Home » अत्यंत वेदनादायक आणि अस्वस्थ असते टॉन्सिल्सची सूज, जाणून घ्या त्याची कारणे आणि उपाय

अत्यंत वेदनादायक आणि अस्वस्थ असते टॉन्सिल्सची सूज, जाणून घ्या त्याची कारणे आणि उपाय

by Team Gajawaja
0 comment
tonsils symptoms and treatment
Share

जर तुम्हाला घशात खवखवत असेल किंवा घसा दुखत असेल, तर या स्थितीकडे दुर्लक्ष करू नका. हे टॉन्सिलचे लक्षण असू शकते. टॉन्सिल ही अशी शारीरिक समस्या आहे, ज्यामुळे लोकांना खूप त्रास सहन करावा लागतो. टॉन्सिल हा एक प्रकारचा संसर्ग आहे, जो चुकीच्या आहारामुळे किंवा स्वच्छतेच्या अभावामुळे होऊ शकतो. या आजारात घशात खवखवते किंवा दुखते. असे काही आढळल्यास सामान्य सर्दी-खोकला म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्याऐवजी, त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. (tonsils symptoms and treatment)

या संसर्गामुळे घशात पुरळ उठते आणि जखमा तयार होऊ लागतात, यावरून टॉन्सिल्सची तीव्रता समजू शकते. दुसरीकडे, जर औषधाने आराम मिळत नसेल आणि वेदना वाढत असेल, तर हा संसर्ग घशात कर्करोगाचे रूप देखील घेऊ शकतो. अशा स्थितीत टॉन्सिलबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. टॉन्सिलची लक्षणे माहिती असल्यास, ते ओळखणे सोपे होते. तसेच, टॉन्सिल्सची कारणे काय आहेत, हे जाणून घेतल्यास या आजारापासून बचाव करता येतो. चला मग जाणून घेऊया की, टॉन्सिलची लक्षणे, कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय काय आहेत.

टॉन्सिल म्हणजे काय?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, टॉन्सिल हा घशाचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो घशाच्या दोन्ही बाजूला असतो. शरीराचे बाहेरील संसर्गापासून संरक्षण करणे, हे टॉन्सिलचे कार्य आहे. म्हणजेच, टॉन्सिल हे जीवाणू शरीरात जाण्यापासून रोखण्याचे काम करतात. मात्र, टॉन्सिलमध्ये कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाल्यास टॉन्सिल्स वाढू लागतात. त्यामुळे तुम्हाला बोलायलाही त्रास होतो आणि घशात वेदना होऊ लागतात. मात्र टॉन्सिलच्या संसर्गाने लहान मुलांना जास्त त्रास होतो. (tonsils symptoms and treatment)

टॉन्सिलची लक्षणे

– घसा खवखवणे

– अन्न गिळताना त्रास होणे

– कानाच्या खालच्या भागात वेदना होणे

– जबड्याच्या खालच्या भागात सूज येणे

– घसा खवखवणे

– अशक्तपणा, थकवा आणि चिडचिड होणे

– लहान मुलांना श्वास घेण्यात अडचण येणे. (tonsils symptoms and treatment)

टॉन्सिल्समध्ये संसर्ग होण्याची कारणे

टॉन्सिल्समध्ये संसर्ग होण्याचे कारण म्हणजे, तोंडातील घाण आणि चुकीचा आहार. टॉन्सिल्समध्ये संसर्ग हा सामान्य सर्दी- खोकला, बॅक्टेरिया किंवा घशाच्या संसर्गाच्या माध्यमातून होतो. (tonsils symptoms and treatment)

==========

हे देखील वाचा – एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवणयासाठी विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरतील ‘ही’ योगास

==========

टॉन्सिल्सच्या संसर्गावर उपचार

– टॉन्सिल्सचा संसर्ग झाल्यास मिठाच्या पाण्याने गुळणी करा.

– कोमट पाण्यात मध मिसळून घेतल्याने टॉन्सिल्सपासून आराम मिळतो.

– आल्याच्या पाण्याने गुळणी करूनही यापासून आराम मिळू शकतो.

– तुरटीची पावडर पाण्यात उकळून गुळणी गेल्याने, घशाचा संसर्ग बरा होतो. (tonsils symptoms and treatment)


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.