बिस्किटे हा असा खाद्यपदार्थ आहे जो दूरचित्रवाहिनी पाहताना, पेपर वाचताना आणि कधी मोकळा वेळ मिळाला तर आवडीने खाल्ले जातात. सकाळी असो किंवा संध्याकाळ चहासोबत बिस्किटे आवर्जून खाल्ली जातात.
बिस्किटे न आवडणारी व्यक्ती शोधावीच लागेल. सर्वात जास्त आवडीचे टॉप १० बिस्कीट ब्रँड्स कोणते (Top 10 Biscuit Brands), असं विचारलं तर, प्रत्येकाची मते वेगवेगळी असतील. पण आज आपण भारतामधील टॉप १० बिस्कीट ब्रॅन्ड्स कोणते, बद्दल माहिती घेऊया. (Top 10 Biscuit Brands)
१. पार्ले बिस्कीट
पार्ले हा बिस्कीट ब्रँड म्हणजे भारतातील प्रसिद्ध ‘पार्ले जी’. १९२९ साली स्थापन झालेल्या बिस्कीट आणि मिठाई उत्पादन करणारी कंपनी केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरही लोकप्रिय आहे. इतकंच नाही तर, पार्ले जी हा जगभरात सर्वात जास्त विक्री केला जाणारा बिस्कीट ब्रँड आहे. यामध्ये चीझलिंग्स, मोनॅको, क्रॅक जॅक, हाईड अँड सिक, मिलानो असे अनेक प्रकार आहेत.

२. मॅक्वीटी बिस्कीट
मॅक्वीटी बिस्कीट ब्रँड हा ब्रिटिश बिस्कीट ब्रँड आहे. २०१० साली उच्चांकी विक्री केल्यानंतर भारतीय बाजारपेठेत प्रवेश केला. त्यावेळी त्यांनी भारतामधील ६ महानगरांपासून विक्रीस सुरुवात केली. मॅक्वीटी बिस्किट गव्हाच्या पिठापासून बनवली जातात. या ब्रँडच्या जाहिरातीमध्ये बिपाशा बासू आणि काजोल या अभिनेत्री या पौष्टिक बिस्किटांबद्दल माहिती देताना दिसत होत्या.
३. प्रियागोल्ड बिस्कीट
प्रियागोल्ड बिस्कीट हे देशभरात आवडीने खाल्ले जाणारे बिस्कीट आहे. त्यांचा छत्री हा ब्रँड असून ते या अंतर्गत बिस्कीट आणि इतर उत्पादने विकत असतात. सूर्या फूड अँड ॲग्रो लिमिटेडची स्थापना श्री पी बी अग्रवाल आणि त्यांच्या मुलांनी १९९४ मध्ये केली होती. आज कंपनीचे चार ठिकाणी कारखाने असून ग्रेटर नोएडा, सुरत, ग्वाल्हेर आणि हरिद्वार या ठिकाणांचा यात समावेश होतो.
४. Dukes बिस्कीट
हैद्राबाद येथे Dukes कंपनीचे मुख्य कार्यालय असून रवी फूड्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या अंतर्गत ते बनवले जातात. कंपनीने भारतात मोठ्या प्रमाणावर जाळे विस्तारले असून उत्पादनाची आणि कारखान्यांची गुणवत्ता राखण्यासाठी आधुनिक प्रयोगशाळा उभारली आहे. या ब्रँडची क्रीमची बिस्किटे तर विशेष लोकप्रिय आहेत.

