महागाईच्या काळात पैशांची बचत कशी करावे हे सर्वांनाच माहिती असले पाहिजे. याची सवय जेवढ्या लवकर लागेल तेवढेच तुमच्यासाठी अधिक फायदेशीर असते. जर तुम्हाला तुमच्या मुलांना लहानपणापासूनच बचत करण्याची सवय लावायची असेल तर पुढील काही टीप्स तुमच्या कामी येऊ शकतात. मुलांना कशा पद्धतीने पैसे बचत करावे आणि वायफळ खर्च कसा टाळावा हे सुद्धा सांगावे.(Tips to save money)
-मुलांना पैशांची बचत करण्यास शिकवण्यासाठी तुम्ही प्रथम त्यांना इच्छा आणि गरजेचे मध्ये काय अंतर आहे हे समजावून सांगा. यामुळे मुलांना कळेल की, त्यांना कोणत्या गोष्टींची अधिक गरज आहे. त्याशिवाय आपले काम होणार नाही. जर त्यांना हे अंतर कळले तर समजून जा तुमचे अर्धे काम पूर्ण झाले आहे.
-मुलांना पैशांची किंमत करण्यास शिकवा. भले ही काम कोणतेही असो पैसे हे महत्वाचे असतात हे त्यांना समजावून सांगा. त्यांना मेहनत करुन पैसे कमावण्याची संधी द्या. काही पालक असा विचार करतात की, मुलांना यामुळे वाईट सवय लागू शकते. पण असे केल्याने तुमचे मुलं प्रॅक्टिकल विचार करु लागले आणि स्वत: च्या पायावर उभा राहिल.
-जर तुमचे मुलं पैशांची बचत करत असेल तर त्याला बक्षीस ही द्या. हे मुलांसाठी प्रोत्साहन देण्यासारखे ही असेल. यामुळे मुलाला असे वाटेल की, तो योग्य मार्गाने जात असून त्याला योग्य मार्गाने पैसे कमावत आहे. तसेच तो योग्य पद्धतीने पैसे मॅनेज करत आहे.
-लक्षात ठेवा मुलांकडून चुका होऊ शकतात. त्यामुळे त्यांना शिक्षा देऊ नका. यामुळे त्यांना नव्याने काही शिकण्याची भीती वाटेल. त्याचसोबत त्यांना दिलेले पैसे अथवा त्यांनी कमावलेले पैसे ते काय करतायत याची माहिती घेत रहा. यामुळे त्यांना वाईट सवयीपासून दूर राहता येईल.(Tips to save money)
हे देखील वाचा- तुमचे मुलं सातत्याने मोबाईलवर असते? दूर ठेवण्यासाठी ‘या’ टीप्स जरुर वापरा
-त्याचसोबत मुलांना त्यांच्या पैशांची बचत करण्यासाठी पिगी बँक द्या. त्यांना सांगा त्यामध्ये किती पैसे ते टाकू शकतात आणि त्यांनी पुढे जाऊन कोणती महत्वाची गोष्ट खरेदी केली पाहिजे. जर तुम्ही मुलांना महिन्याभरासाठी पॉकेट मनी देत असाल तर तुम्हाला कळले पाहिजे की, त्यामधील काही पैशांची बचत करुन ते पिगी बँकमध्ये टाकावे. हळूहळू पिकी बँक भरत असल्याचे पाहून मुलांना आनंद होईल.