दक्षिण भारतातील अनेक मंदिरे भारतीय स्थापत्य शैलीचे भव्य रुप सांगणारी आहेत. यापैकी अनेक मंदिरांना पौराणिक वारसा आहे. हजार वर्षाहून अधिक जुन्या असलेली ही मंदिरे आजही भक्कम आहेत आणि लाखो भाविक या मंदिरांना भेट देतात. त्यापैकीच एक मंदिर म्हणजे, अम्मापल्ली रामचंद्र स्वामी मंदिर. हे मंदिर त्याच्या अद्वितीय स्थापत्य शैलीसाठी देखील ओळखले जाते. मंदिर वेसारा आणि द्रविड शैलीचे मिश्रण आहे. हे राम मंदिर 13 व्या शतकात वेंगी राजांनी बांधले होते. परंतु यातील प्रभू रामचंद्रांची मूर्ती 1000 वर्षे जुनी आहे. अम्मापल्ली मंदिरात एक प्रचंड सात मजली गोपुरम होता. या गोपुरममुळेच मंदिराची लोकप्रियता वाढली आहे. हे अम्मापल्ली मंदिर टॉलिवूडमध्ये लोकप्रिय आहे. येथे शूट केलेला चित्रपट सुपरहिट होतो, अशी चित्रपट दिग्दर्शकांची धारणा आहे. त्यामुळे या मंदिराला सिनेमा मंदिरही म्हटले जाते. (Tollywood)
हैदराबादपासून 30 किमी अंतरावर असलेले अम्मापल्लीचे श्री रामचंद्र स्वामी मंदिर हे लोकप्रिय मंदिर आहे. या मंदिरात अनेकवेळा चित्रपटाचे शुटींग चालू असते. त्यामुळेच हे मंदिर हैद्राबादमधील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या पर्यटन स्थळांच्या यादीतही आहे. या मंदिरात आल्यावर मंदिराची स्थापत्यकला पाहून भक्त मोहीत होतात. शिवाय मंदिरातील श्रीरामांची चार फुटी मुर्ती ही कोदंडधारी आहे. शिवाय मंदिरात कायम शुटींग चालू असल्यानं, पर्यटकांना शुटींग बघण्याचीही हौस पर्यटक भागवू शकतात. हे मंदिर एका प्रचंड सात मजली गोपुरमनं सुशोभित केलेले आहे, त्याच्या प्रवेशद्वारावर भगवान विष्णूचे निद्रावस्थेतील विशाल मुर्ती कोरली असून ही विष्णु प्रतिमा बघण्यासाठीही भाविकांची गर्दी होते. या मंदिरातील ऐतिहासीक वारसा आणि त्यातील कलाकुसर पाहून मंदिराला 2010 मध्ये युनेस्को वारसा म्हणून मान्यता मिळाली आहे. (Tollywood)
श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांनी वनवासात येथे विश्रांती घेतल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच मंदिरातील श्रीरामांची मुर्ती ही कोदंडधारी आहे. त्यावरुन मंदिर कोदंड राम मंदिर म्हणूनही ओळखले जाते. मंदिराभोवती विशाल सभामंडप असलेले मुख्य मंदिर आहे. राम, सीता आणि लक्ष्मण आणि मकर थोरनाम यांच्या मूर्ती एकाच काळ्या खडकात सुंदर कोरलेल्या आहेत. अंजनेय स्वामींची मूर्ती श्री रामाच्या समोरील ध्वजस्तंभाजवळ आहे. फक्त मंदिरच नाही तर या मंदिराचा सर्व परिसर सुरेख आहे. येथील तलावाचा परिसर नारळाच्या झाडांनी भरलेला आहे. दरवर्षी श्री रामनवमी या मंदिरात अतिशय उत्साहाने साजरी केली जाते. हे मंदिर 250 एकर जागेवर पसरलेले आहे. येथील गल्ली गोपुरम 90 फूट आहे. या गोपुरमवरील शिलालेखात भगवान विष्णू, राम आणि दशावताराच्या प्रतिमा आहेत. हे मंदिर भगवान राम, सीता आणि लक्ष्मण यांना समर्पित आहे. मंदिरात हनुमानाची मुर्ती नाही. त्यामागे स्थानिक कारण सांगतात, हनुमाला भेटण्यापूर्वीच भगवान राम आणि लक्ष्मण या ठिकाणी पोहोचले होते, त्यामुळे गर्भगृहात हनुमाची मूर्ती नाही. श्रीरामाची मूर्ती 4 फुटांची असून अतिशय सुरेख आहे.(Tollywood)
मंदिराला रामायणकालीन वारसा आहे. रामायणातील अरण्य कांडात श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांनी 14 वर्षे वनात वास्तव्य केले. ते अयोध्येपासून सुरू झाले आणि उत्तर भारतापासून दक्षिणेपर्यंत जंगलात फिरले. दंडकारण्य नावाच्या या ठिकाणी ते पोहोचले. श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांनी येथे एक रात्र विश्रांती घेतल्याचे सांगितले जाते. हे स्थान श्री रामाच्या चरणांनी पवित्र झाल्याच्या आनंदात या मंदिराची उभारणी केली गेली. मंदिरात प्रमुख देवता म्हणून सीता मातेची पुजा केली जाते. त्यावरुन या शहराचे नाव अम्मापल्ली असे पडले आहे.
या मंदिराच्या कमानीमध्ये भगवान विष्णूचे 10 अवतार आहेत. या प्रकारचे दगडी कोरीव काम 11 व्या शतकातील आहे. भारतात अशा दोनच मूर्ती आहेत. अम्मापल्ली मंदिर आणि रायली-जगनमोहन मंदिर येथे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर कासवाचा अवतार लावण्यात आला आहे.(Tollywood)
=======
हे देखील वाचा : १३ वेळा हल्ले केल्यानंतरही मुघल-इंग्रजांना जिंकता आला नाही लोहागढ
=======
अम्मापल्ली राम मंदिराचे आणखी एक वैशिष्ट आहे. येथे 1000 हून अधिक चित्रपट आणि तेलुगु मालिकांचे चित्रण झाले आहे. मुरारी या सुपरहिट चित्रपटावरून या मंदिराला ‘मुरारी फिल्म मंदिर’ आणि ‘सिनेमा गुढी’ असे नाव देण्यात आले. परिस्थिती अशी आहे की, चित्रपटाचा एक छोटासा सीनही इथे रेकॉर्ड केला जातो, तो बॉक्स ऑफिसवर जबरदस्त हिट देतो, हा दिग्दर्शकांचा विश्वास आहे. याशिवाय या मंदिरात भाविक लाल कपड्यात गुंडाळून नारळही देवाला अर्पण करतात. देवाचा आशीर्वाद मिळतो, असे मानण्यात येते. मंदिरात श्री रामनवीचा उत्साह खूपच मोठ्या प्रमाणात साजरा होतो. मंदिर एका मोठ्या आणि सुस्थितीत असलेल्या बागेने वेढलेले आहे. त्याचाही वापर अनेक चित्रपटात करण्यात आला आहे. टॉलिवूडसाठी लकी म्हणून ओळखल्या जाणा-या या मंदिरात आता जास्तच गर्दी झाली आहे.
सई बने