महिला आपण सुंदर दिसावे म्हणून ब्युटी ट्रिटमेंट करत असतात. अशातच पिंपल्स आल्यानंतर त्या अधिक चिंतेत पडतात. पिंपल्स घालवण्यासाठी नक्की काय करावे याचा अधिक विचार करतात. सध्या मार्केटमध्ये पिंपल्स पासून सुटका मिळवण्यासाठी काही प्रकारचे प्रोडक्ट्स ही मिळतात. पण काही लोक डॉक्टरांकडे जाण्याऐवजी घरगुती उपाय करतात. पिंपल्स पासून सुटका मिळवण्यासाठी काही लोक टुथपेस्टचा सुद्धा वापर करतात. परंतु याचा वापर करणे तुमच्या त्वचेसाठी नुकसानकारक ठरु शकते. यामुळे त्वचेसंबंधित समस्या अधिक वाढू शकते. खरंतर टुथपेस्ट ही दात स्वच्छ करण्यासाठी तयार केली जाते.(Toothpaste for skin)
टुथपेस्ट तयार करण्यासाठी मेन्थॉल, बेकिंग सोडासह अन्य काही गोष्टींचा वापर केला जातो. अशातच तुम्ही ती पिंपल्स आलेल्या ठिकाणी लावली तर तुमच्या त्वचेला नुकसान होऊ शकते. याच बद्दल आपण अधिक जाणून घेऊयात.
-जळजळणे
टुथपेस्टमध्ये हाइड्रोजन पेरॉक्साइड, बेकिंग सोडा आणि मेन्थॉलचा वापर केल जातो. यामुळे त्वचेवर जळजळ होतो. टुथपेस्ट पिंपल्सच्या येथे लावल्यानंतर तेथील त्वचा कोरडी होते. यामुळे रेडनेस, जळजळ आणि खाज सु्द्धा येऊ शकते.
-एलर्जी
यामध्ये अशा काही गोष्टींचा वापर केला जातो ज्यामुळे तुम्हाला एलर्जी होऊ शकते. जेव्हा तुम्ही ते त्वचेवर लावता तेव्हा एलर्जी होण्याची शक्यता असते. या दरम्यान त्वचा कोरडी होतेच पण तुम्हाला खाज ही येत राहते.
-केमिकल बर्न
टुथपेस्टमध्ये फ्लोराइडचे प्रमाण अधिक असते. यामुळे तुमच्या त्वचेवर जळजळ होऊ शकते. तसेच यामुळे दुखते ही. तसे झाल्यानंतर ते ठिक होण्यास ही वेळ लागतो.
-डाग
पिंपल्सवर टुथपेस्ट लावल्यानंतर त्वचेवर डाग ही येऊ शकतात. यावेळी तुमच्या त्वचेवर जळजळ होते. त्यामुळेच त्याचे डाग येतात.
-पिंपल्स वाढतात
टुथपेस्ट लावल्यने पिंपल्सची समस्या ही पूर्णपणे बरी होत नाही. उलट ती अधिक वाढली जाते. यामुळे त्वचेत अधिक सीबम निर्माण होते. तेच तुमच्या पिंपल्सच्या अधिक वाढीमागील कारण ठरु शकते. (Toothpaste for skin)
हेही वाचा- भर उन्हात ठेवता येणार तेजस्वी चेहरा
दरम्यान, वाढत्या वयासह चेहऱ्यावर पिंपल्स येणे ही सामान्य बाब आहे. परंतु तुमची त्वचा अधिक तेलकट असेल आणि अधिक पिंपल्स येत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसेच बाहेरुन आल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. जेणेकरुन त्वचेला चिकटलेली धुळ व्यवस्थितीत निघेल आणि पिंपल्स सारखी समस्या ही दूर राहिल.