जेव्हा तुम्ही एखादी रोड ट्रिप करता तेव्हा तुम्हाला टोल टॅक्स भरावा लागतो. अखेर तुम्हाला टोल भरल्याशिवाय तुम्हाला पुढे जायला दिले जात नाही. परंतु हे टोल टॅक्स (Toll tax) म्हणजे काय आणि ते का घेतले जातात, तसेच त्याच्या किंमती कशा पद्धतीने ठरवल्या जातात असे प्रश्न तुम्हाला कधी पडले आहेत का? तर आज आपण याबद्दलच अधिक जाणून घेणार आहोत. टोल टॅक्स कशा पद्धतीचे ठरवला जाण्यामागील नक्की प्रोसेस काय असते ते पाहूयात.
टोल टॅक्स म्हणजे काय?
टोल टॅक्सला सोप्प्या भाषेत बोलायचे झाल्यास त्याला टोल असे म्हटले जाते. हा एक प्रकारचा शुल्क असतो जो कोणत्याही वाहन चालकाला इंटरस्टेट एक्सप्रेस वे, नॅशनल किंवा स्टेट हायवे पार करताना द्यावा लागतो. याला हायवे टोल असे ही म्हटले जाते. याची संपूर्ण व्यवस्था ही नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) कडून केली जाते. दोन टोलच्या मध्ये ६० किमीचे अंतर असते.
टोल का वसूल केला जातो?
टोल टॅक्सचा वापर हा रस्त्यांची देखभाल आणि बांधणीसाठी केला जातो. या टॅक्समधील शुल्काच्या माध्यमातून हायवे आणि एक्सप्रेस वे तयार करण्याची योजना केली जाते आणि त्यांची देखरेख ही केली जाते.

कशा पद्धतीने ठरवला जातो टोल टॅक्स?
टोल टॅक्सचे शुल्क हा काही गोष्टींवर अवलंबून असतो. यामध्ये वाहन खरेदीची किंमत. इंजिनची क्षमता, लोकांच्या बसण्याची क्षमता यासारख्या गोष्टींचा समावेश असतो. या व्यतिरिक्त दोन हायवे मधील अंतर हे ६० किमी पेक्षा अधिक किंवा कमी असेल त्यानुसार टोलचा शुल्क ठरवला जातो. यंदाच्या वर्षात एप्रिल महिन्यात सरकारने टोल टॅक्सच्या दरात वाढ केली होती. त्यानुसार हलक्या वाहनांसाठी टॅक्समध्ये १० रुपये आणि अवजड वाहनांसाठी टोलमध्ये ६५ रुपयांची वाढ केली होती.
हे देखील वाचा- हवेत उडणारे हॉटेल, मॉल-जिमसह मिळणार ‘या’ सुविधा
रोड टॅक्स आणि टोल टॅक्स एकच आहे का?
जर तुमच्या मनात प्रश्न आला असेल की, रोड टॅक्स आणि टोल टॅक्स (Toll tax) हे एकच आहे की दोन्ही वेगवेगळे. तर या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. कारण रोड टॅक्स हा आरटीओ कडून वसूल केला जातो. जर तुम्ही एकाच राज्यात विविध रस्त्यांच्या मार्फत प्रवास करत असाल. पण टोल टक्स हा इंटर स्टेट हायवेचा वापर केल्यानंतर घेतला जातो.
FASTag म्हणजे काय?
NHAI ने तंत्रज्ञानाचा वापर करुन टोल टॅक्स अगदी कमी वेळात आणि सहज भरता यावा म्हणून फास्टॅगची सुविधा सुरु केली आहे. फास्टॅग हा तुम्हाला गाडीवर लावायचा असतो. जेणेकरुन जेव्हा तुम्ही टोलच्या येथे जाता तेव्हा तुमचा फास्टॅग स्कॅन करुन तुमचे टोलचे पैसे त्यामधून वसूल केले जातात. त्यानंतरच तुम्हाला टोलच्या पुढे जायला दिले जाते.