सातत्याने १५ वर्षांपासून टेलिव्हिजनवर चालणारा प्रसिद्ध शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (TMKOC) मधील कलाकारांना यामुळे एक वेगळीच ओळख मिळाली. यापैकीच एक कलाकार जेठालाल म्हणजेच दिलीप जोशी ज्यांचे आज ही खुप लोक चाहते आहेत. तारक मेहता मध्ये ते मुख्य भुमिकेत दिसून येतात. जेव्हापासून हा शो सुरु झाला आहे तेव्हापासून ते या शो सोबत जोडले गेले आहेत. त्यांचा कॉमिक अंदाज, त्यांची लहान दाढी, बबीता जी सोबतचे फ्लर्ट या सर्वच गोष्टी त्यांच्याबद्दलच्या आवडतात.
दिलीप जोशी या शो चे सर्वाधिक पॉप्युलर आणि हायएस्ट पेड कलाकार आहे. परंतु तु्म्हाला माहितेय का मालिकेच्या सुरुवातीला या भुमिकेसाठी दिलीप जोशी ही त्यांची पहिली पसंद नव्हती. खरंतर ही भुमिका एका दुसऱ्याच कलाकाराला ऑफर करण्यात आली होती. पण त्या कलाकाराने त्यासाठी नकार दिला होता. त्यानंतर ही भुमिका दिलीप जोशी यांना मिळाली. ते गेल्या १५ वर्षांपासून याच भुमिकेत दिसून येत आहेत.
रिपोर्ट्स नुसार दिलीप जोशी यांच्या आधी जेठालालच्या भुमिकेसाठी आधी राजपाल यादव याला विचारण्यात आले होते. राजपाल सुद्धा प्रेक्षकांना गेल्या काही वर्षांपासून हसवत आहे. सिनेमांत त्याची कॉमेडी भुमिका सर्वांच्या पसंदीस पडते. आज दिलीप जोशी यांच्याकडे कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. त्यांची प्रसिद्धी हेच त्यांच्यासाठी सर्वकाही आहे. तारक मेहता शो सुरु होण्यापूर्वी जवळजवळ एक-दीड वर्ष त्यांच्याकडे काहीच काम नव्हते. ते बेरोजगार होते. परंतु या शो मुळे ते मनोरंजनाच्या क्षेत्रातील आता सर्वांचे चाहते झाले आहेत.(TMKOC)
हेही वाचा- एकेकाळी टुथब्रश बनवणारा ‘हा’ दिग्दर्शक आज सिनेमावर खर्च करतो १०० कोटी
दिलीप जोशीने १९८९ मध्ये मैने प्यार किया मधून बॉलिवूड पासून आपल्या करियरची सुरुवात केली होती. त्यांनी या सिनेमात हाउस हेल्पची भुमिका साकारली होती. मैने प्यार किया नंतर तो वन २ का ४, हम आपके है कौन आणि फिर भी दिल है हिंदुस्तानीसह काही सिनेमांमध्ये आपल्या अभिनय केला होता. दिलीप जोशी केवळ एकच कलाकार आहेत जे गेल्या १५ वर्षांपासून या शो मध्ये काम करत आहेत. या व्यतिरिक्त अन्य कलाकारांनी या शो ला रामराम ठोकला आहे. अशातच तारक मेहता का उल्टा चश्मा मधील दयाबेन पुन्हा कधी येणार याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.