आज १९ डिसेंबर शुक्रवार. आज मार्गशीर्ष महिन्याची शेवटची अमावस्या असल्याने आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी देवीच्या मंदिरात जाऊन पूजा करणे लाभदायक ठरेल. आज काही राशींचे इन्कम वाढतील तर काही राशींना व्यापारात धनलाभ होईल. आजची तिथी अमावस्या असून, आजचे नक्षत्र ज्येष्ठा आहे. १९ डिसेंबर या दिवसाचा अमृतकाळ हा सकाळी ०८:२५ ते ०९:४८ असा असणार आहे तर, राहूकाळ ११:१० ते १२:३३ असा असेल. आजच्या दिवशी सुर्योदय हा सकाळी ०७:०३ मिनिटांनी झाला आहे, तर आज सूर्यास्ताची वेळ संध्याकाळी ०६:०२ मिनिटांची असेल. आज दिवस कोणत्या राशीसाठी कसा आहे, चला जाणून घेऊया.
मेष
राशीचक्रातील पहिली रास असलेल्या मेष या राशीबद्दल सांगायचे झाले तर आज चंद्र वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून अष्टम भावात असेल. आज आपणास सांसारिक बाबींचा विसर पडेल. गूढ, रहस्यमय विद्येची गोडी लागेल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळविण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. बोलण्यावर संयम ठेवा म्हणजे अनर्थ होणार नाही. हितशत्रूंचा त्रास होईल. आज शक्यतो नवीन कार्य सुरू करू नका.
वृषभ
आजचा दिवस वृषभ राशीच्या लोकांसाठी आनंदाचा असेल. आज तुमच्या घरात एखाद्या शुभ कार्यक्रमाची चर्चा होऊ शकते ज्यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्य उत्साहाने सहभागी होतील. आज तुम्हाला काही गुप्त स्त्रोतांकडून पैसे देखील मिळू शकतात ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. आज तुम्हाला नवीन घर, वाहन इत्यादी घ्यायचे असेल तर त्यासाठीही दिवस चांगला राहील.
मिथुन
मिथुन राशीच्या लोकांसाठी आवाज दिवस त्यांना त्यांचे कौशल्य सुधारण्यास अनुकूल ठरणारा आहे. आज या राशीच्या लोकांचे नेतृत्व कौशल्य सुधारण्यास उत्तम आहे. मात्र कामात काही अडचणी येतील, परंतु तुम्ही त्यांचा धैर्याने सामना कराल. तुम्ही नवीन व्यवसायाची योजना आखू शकता.
कर्क
कर्क राशीचे लोकं आज थोडे त्रासात असतील. तुम्ही तुमच्या शत्रूंच्या कारस्थानांना बळी पडू शकता. म्हणून, सावधगिरीने वागा. आज तुमचे शब्द काळजीपूर्वक निवडा.
सिंह
सिंह राशीच्या लोकांना आज त्यांच्या नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. ते त्यांच्या योजना वेळेवर पूर्ण करण्यात देखील यशस्वी होतील. घाईघाईने कामात उतरू नका, कारण घाईमुळे अडचणी येऊ शकतात.

कन्या
आजच्या दिवशी कन्या राशीच्या लोकांनी कोणत्याही कार्यात विचार पूर्वकच सहभागी व्हावे. बरोबरीच्या लोकांमध्ये वेळ चांगला जाईल. भावनात्मक संबंधातून हळवे व्हाल. आप्तेष्ट व मित्रांचा सहवास घडेल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल.
तूळ
आजचा दिवस तुमच्यासाठी खूप यश देणारा ठरेल. आज तुम्ही वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर थांबा कारण ही वेळ त्यासाठी योग्य नाही. आज तुम्हाला तुमच्या तब्येतीकडे थोडे लक्ष द्यावे लागेल अन्यथा भविष्यात आरोग्याच्या काही समस्या तुमच्यावर परिणाम करू शकतात. आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवा.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांना आज कामांना आणि आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. दिखावा करायला आवडणाऱ्या लोकांना टाळा. उधळपट्टीची खरेदी तुमचे मासिक बजेट खराब करू शकते. तुमची मूल्ये आणि तत्त्वे पाळा. स्वतःशी प्रामाणिक रहा.
धनु
या राशीच्या लोकांनी आवाज नकारात्मक विचारांवर मात करण्याचा प्रयत्न केला नाही तर तुम्हाला भावनिक त्रास होईल. मिथुन राशीची व्यक्ती तुमच्या आयुष्यात आनंद आणेल. सध्या वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये वचने देणे टाळले तर बरे होईल.
मकर
मकर राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी अनेक चांगल्या संधी मिळतील. त्यांच्याबद्दल जास्त विचार केल्याने चांगल्या संधी गमावल्या जाऊ शकतात. आज घरी व्यावसायिक क्रियाकलाप चांगल्या प्रकारे पुढे जातील. योग्य शब्द निवडल्याने संभाषणात गोंधळ टाळता येईल.
कुंभ
कुंभ राशीच्या लोकांना आज कामावर मोठ्या अडचणी येऊ शकतात. विमा आणि आर्थिक नियोजनात गुंतलेल्यांना दिवस खूप अनुकूल वाटेल. संपत्ती जमा करण्यासाठी हा एक चांगला दिवस आहे.
मीन
आजच्या दिवशी या राशीच्या लोकांसाठी घर किंवा रिअल इस्टेट खरेदी करण्यासाठी पैसे गुंतवणे चांगले असेल. त्यामुळे विश्वासाने गुंतवणूक करा. आज तुमच्या घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे. वैयक्तिक नातेसंबंध आणि कौटुंबिक परिस्थितीत राग टाळा.
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
