१० एप्रिल १९१२ ही तारीख, कोणीही स्वप्नात विचार केला नसेल की, जी टाइटानिक (Titanic)ब्रिटेनच्या साउथहैंपटन बंदरावरून निघाली होती ती आता कधीच परतणार नव्हती. ब्रिटेनचे हे जहाज टायटानिक चार दिवसानंतर म्हणजेच १४-१५ च्या मध्यरात्री कायमचे उत्तर अटलांटिक महासागरात बुडाले होते. नुकत्याच याच्या अखेरच्या प्रवासाला १११ वर्ष पूर्म झाली. याच पार्श्वभूमीवर आपण टाइटानिक संदर्भातील असे काही फॅक्ट्स पाहणार आहोत जे १९९७ मध्ये आलेल्या जेम्स कॅमरन यांच्या सिनेमांमध्ये सांगितले नव्हते.
१११ वर्षांपूर्वी अमेरिकेतील न्यूयॉर्क मध्ये जाणारे टाइटानिक जहावर क्रु मेंबर्ससह २२२४ प्रवासी होते. ते ४१ किमी प्रति तास वेगाने पुढे जात होते. रात्रीच्या वेळी सर्वजण गाढ झोपेत होते. तेव्हाच टाइटानिक एका हिमखंडाला धडकले आणि दोन तास ४० मिनिटांमध्ये ते पाण्याखाली बुडाले. या दुर्घटनेत १५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता. ही घटन इतिहासातील सर्वाधिक मोठ्या घटनेपैकी एक आहे. ज्या जहाजाबद्दल नेहमीच बोलले जायचे की, ते बुडणार नाही अखेरत तेच बुडाले.
-असे म्हटले जाते की, टाइटानिकला बुडवणाऱ्या हिमखंडाला तयार होण्यासाठी हजारो वर्ष लागली होती. तो दक्षिण-पश्चिम ग्रीनलँन्डच्या कासिमिटहून वेगळा झाला. १९१२ च्या सुरुवातीला दक्षिण दिशेला वाढत तो हळूहळू वितळत अटलांटिक महासागरात तरंगत आला होता.
-१४ एप्रिलला टाइटानिकला ६ वेगवेगळे हिमखंड असल्याची वॉर्निंग मिाली होती. मात्र तरीही क्रु मेंबर्सने या सर्व वॉर्निंग्सला धन्यवाद असे म्हणत त्याकडे दुर्लक्ष केले. म्हणजेच या हिमखंडांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. पण नंतर जे काही झाले ते सर्वांसमोर आलेच.
-टाइटानिक (Titanic) जेव्हा इंग्लंडहून रवाना झाले तेव्हा त्यामध्ये १३ हनीमूनसाठी आलेले कपल्स सुद्धा होते. यामध्येच ४७ वर्षीय अभिनेते जॅकब एस्टोर आणि त्यांची १८ वर्षाची पत्नी मेडेलीन सुद्धा होती. मेडेलीन लाइफ बोटमध्ये चढली पण जॅकब याचा मृत्यू झाला.
-जे टाइटानिक बुडाल्याने १५०० हून अधिक लोकांचा बळी गेला त्यात तीन कुत्रे सुद्धा होते. पण ते बचावले. असे एकूण १२ कुत्रे त्यावर होते. बचावलेले कुत्रे हे आपल्या श्रीमंत मालकांसह लाइफ बोटमध्ये चढले होते,
-टाइटानिक बुडण्यासाठी केवळ ३ तासांपेक्षा फार कमी वेळ लागला. दरम्यान काही वेळासाठी असे वाटत होते की, ते तरंगत आहे. हिमखंडाला धडकल्यानंतर त्याचे दोन तुकडे झाले होते. जे एकमेकांपासून ८०० मीटर दूरवर फेकले गेले.
-अटलांटिक महासागराचे पाणी त्यावेळी ऐवढे थंड झाले होते की, पाण्यात ज्यांनी उड्या मारल्या ते पूर्णपणे थंड पडले होते. त्यांना काही मिनिटांतच हदयविकारचा झटका आला होता. असे सांगितले जाते की, पाण्यात बुडालेल्या केवळ १३ लोकांनाच लाइफ स्पोर्ट बोटीवर जागा मिळाली होती.
हे देखील वाचा- बौद्ध भिक्षुकांवर असे केले जातात अंत्यसंस्कार
-टाइटानिक (Titanic) बुडाल्यानंतर त्यामधील १५०० पेक्षा अधिक जणांचा मृ्त्यू झाला. पण असे सांगितले जाते की, आजपर्यंत अटलांटिक महासागरात केवळ ३३० शवच मिळाले. म्हणजेच ४ पैकी ३ लोक कायमचे समुद्रात विलुप्त झाले. ३३० शवांपैकी १५० हे कॅनडात दफन करण्यात आले.
-टाइटानिकचे पार्ट्स शोधण्यास काही वर्ष लागली. याचा पहिला पार्ट हा १८८५ मध्ये सापडला. मात्र हळूहळू तो घराब होत होता. कारण त्यावर गंज लागला होता. पण आजही तो समुद्रात आहे. जेथे टाइटानिक बुडाले तेथूनच हा पार्ट १३ मैल दूरीवर आहे. यावरुन कळते की, टाइटानिकचे दोन तुकडे झाले होते.