Home » हिंदुराष्ट्र: जगातील ‘या’ १० देशात आहेत सर्वाधिक हिंदू; पाच नंबरचा देश तर हिंदूंचं करतोय धर्मांतर

हिंदुराष्ट्र: जगातील ‘या’ १० देशात आहेत सर्वाधिक हिंदू; पाच नंबरचा देश तर हिंदूंचं करतोय धर्मांतर

by Team Gajawaja
0 comment
हिंदुराष्ट्र
Share

हिंदुराष्ट्र

अखंड हिंदुराष्ट्र ही संकल्पना सध्यातरी दिवास्वप्न म्हणावं लागेल. कारण संपूर्ण जगात असा एकही देश अस्तित्वात नाही. संपूर्ण हिंदुराष्ट्र असणारा एकही देश नसला तरीही जगातील काही देशांमध्ये हिंदूंची लोकसंख्या लक्षणीय आहे. हिंदू हा सर्वात प्राचीनआणि पृथ्वीवर सर्वात पहिल्यांदा अस्तित्वातआलेला धर्म आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. हिंदू धर्मातूनच पुढे वेगवेगळे फाटे फुटून अनेक धर्म तयार झाले. आजच्या लेखात आपण सर्वाधिक हिंदू लोकसंख्या असणाऱ्या देशांची माहिती घेणार आहोत. चला तर मग, जाणून घेऊया सर्वात जास्त हिंदू लोकसंख्या असणारे देश कोणते आहेत.

१. भारत- 

भारत देशाला हिंदुस्थान सुद्धा म्हणले जाते कारण भारतात सर्वाधिक हिंदू लोक राहतात. तसेच याच भारतातून हिंदू धर्म उदयास आला होता. भारतातील ७९.८% लोकसंख्या हिंदू आहे. म्हणजेच भारताच्या १ अब्ज ३२ कोटी लोकसंख्येपैकी १ अब्ज ४ कोटी लोक हिंदुधर्मीय आहेत.

२. नेपाळ- 

भारतानंतर जगात सर्वाधिक हिंदू असलेला देश म्हणजे नेपाळ होय. नेपाळमध्ये हिंदूंची लोकसंख्या ३८.१२ दशलक्ष आहे.  २०११ नेपाळच्या जनगणनेत, सुमारे ८१.३ टक्के नेपाळी लोकांनी स्वतःला हिंदू असल्याचे सांगितले. २००६ पूर्वी हा नेपाळ संपूर्णपणे ‘हिंदूराष्ट्र’ होते.  त्यांनतर या देशाने स्वतःला धर्मनिरपेक्ष घोषित केले.

३. मॉरिशस- 

हिंदुबहुल देशांच्या यादीमध्ये तिसरा क्रमांक मॉरिशस हा देश येतो. या देशातील एकूण लोकसंख्येपैकी ४९% लोकसंख्या हिंदुधर्मीय आहे. म्हणजेच देशाच्या १२ लाख ५० लोकसंख्येपैकी ६ लाख लोक हिंदुधर्मीय आहेत.

Look who's saying threats to Hinduism are imaginary- The New Indian Express

४. बांगलादेश- 

बांगलादेश हा जगातील चौथा देश असेल जिथे जास्तीत जास्त हिंदू स्थायिक आहेत. २०११ मध्ये या देशात झालेल्या जनगणनेवरून असे दिसून आले आहे की येथे हिंदू धर्म हा पहिला अल्पसंख्याक आहे, ज्यात सुमारे ८.९६% लोकसंख्या आहे.

५. पाकिस्तान- 

असे म्हणले जाते की, भारताच्या शेजारील देश पाकिस्तानमध्ये एकेकाळी १६% लोक हिंदू होते. मात्र आजच्या समयी या देशात फक्त २% हिंदू राहिले आहेत. यामागे एकमेव कारण म्हणजे जबरदस्तीने किंवा नाईलाजाने केलं गेलेलं धर्मांतर.

६. श्रीलंका- 

श्रीलंकेत १२.०६% लोक हिंदू धर्माला मानतात. इथे २६ लाख लोकसंख्या केवळ हिंदू धर्मीय लोकांची आहे.

७. अमेरिका:- 

अमेरिकेमध्ये हिंदूंची लोकसंख्या तब्बल २१ लाख इतकी आहे. अमेरिकेच्या लोकसंख्येच्या सरासरी विचार केला तर, अमेरिकेत हिंदूंची लोकसंख्या ०.७०% इतकी आहे. हे सर्व हिंदू मूळचे भारतीय असून नंतर अमेरिकेमध्ये स्थायिक झाले आहेत.

८. मलेशिया- 

मलेशिया देशात हिंदूंची जनसंख्या तब्बल २ मिलियन इतकी आहे. या देशातील इतर धर्मीय लोकांच्या सरासरी मलेशियात ०६.०३% लोक हिंदू आहेत.

Hindu Pushups | Hindu Blog

९. युनायटेड किंगडम:- 

या देशात एकूण हिंदूंची लोकसंख्या ८ लाख आहे. विशेष म्हणजे या देशात हिंदू पद्धतीने दिवाळी सण सुद्धा साजरा केला जातो.

हे ही वाचा: अरे बापरे, भारतात आहेत दोन ताजमहाल! आग्र्याचा ताजमहाल दुसरा; तर मग पहिला कुठे आहे? वाचा सविस्तर.

घुबड – एक रहस्यमय पक्षी; शेतकऱ्यांचा मित्र

गुगल चक्क बकऱ्यांना देते पगार! गुगलचा ‘हा’ किस्सा वाचून तुम्हीपण कराल गुगलचे कौतुक…

१०. इंडोनेशिया-

 इंडोनेशियामध्ये ९०% लोक इस्लाम धर्म मानतात, पण असे असले तरी देखील या देशात तब्बल ४४ लाख लोक हिंदू धर्माला मानतात. त्यामुळे या देशात इतर धर्म वगळता १.०७% लोक हिंदू आहेत.

-निवास उद्धव गायकवाड


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.