Home » डाएटवेळी वारंवार गोड खाण्याचे मनं करते? असे करा क्रेविंग्सवर कंट्रोल

डाएटवेळी वारंवार गोड खाण्याचे मनं करते? असे करा क्रेविंग्सवर कंट्रोल

by Team Gajawaja
0 comment
Tips to control sugar cravings
Share

Tips to control sugar cravings : वजन कमी करणे किंवा फिट राहण्यासाठी बहुतांशजण डाएचा आधार घेतात. यामध्ये हेल्दी आणि बॅलेन्स डाएटची मदत घेतली जाते. पण काहीवेळेस डाएट फॉलो करताना गोड खाण्याचे मनं होते. याशिवाय वजन कमी करणे सोपे नाही. यासाठी डाएटवर कंट्रोल करणे आणि एक्सरसाइज करणे फार महत्वाचे आहे. पण यावेळी ताही गोष्टी खाण्याचे मनं करते. ज्या व्यक्तींना गोड खायला आवडते त्यांना डाएटवेळी मिठाई किंवा अन्य गोड पदार्थ खावेसे वाटते. पण गोड पदार्थांमुळे वजन वाढले जाऊ शकते. यामुळे मर्यादेत गोड पदार्थांचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. गोड पदार्थांपासून दूर रहावे असे म्हटले दाते. यामुळे लठ्ठपणा, मधुमेहासह अन्य समस्या उद्भवू शकतात. जाणून घेऊया डाएटवेळी वारंवार गोड खाण्याचे मनं करत असेल तर काय करावे याबद्दल सविस्तर…

हेल्दी ऑप्शन
गोड खाण्याची इच्छा झाल्यास हेल्दी ऑप्शन निवडू शकता. यावेळी डार्क चॉकलेट खाऊ शकता. सफरचंद, केळ, पपई या फळांमध्ये नॅच्युरल शुगरसह फायबर अशते. याशिवाय गुळ, मनुके आणि खजूरही खाऊ शकता. पण मर्यादेत किंवा कमी प्रमाणात याचे सेवन करावे.

कमी प्रमाणात खावे
पूर्णपणे साखर खाणे बंद केल्यास त्याचा आरोग्यावर उलट परिणामही होऊ शकतो. यामुळे आठवड्यातून एकदा चीट मील जरुर करावे, जेणेकरुन संतुलन राहिल.

Tips to control sugar cravings

Tips to control sugar cravings

=======================================================================================================

हेही वाचा  

उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांनी चुकूनही खाऊ नका या गोष्टी, बिघडेल आरोग्य

तोंडाला दुर्गंधी येण्यामागे असू शकतात ही कारणे, समस्येपासून अशी करा सुटका

=======================================================================================================

हळूहळू गोड खाणे कमी करा
वजन कमी करत असाल तर एकदम गोड खाणे टाळू नये. हळूहळू साखरेचे प्रमाण कमी करावे. अत्याधिक प्रमाणात साखर चहामध्ये मिक्स करुन पिण्याची सवय असेल तर हळूहळू ती कमी करा. (Tips to control sugar cravings)

हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करा
तणावामुळेही क्रेविंग वाढू शकतात. यामुळे तणाव कमी करण्यासाठी वॉक, रनिंग किंवा योगा करा. पुरेशी झोप घेण्यासह हेल्दी डाएट खा. दररोज गोड खाण्याचे मनं करत असेल तर हेल्दी ऑप्शन निवडा.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.