====
हे देखील वाचा: हापूसपेक्षाही लोकप्रिय आहे आंब्याची ‘ही’ जात! वाचाल तर थक्क व्हाल
====
५. युनिबिक बिस्किट
युनिबिक बिस्किटे खाणारा भारतात एक विशिष्ट असा वर्ग आहे. युनिबिक इंडिया ही युनिबिक ऑस्ट्रेलियाची उपकंपनी असून बंगलोर येथून त्यांची उत्पादने उत्पादित केली जातात. सुरुवातीला कंपनी ऑस्ट्रेलिया देशातून उत्पादने आयात करत होती, पण आता भारतातच बिस्किटांचे उत्पादन केले जाते.
या बिस्किटाच्या श्रेणीत चॉकलेट्स, ड्रायफ्रूट्स, शुगर फ्री बिस्किटांचा समावेश केला जातो. या बिस्किटांमध्ये च्यवनप्राश सारख्या घटकांचा समावेश करून निरोगी बिस्किटांच्या यादीत स्पर्धा निर्माण करत आहे.
६. बिस्क फार्म बिस्कीट
बिस्क फार्म हे लोकप्रिय बिस्कीट असून त्याचे उत्पादन साज फूड प्रॉडक्टअंतर्गत केले जाते. त्याची स्थापना २००० सालामध्ये करण्यात आली असून भारतात खप होणाऱ्या प्रसिद्ध बिस्किटांपैकी हा अत्यंत लोकप्रिय ब्रँड आहे. सध्याच्या घडीला त्यांचे दक्षिण आणि पूर्व भारतात अत्याधुनिक कारखाने आहेत.
७. कॅडबरी बिस्कीट
कॅडबरी कंपनी प्रसिद्ध असून त्यांचे भारतात विविध फ्लेवर्स मध्ये बिस्कीट मिळतात. त्यांचे ओरिओ हे बिस्कीट सर्व वयोगटांमध्ये प्रचंड आवडीने खाल्ले जाते. कॅडबरी इंडिया २०१४ पासून मोंडेलेज इंडिया फूड्स लिमिटेड अंतर्गत या कंपनीचे उत्पादन घेतली जातात. हा बदल जागतिक स्तरावर करण्यात आला आहे. (Top 10 Biscuit Brands)

====
हे देखील वाचा: क्रिकेटच्या दुनियेतला अवलिया ‘इंजिनियर’!
====
८. अनमोल बिस्कीट
अनमोल बिस्कीट हा भारतीय ब्रँड असून त्याची स्थापना १९९४ साली साली. कोलकत्ता येथून छोट्या प्रमाणावर व्यवसाय सुरु केलेली ही कंपनी आता चक्क टॉप १० कंपन्यांपैकी एक कंपनी बनली आहे. या कंपनीकडे बिस्किटे आणि केकचे विविध प्रकार असून अनुक्रमे ६१ आणि २६ प्रकारची उत्पादने उत्पादित केली जातात. पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, बिहार आणि ओडिशामध्ये या बिस्किटांना विशेष मागणी आहे.
९. सनफिस्ट बिस्कीट
आयटीसी कंपनीच्या सनफिस्ट ब्रँडची सर्वच उत्पादने लोकप्रिय आहेत. या बिस्किटांची आवड असणारा देशभरात एक खास खवय्या वर्ग आहे. बिस्कीट क्षेत्रामध्ये हा ब्रँड आघाडीवर आहे. आयटीसीने २००३ साली बिस्किटे बाजारात आणली त्यानंतर जस जशी मागणी वाढत गेली तस तशी त्याची उत्पादने वाढवण्यात आली आहेत.
१०. ब्रिटानिया बिस्किट
ब्रिटानिया इंडस्ट्रीजचे मुख्य कार्यालय बंगळूर येथे आहे. ब्रिटानिया ब्रँड अंतर्गत बिस्किटे, केक आणि ब्रेड यांसारखी बेकरी उत्पादने आणि दही, चीज, दूध, फ्लेवर्ड मिल्क इत्यादींसह दुग्धजन्य पदार्थांचा समावेश आहे. १८९२ मध्ये कोलकत्ता येथून त्यांनी कंपनीची स्थापना केली होती. सर्वात लोकप्रिय ब्रिटानिया बिस्किटांमध्ये गुड डे, मेरी, लिटिल हार्ट्स, जिम जॅम, प्युअर मॅजिक आणि टायगर बिस्किटे आहेत.