इतिहासातील पानांवर लिहिल्या गेलेल्या मैसूर मधील टीपू सुल्तान (Tipu Sultan) यांचे नाव आता वादग्रस्ताच्या चर्चेत येऊ लागले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये टीपू सुल्तान यांचे नाव नेहमीच वादाच्या कारणामुळे सुद्धा समोर आले होते. आता बंगळुरु-मैसूर टीपू एक्सप्रेसचे नाव बदलून बंगळुरु-मैसूर वोडयार एक्सप्रेस करण्यात आले आहे. यावर हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी आणि कांग्रेस पक्षाने प्रश्न उपस्थितीत केले आहेत. असदुद्दीन यांनी असे म्हटले की, भारतीय जनता पक्ष, टीपू सुल्तानचे नाव मिटवण्याचा प्रयत्नच करत आहे. मात्र हे ऐवढे सोप्पे नव्हे.
गेल्या काही वर्षांमध्ये टीपू सुल्तानची जयंती साजरी करणे किंवा टीपू सुल्तानच्या स्वातंत्र्याच्या लढाईला शहीद मानणे किंवा मानू नये यावरुन खुप वाद झाला होता. काही वेळेस या वादाने पेट ही घेतला होता. तर जाणून घेऊयात टीपू सुल्तान संबंधित अधिक माहिती.
मैसूर म्हणजेच आजच्या कर्नाटकाचा एक हिस्सा. १६व्या-१७ व्या शतकात हे एक मोठे राज्य होते. हैदर अली येथील सेनापती आणि स्वघोषित शासक होते. वर्ष १७५० मध्ये हैदर अलीचा मुलगा टीपू सुल्तान यांचा जन्म झाला. इंग्रजांच्या विरोधात हैदर अली आणि टीपू सुल्तान यांनी मोठी लढाई केली. मैसूरने घोषणा केली होती की, ते ब्रिटिश साम्राज्याच्या पुढे कधीच झुकणार नाही. तीन युद्धांमध्ये मैसूरने इंग्रजांना घाबरवून सोडले. मात्र टीपू सुल्तानचा पराभव झाला.
टीपू सुल्तान याचे कौतुक करण्याचे कारण
इंग्रजांच्या विरोधात कठोर लढाई करणारे टीपू सुल्तान यांना मैसूरचे टायगर असे म्हटले जायचे टीपू सुल्तान फक्त १७ वर्षाचे असताना त्यांनी आंग्ल-मैसूर मध्ये सामील झाले होते. टीपू सुल्तान यांना सैन्य कौशल, कुशल रणनिती आणि सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी ओळखले जाते. टीपू सुल्तान यांनी व्यापार क्षेत्रात मैसूर आणि भारतातील विविध ठिकाणांसह परदेशात ही खुप काम केले आणि उद्योग ही काही पटींनी वाढवला. असे म्हटले जाते की, टीपू सुल्तान यांनी एकदा वाघाला आपल्या खंजीरने ठार केले होते. याच कारणामुळे त्यांनी मैसूर टाइगर ही उपमा दिली गेली होती.
टीपू सुल्तानांवर टीका का केली जाते?
दक्षिणपथींचे असे मानणे आहे की, टीपू सुल्तान (Tipu Sultan) यांनी आपल्या शानसकाळात हिंदू मंदिरांसह ख्रिश्चन धर्मियांच्या चर्चवर खुप हल्ले केले. या व्यतिरिक्त त्यांनी धर्मांतरण, दुसऱ्या धर्मातील महिलांवर बलात्कार आणि हत्या या सारख्या गोष्टींचा प्रोत्साहन दिले. भाजपातील काही नेता सुद्धा टीपू सुल्तानला हिंदू विरोधी आणि अत्याचारी असल्याचे मानतात. दरम्यान, काही लोक टीपू सुल्तानला धर्म निरपेक्ष आणि खुप उदार शासक ही मानतात. असे म्हटले जाते की, टीपू सुल्तान यांच्या सैन्यात हिंदू-मुस्लिम सुद्धा होते.
हे देखील वाचा- ‘लोकमान्य टिळकांना’ राजकीय पुढारी व्हायचं नव्हतं; वाचा काय होतं त्यांचं ध्येय…
इंग्रज आणि इंग्रज राजवटीत लढा का सुरु झाला?
मैसूर हे आधी एक हिंदू राज्य होते. नंतर ते हैदर अली यांनी आपल्या रणनिती आणि कौशल्याच्या जोरावर तेथे आपली सत्ता प्रस्थापित केली. फ्रांसीसी कंपन्यांमुळे हैदर अली यांचे निकटवर्तीय आणि मालाबर तटावर असलेल्या वर्चस्वामुळे इंग्रज त्रस्त होते. कसे ही करुन त्यांना मैसूर हवे होते. तरीही इंग्रज आधी आंग्ल-मैसूर मध्ये काहीच अधिक करु शकले नाहीत.
दुसऱ्या महायुद्धात मराठ्यांनी मैसूरवर हल्ला केला तेव्हा इंग्रजांकडून त्यांची मदत केली जात होती. याच कारणास्तव मैसूरने फ्रांसची मदत घेतली. याचा परिणाम असा झाला की, हैदर अलीने इंग्रजांच्या विरोधात मराठा आणि निजामांचे गठबंधन केले. १९८२ मध्ये हैदर अली यांचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला. दुसऱ्या महायुद्धानंतर मैंगलोरचा तह झाला आणि दोन्ही पक्षांनी एकमेकांची जिंकलेली क्षेत्र परत केली.
इंग्रजांच्या समोर झुकण्यास तयार नव्हता मैसूर
टीपू सुल्तान याने मैसूरची कमान सांभाळली आमि आपल्या वडिलांप्रमाणेच इंग्रजांच्या पुढे झुकण्यास नकार दिला. टीपूने सैन्याच्या ठेवणीवर खास लक्ष दिले आणि सैनिकांना उत्तम ट्रेनिंग दिली. टीपू सुल्तानने नौदलाला सुद्धा फार महत्व दिले. टीपू सुल्तानने भारतातील रॉकेटचे प्रणेते म्हणून ओळखले जाते. तिसऱ्या महायुद्धात टीपूने इंग्रजांच्या विरोधात खुप लढाई केली. यावेळी निजाम आणि मराठा हे इंग्रजांच्या बाजूने होते. त्याचा परिणाम असा झाला की, १७९२ मध्ये श्रीरंगपटनममध्ये तह झाला आणि मैसूरचा अर्धा हिस्सा त्याच्या हातातून निसटला.
चौथ्या महायुद्धाची स्थिती निर्माण झाली. १७९९ मध्ये जेव्हा युद्ध संपले तेव्हा टीपू सुल्तानचा पराभव झाला. या युद्धात मराठा आणि निजामांनी इंग्रजांची मदत केली होती. इंग्रजांनी टीपू सुल्तानचा सर्व खजिना जप्त केला. युद्धात टीपू सुल्तान शहीद झाला. दरम्यान, अगदी सहज राज्यांचा ताबा मिळवणाऱ्या इंग्रजांना मैसूर जिंकण्यासाठी तब्बल ३२ वर्ष लागली आणि टीपू सुल्तानचे नाव हे कायमचे अमर झाले.