्ही दिल्ली ते चंदीगडला कसोल मार्गे देखील जाऊ शकता. चंदीगड ते कसोल हे अंतर अंदाजे २७३ किलोमीटर आहे. मित्र किंवा कुटुंबासह कसोलला जाताना निसर्गाचे सुंदर नजारे पाहता येतात.
३. मुंबई ते गोवा
रोड ट्रिपसाठी मुंबई ते गोवा हा प्रवासही खूप रोमांचक असेल. मुंबई ते गोवा प्रवास कमी बजेटमध्ये अधिक मनोरंजक असेल. जिथे तुम्हाला अनेक सुंदर धबधबे आणि अनेक लहान पर्वत वाटेत पाहायला मिळतील. तुम्ही मुंबई ते गोवा हा प्रवास ११-१२ तासात पूर्ण करू शकता.
४. गुवाहाटी ते तवांग
भेट देण्यासाठी तवांग हा एक उत्तम पर्याय आहे. तवांग बौद्ध संस्कृतीचा वारसा सांभाळत आहे. येथे अनेक सुंदर मठ आहेत. तुम्ही गुवाहाटीहून तवांगला रस्त्याने जाऊ शकता. वाटेत सुंदर पर्वत, सुंदर तलाव आणि घनदाट जंगले दिसतात. गुवाहाटी ते तवांग हा प्रवास अगदी सहज आणि कमी पैशात करता येतो. (Road Trip Destinations)
=====
हे देखील वाचा – इच्छापूर्ती करणारे तेलंगणांचे यदाद्री मंदिर
=====
५. जयपूर ते जैसलमेर
राजस्थानमधील अनेक शहरे त्यांच्या सुंदर, शाही वातावरणाने, किल्ल्यांनी आणि सुंदर दृश्यांनी परिपूर्ण आहेत. तुम्ही जयपूर ते जैसलमेर असा रोड ट्रिप प्लॅन करू शकता. जयपूर ते जैसलमेर हे अंतर सुमारे ५५५ किलोमीटर आहे. येथे प्रवास करण्यासाठी एकूण १० तास लागू शकतात, जिथे वाळवंट ते वाटेतील पर्वतांमधील प्रवास म्हणजे एक वेगळा आणि आनंददायी अनुभव असेल. प्रवासादरम्यान तुम्ही उत्कृष्ट स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद देखील घेऊ शकाल.