जगभरासह भारत काही गेल्या वर्षांपासून कोरोनाशी लढत आहे. अशातच मंकीपॉक्सीने चिंता वाढवली आणि आता आणखी एक नवा आजाराची एन्ट्री झाली आहे. हँड फुट माउथ डिजीज (HFMD) ज्याला टोमॅटो फीवर (Tomato Fever) अशा नावाने ओळखले जाते. हा आजार आता आरोग्य तज्ञांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. कारण हा लहान मुलांमध्ये वेगाने फैलावत आहे. लैंसेट रेस्पिरेटरी जर्नलच्या एका स्टडीनुसार ६ मे २०२२ रोजी केरळात पहिल्यांदाच टोमॅटो फ्लूचे प्रकरण समोर आले होते. आतापर्यंत त्याचे ८२ प्रकरणे दाखल झाली आहेत हा ताप एक ते पाच वर्षातील मुलांमध्ये आणि ज्या लोकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांना होत आहे.
लैंसेट स्टडीमध्ये असे सांगण्यात आले आहे की, ज्या प्रकारे आपण कोविड१९ च्या चौथ्या लाटेत संभावित धोक्यापासून लढत आहोत त्याच परिस्थितीत एक नवा वायरस ज्याला टोमॅटो फ्लू च्या नावाने ओळखले जात आहे. भारतातील केरळ राज्यात ५ वर्षापेक्षा कमी वयातील मुलांमध्ये तो आढळून येत आहे. आतापर्यंत त्याचे ८२ केसेस समोर आले आहेत. अशातच टोमॅटो फीवर पासून बचाव करण्यासाठी हे जाणून महत्वाचे आहे की, टोमॅटो फ्लू किंवा टोमॅटो फिव्हर नक्की काय आहे? त्याचा कैसा फैलाव होतो? त्याच्या लक्षणांपासून कशा प्रकारे बचाव करता येऊ शकते?
टोमॅटो फ्लू नक्की काय आहे?
लैंसेट स्टडीमध्ये असे सांगण्यात आले आहे की, टोमॅटो फ्लू ची लक्षण कोविड१९ वायरस समानच असतात. परंतु तो वायरस SARS-CoV-2 च्या संबंधित नाही आहे. तो पूर्णपणे वेगळा आहे. टोमॅटो फ्लू मुलांमध्ये चिकनगुनिया किंवा डेंग्यु तापानंतर होऊ शकतो. या फ्लूचे नाव टोम्रटो फ्लू अशा कारणासाठी आहे की, यामध्ये संपूर्ण शरिरावर लाल आणि दुखणाऱ्या फोडी येतात. त्यांचा आकार टोमॅटो सारखा सुद्धा असू शकतो.
टोमॅटो फ्लू ची कोणाला होऊ शकतो?
मुलांमध्ये टोमॅटो फ्लू च्या संपर्कात आल्यानंतर धोका वाढतो. कारण या वयात वायरल संक्रमण अधिक वाढते. त्यामुळे डॉक्टरांनी इशारा दिला आहे की, पाच वर्षांहून कमी वय असलेल्या मुलांना तो होत आहे. विशेष रुपात टोमॅटो फ्लू अधिक संक्रमक असण्यासह तो जीवावर ही बेतू शकतो.
लक्षणं काय आहेत?
टोमॅटो फ्लू (Tomato Fever) झालेल्या मुलांमध्ये प्राथमिक लक्षणं चिकनगुनिया आणि डेंग्यू सारखी असतात. लक्षणांमध्ये खुप ताप येमे, चट्टे येणे, पायांना सूज, डिहाइड्रेशन. अन्य लक्षणे जसी शरिर दुखणे, ताप आणि थकवा सुद्धा येणे जी कोविड१९ च्या रुग्णांमध्ये सुद्धा दिसून आली होती. काही प्रकरणांमध्ये रुग्णांच्या त्वचेवर फोड्यांचा आकार खुप वाढू शकतो.
कारणं काय आहेत?
टोमॅटो फ्लूची विशेष कारणं जाणून घेण्यासाठी वैज्ञानिक सुद्धा अद्याप रिसर्ज करु शकतो. परंतु त्याला वायरल संक्रमणाचे ते एक रुप असल्याचे मानले जात आहे. काहींनी असे सुचवले की, हे डेंग्यू आणि चिकनगुनियाचा दुष्प्रभाव होऊ शकतो. वैज्ञानिकांच्या मते, याचा सोर्स एक वायरस आहे परंतु त्याबद्दल अधिक माहिती समोर आलेली नाही की, तो कोणत्या प्रकारच्या कारणावरुन फैलावत आहे किंवा कोणत्या वायरसशी संबंधित आहे.
हे देखील वाचा- अत्यंत वेदनादायक आणि अस्वस्थ असते टॉन्सिल्सची सूज, जाणून घ्या त्याची कारणे आणि उपाय
टोमॅटो फ्लूवर उपचार काय आहेत?
डॉक्टर्स टोमॅटो फ्लू पासून बचाव करण्यासाठी स्वच्छ रहावे असा सल्ला देतात. हा वायरस पाच वर्षापेक्षा कमी वयातील मुलांसाठी अधिक संवेदनशील मानला जातो. जर एखाद्या मुलाला वरती दिलेली काही लक्षणं दिसून येत असतील तर लवकरात लवकर डॉक्टरांना संपर्क साधा. ज्या लोकांना याचे संक्रमण झाले आहे की, त्यांना शरिरावर आलेल्या फोडी फोडण्यापासून किंवा त्यावर खाजवण्यापासून दूर रहावे. पाण्याचे अधिक सेवन करा. जर एखाद्यामध्ये ही लक्षण दिसत आहेत तर त्याचा अर्थ हा त्याला टोमॅटो फीवर झालाय असा होत नाही. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला जरुर घ्या.