Home » Belly Fat : पोटाची चरबी कमी करण्यासाठी करा ‘हे’ रामबाण उपाय

Belly Fat : पोटाची चरबी कमी करण्यासाठी करा ‘हे’ रामबाण उपाय

by Jyotsna Kulkarni
0 comment
Weight Loss
Share

आजच्या काळात वाढणारे किंवा वाढत जाणारे वजन हे सगळ्यांच्याच टेन्शनचे मुख्य कारण बनले आहे. वाढते वजन हे अनेक आजारांचे कारण आहे. धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि असंतुलित आहारामुळे वजन वाढणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. हे वजन कमी करणे साधी आणि सोपी गोष्ट नाही. खासकरून पोट आणि साइड फॅट कमी करणे ही खूप कठीण गोष्ट आहे. ही समस्या केवळ आपल्या शरीराच्या आकर्षकतेला कमी करते असे नाही, तर आरोग्यासाठीही हानिकारक ठरते. वाढणाऱ्या वजनासोबतच वाढणारे पोट देखील सगळ्यांचीच डोकेदुखी ठरत आहे. वाढणारे पोट कमी करण्यासाठी तासंतास जिममध्ये घाम गाळून देखील अपेक्षित फरक दिसत नसेल. यासाठी आज आम्ही तुम्हाला पोट कमी करण्यासाठी काही छोटे आणि सहज करता येणारे उपाय सांगणार आहोत. जे करून तुम्ही काही दिवसातच नक्कीच पोट कमी कराल. (Weight Loss)

मेथीच्या पाण्याचे सेवन
पोटाची चरबी कमी करण्यासाठी सर्वाधिक उपयुक्त ठरते ती मेथीच्या दाण्यांची पावडर. सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी एक ग्लास पाण्यामध्ये मेथीच्या दाण्यांची पावडर मिक्स करा आणि सकाळी उठल्यानंतर काही न खाता नियमित या पाण्याचे सेवन करा. या पाण्याचे सेवन केल्याने काही दिवसांमध्येच पोटाची चरबी कमी होण्यास मदत होईल. (Belly Fat)

जिऱ्याचे पाणी
जिऱ्याचे पाणी मेटाबॉलिजम बुस्ट करण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी अतिशय उत्तम आहे. रात्री १ ग्लास पाण्यात जिरे भिजवून रात्रभर तसेच ठेवावे. सकाळी हेच पाणी कोमट करा आणि प्या. या जिऱ्याच्या पाण्यामुळे डायजेस्टिव्ह एंजाइम्स वाढतात आणि मेटाबॉलिजम वाढते ज्यामुळे पोटावर चरबी जमा होत नाही आणि असलेली चरबी वितळण्यास मदत मिळते. (Marathi)

भरपूर पाणी प्या
पाणी पिण्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात, पचन क्रिया सुधारते आणि पोट फुगणे कमी होते. जर तुम्हाला १० दिवसांत फरक पाहायचा असेल तर या दिवसांत 8 ते 10 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.

प्रथिनेयुक्त पदार्थांचे सेवन
प्रथिनेयुक्त पदार्थ जसे की चिकन, अंडी, कडधान्ये खाल्ल्याने स्नायूची निर्मिती होते, तसेच क्षती झालेले स्नायू मजबूत होण्यास मदत मिळते. त्याचप्रमाणे वाईट चरबी कमी होते. (Todays Marathi Headline)

Weight Loss

प्राणायाम आणि ध्यान करा
ताणतणावामुळे शरीरात कार्टिसॉल हार्मोनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे पोटावर चरबी साठते. रोज १० ते १५ मिनिटे प्राणायाम आणि ध्यान केल्यास मानसिक स्वास्थ्य सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत होते. (Social Updates)

आल्याचा आणि लिंबूचा चहा
आल्याचा चहा चयापचयाला चालना देतो आणि लिंबू शरीरातील चरबी विरघळविण्यास मदत करते. दिवसातून दोनदा हा चहा पिण्याचा प्रयत्न करा.

जेवणाची योग्य पद्धत
जेवण्याची योग्य पद्धत फॉलो करा. जेव्हा तोंडातील लाळेमध्ये कार्बोहायड्रेट जमा होते तेव्हा पचनक्रियेला सुरुवात होते. म्हणूनच जेवण पूर्णपणे चावून खाल्लं पाहिजे. जेवताना प्रत्येक घास तुम्ही चावत असाल तर त्याचे बारीक बारीक तुकडे होतात. यामुळे तुमची पचनक्रिया देखील सुधारते. तसेच सॅटिटी हार्मोनमध्ये वाढ होऊन तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटेल. (Top Marathi Headline)

​आलं खा
आलं सुकवून या सुक्या आल्याची पावडर तुमची वाढलेली अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होईल. पाण्यामध्ये सुक्या आल्याची पावडर मिक्स करा आणि हे पाणी उकळवा. हे पाणी थंड झाले की याचे सेवन करा. यामुळे चयापचय शक्ती अधिक वाढते तसेच अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी भरपूर मदत मिळू शकते. तसेच पोटाची चरबी कमी करण्यासाठी नियमित आहारामध्ये देखील तुम्ही आल्याचा समावेश करा. (Latest Marathi News)

सकाळी कोमट पाणी प्या
सकाळी कोमट पाणी पिण्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर टाकले जातात. यामध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि मध घालून घेतल्यास चरबी कमी होण्यास मदत होते. (Top Trending Headline)

क्रंच व्यायाम
क्रंचा हा पोटावरील चरबी कमी करण्यासाठी उत्तम व्यायाम प्रकार मानला जातो. यामध्ये तुम्हाला गुडघे वर उचलून गुडघ्याखालील पाय सरळ ठेवायचे असतात. त्यानंतर दोन्ही हात डोक्याच्या पाठीमागे नेऊन डोके, मान, आणि पाठीचा वरील भाग उचलायचा आणि पुन्हा खाली न्यायचा असतो. ही क्रिया पुन्हा पुन्हा करायची असते. यामुळे पोटावर ताण येऊन चरबी कमी व्हायला मदत होते. (Top Stories)

========

Hair Care : केस मूळांपासून होतील मजबूत! डाएटमध्ये आवर्जून करा या 5 व्हिटॅमिन्सचा समावेश

Skin Care : गुलाब पाण्यात मिक्स करा केवळ या 3 गोष्टी; आठवड्याभरात खुलेल सौंदर्य

========

​वेगाने चाला
वजन कमी करण्यासाठी नियमित व्यायाम हा खूपच महत्त्वाचा भाग आहे. नियमित व्यायाम, योग केल्यामुळे शरीर देखील निरोगी राहते. वजन कमी करण्यासाठी वेगाने चालणं देखील गरजेचे आहे. पोटांच्या कडा पकडून जवळपास ३० मिनिटे तुम्ही वेगाने चाला. यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास भरपूर मदत मिळू शकते. याव्यतिरिक्त तुम्ही योग आणि पायलेट्स देखील करू शकता. पोटाची चरबी कमी करण्यासाठी हे व्यायाम प्रकार अधिक फायदेशीर ठरू शकतात. (Social News)

(टीप : कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.