दिवाळीचा सण हा मौज मजेचा तर आहेच सोबतच हा सण आहे, चविष्ट अशा मेजवानीचा. दिवाळीमध्ये खाण्याची नुसती चंगळ असते. दिवाळीचा सण हा चांगलेचुंगले खाण्याचाच असतो असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. सतत तोंडामध्ये काहीतरी गोड जातच असते. यासोबतच तेलकट, तुपकट जोडीला असतेच. मात्र दिवाळीमध्ये हे सर्व खाताना आपण कोणीही कसलाच विचार करत नाही. डाएट वगैरे सर्व विसरून आपण या दिवसांमध्ये चमचमीत पदार्थांचा आस्वाद घेतो. (Diwali)
मात्र दिवाळी संपली की, मग आपल्याला आठवते आपले डाएट आणि आता वजन वाढणार याची चिंता. कारण दिवाळीत तोंडाला कोणताही लगाम न लावता आपण खातो. त्यामुळे जे खाल्ले त्यामुळे वजन वाढणार हे नक्कीच असते. मात्र आता दिवाळी झाल्यानंतर वाढणाऱ्या वजनाला आटोक्यात कसे करायचे हा प्रश्न सगळ्यांसमोर उभा असतो. याचेच उत्तर आम्ही आज तुम्हाला देणार आहोत. दिवाळीमध्ये सर्वच पदार्थांवर ताव मारल्यानंतर वजन कसे कमी करायचे याच्या काही सोपंय टिप्स देणार आहोत. (Weight Loss)
* तुमच्या दिवसाची सुरूवात लिंबू पाणी पिऊन करा. एक ग्लास गरम पाणी आणि अर्धा चमचा लिंबाचा रस रोज सकाळी घ्या. त्यामुळे तुमचं शरीर डिटॉक्स होतं. (Marathi News)
* वजन कमी करायचं असेल तर शरीरातलं प्रोटिन वाढवण्याची गरज असते. तुमच्या जेवणामध्ये अंडी, चिकन, डाळी, फळांचा समावेश करा. हे पदार्थ खाल्ल्यामुळे भूक नियंत्रणामध्ये येते आणि कॅलरीज् कमी होण्यासही मदत होते. या पदार्थांचा आहारात समावेश केल्यामुळे वजम कमी होण्यास मदत होते.
* फायबरला नॅचरल अँन्टिऑक्सिंडंट मानलं जातं. त्यामुळे फायबरयुक्त पदार्थांचा समावेश तुमच्या आहारात नक्की करा. पालेभाज्या, फळं, काकडी, यामध्ये भरपूर फायबर असते. (Todays Marathi Headline)
* थोड्याथोड्या वेळाने खात राहा सतत थोड्याथोड्या वेळात खात राहिल्याने आपल्या शरीरातील उर्जेची गरज भरुन निघते. पण हाताच्या ओंजळीत येईल एवढाच आहार दर 2 तासांनी घ्यायला हवा.
* दिवाळीमध्ये खालेल्या फराळानंतर आपल्या शरीराला डिटॉक्स होण्याची गरज आहे. त्यामुळे दररोज 8 ते 9 ग्लास पाणी प्या. पाण्यामुळे तुमच्या शरीरात साठलेले टॉक्सिन बाहेर काढले जातील. योग्य प्रणामात पाणी प्यायल्यामुळे पचन संस्थाही सुधारते. (Latest Marathi Headline)
* सकाळी उपाशी पोटी काही पदार्थ खाल्ल्याने किंवा प्यायल्याने त्याचा परिणाम शरीरावर लवकर दिसून येतो असे एक्सपर्ट्स सांगतात. रोज सकाळी रिकाम्या पोटी ग्लासभर पाण्यात एका लिंबाचा रस आणि चिमूटभर हळद मिसळून प्यावं. याचे परिणाम लवकरच दिसू लागतील.
* दिवाळीनंतर शरीराला परत तंदुरुस्त करण्यासाठी व्यायाम महत्वाचा आहे. दररोज ३० मिनिटं चालणं, जॉगिंग, किंवा योगा केल्याने शरीरात जमा झालेली चरबी कमी होण्यास मदत होते. व्यायामाने मेटाबॉलिझम वाढतो आणि आपल्याला एकदम ताजेतवाने वाटतं. वजन कमी करायचं असेल तर नियमित व्यायामाची सवय लावणं अत्यावश्यक आहे. (Top Marathi Headline)
* दिवाळीनंतर ऑफिसच्या किंवा इतर कामात कितीही बिझी झालात तरी त्यातूनही वेल काढून ३० मिनिट चाललात तर ते वजन नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त ठरू शकते. दररोज अर्धा तास चालावे, यामुळे शरीरातील विषारी पदार्थ आणि अतिरिक्त चरबी घामाद्वारे बाहेर पडते. सणासुदीच्या काळात नियमित चालण्याने तुमचे शरीर तंदुरुस्त राहतेच पण मिठाई खाण्याचा आनंदही घेता येतो. (Latest Marathi News)
* सणासुदीच्या काळात आहार संतुलित ठेवणे गरजेचे आहे. मिठाई खाल्ल्यानंतर हलकं जेवा, ज्यामुळे तुमच्या कॅलरीजचे प्रमाण संतुलित राहील. याशिवाय कोशिंबीर, फळे आणि हलका नाश्ता असा आहार असावा. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये मिळतील आणि मिठाईतून येणाऱ्या अतिरिक्त चरबीचा प्रभाव कमी होईल. (Top Trending Headline)
* सकाळी उठल्यावर ग्रीन टी आणि हर्बल टी चे सेवन करा. हे पेय वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहेत. ते तुमची चयापचय गती वाढवते आणि अँटिऑक्सिडंट्स प्रदान करते, जे चरबी जाळण्यास मदत करते.
=========
Health : दिवाळीत फराळ खाऊन त्रास होतोय मग करा झटपट ‘हे’ उपाय
=========
* पुरेशी झोप आणि तणावावर नियंत्रण ठेवल्याने वजन कमी होण्यास मदत होते. झोपेची कमतरता भूक संप्रेरकांवर परिणाम करते, ज्यामुळे तुम्हाला अधिक भूक लागते. तणावामुळे भावनिक खाणे आणि उच्च-कॅलरी पदार्थांची लालसा देखील वाढते. त्यामुळे कितीही उत्सवाचा रंग चढला असो, रात्रीची झोप महत्वाची आहे. (Top Stories)
* ग्रीन टीमध्ये अँटिऑक्सिडेंट असतात, जे चयापचय वाढवतात. विष आणि चरबी देखील कमी करते. सकाळी कोमट पाण्यात लिंबू पाणी, नारळ पाणी आणि जिरे पाणी पिऊन वजन कमी करू शकता. (Top Trending News)
* दालचिनी वजन कमी करण्यासाठी वापरली जाते. तुम्ही याचा वापर डिटॉक्स ड्रिंक्समध्येही करू शकता. दालचिनीचे पेय पिण्याने चयापचय मजबूत होते आणि चरबी कमी होण्यास मदत होते. पोटाची चरबी कमी करायची असेल तर दालचिनीचा वापर करा. एका भांड्यात कोमट पाणी घ्या आणि त्यात एक चमचा दालचिनी पावडर घाला. आता हे डिटॉक्स पेय रात्री झोपताना प्या. (Social News)
(टीप: वरील टिप्स सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणतेही उपाय करताना वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
