Home » TMKOC मध्ये काम करण्यापेक्षा आत्महत्या करणे उत्तम, असे का म्हणाली ही अभिनेत्री?

TMKOC मध्ये काम करण्यापेक्षा आत्महत्या करणे उत्तम, असे का म्हणाली ही अभिनेत्री?

by Team Gajawaja
0 comment
TMKOC
Share

प्रेक्षकांना खळखळून हसवणारा सिटकॉम टीवी शो तारक मेहता का उल्टा चश्मा गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. शो मध्ये रोशन भाभीच्या रोलमध्ये काम केलेली अभिनेत्री जेनिफर मिस्रीने प्रोड्युसर असित मोदी यांनी गैरवर्तवणूक केल्याचा आरोप लावला आहे. हे प्रकरण अद्याप शांत झालेले नाही. कारण या शो मध्ये काम केलेली आणखी एका अभिनेत्रीने गंभीर आरोप लावले आहेत.(TMKOC)

ही अभिनेत्री दुसरी कोणी नव्हे तर मोनिका भदौरिया आहे. तिने तारक मेहता का उल्टा चश्मा मध्ये खुप काळ काम केले. त्यात तिने बावरीची भुमिका साकारली होती. जी बागाची प्रेयसी दाखवली गेलीय. जेनिफर नंतर मोनिकाने सुद्धा या शो चे प्रोड्युसर असित मोदी यांच्यावर त्यांनी तिचे पेमेंट रोखण्यासह टॉर्चर केल्याचा आरोप लावला आहे.

मोनिका भदौरियाने तारक मेहता शो ची तुलना आत्महत्या केल्यासारखेच असल्याचे म्हटले आहे. ईटाइम्स सोबत बातचीत करताना तिने असे म्हटले की, शो मध्ये खुप तिला टॉर्चर केले गेले. याच कारणास्तव तिने असे म्हटले की, या शो मध्ये काम करण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी.

TMKOC
TMKOC

मोनिकाने असा दावा केलाय की, तिला मानसिक खुप त्रास दिला गेला. तिच्यावर ते ओरडायचे, तिच्यासोबत ही गैरवर्तवणूक केली जायची. मोनिकाने असे म्हटले की, सोहेलने तिला म्हटले होते की, तिला पैसे मिळत आहेत. त्यामुळे जे सांगितले जाईल ते करावेच लागेल. सोहल हा तारक मेहताचा उल्टा चश्माचा एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहे.

मोनिका भदौरिया उर्फ बावरी हिला शो मध्ये खुप पसंद केले गेले. २०१३ पासून ती या शो मध्ये काम करतेय. काही वर्ष या शो मध्ये काम केल्यानंतर तिने तो सोडला. आता तिच्या जागी अभिनेत्री नविना वाडेकर हिला घेण्यात आले आहे. नविना ही बावरीची आता भुमिका साकारत आहे. नविनाने याच वर्षात जानेवारीत शो मध्ये एन्ट्री केली आहे. (TMKOC)

हेही वाचा- तारक मेहतासाठी जेठालालच्या भुमिकेसाठी दिलीप जोशी नव्हे तर हा बडा कलाकार होता पहिली पसंद

या दोघांव्यतिरिक्त आता तारक मेहता मध्ये रिपोर्टरच्या भुमिकेत दिसलेली प्रिया अहुजा राजदा हिने सुद्धा त्या शो बद्दल उघडपणे भाष्य केले आहे. तिने असे म्हटले की, शो मध्ये तिला अनफेअर ट्रिट केले जायचे. त्यानंतर मला काढून टाकले गेले. प्रियाने असे सुद्धा म्हटले की, यामधील कलाकारांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. या व्यतिरिक्त असित मोदी तिला तुला काम करायची काय गरज तुझा नवरा मालव आहे ना. तो करेल सर्वकाही. मालव हा त्या शो चा १४ वर्ष डायरेक्टर होता.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.