Tips for swimmer- जिममध्ये किंवा घरी वर्कआउट करण्यासोबत स्विमिंग करणे सुद्धा उत्तम व्यायाम प्रकारांमधील एक आहे. डॉक्टर सुद्धा आरोग्य तंदुरस्त राहण्यासाठी नेहमीच व्यायाम करण्याचा सल्ला देतात. दरम्यान, स्विमिंग करतेवेळी काही गोष्टींची काळजी घेणे सुद्धा फार महत्वाचे असते. खासकरुन खाल्ल्यानंतर स्विमिंग कधीच करु नये. यामुळे अपचन, अॅसिडिटीची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे स्विमिंग करण्यापूर्वी आणि केल्यानंतर काय खाल्ले पाहिजे यावर विशेषकरुन लक्ष द्यावे. तर जाणून घेऊयात स्विमिंगपूर्वी-नंतर काय खाल्ले पाहिजे.
व्यायामासोबत योग्य डाएट हे आपल्याला नेहमीच फिट ठेवते. परंतु जर आठवड्यातून तीन वेळा फक्त अर्ध्या तासासाठी जरी तुम्ही स्विमिंग केलात तरी त्याचा शरिराला फार मोठा फायदा होतो. कारण स्विमिंग केल्याने तुम्ही मानसिक रुपात फिट राहू शकता. या व्यतिरिक्त तुमच्या शरिरातील रक्त संचार हा अगदी सुरळीत सुरु राहतो. आणखी महत्वाचे म्हणजे नियमितपणे स्विमिंग केल्यास तुम्ही विविध आजारांपासून दूर राहू शकता.
स्विमिंगपूर्वी काय खाल्ले पाहिजे?
आरोग्य तज्ञांच्या मते स्विमिंग करण्यासाठी हलके पदार्थ खावेत. त्यासाठी ताजी फळं, नट्स, दही या सारख्या गोष्टी खाव्यात. तसेच एक कप कॉफी सुद्धा पिऊ शकता.
-केळ
केळ्यात पोटॅशिअमचे प्रमाण भरपुर असते. त्यामुळे स्विमिंग करताना शरिरातील उर्जा बूस्ट करण्यासाठी केळ हे मदत करेल. परंतु आपल्या शारिरीक क्षमतेनुसार केळ खा.
हे देखील वाचा- शरिरातील हाडांच्या बळकटीसाठी खा ‘या’ गोष्टी, रहाल तंदुरुस्त

-अंड
अंड्यात प्रोटीन हे भरपूर प्रमाणात असते. अंड खाल्ल्याने तुम्हाला इंस्टंट एनर्जी मिळते. त्यामुळे स्विमिंग करण्यासाठी मदत होईल. मात्र काही मर्यादेतच अंडी खा.
-कॉफी प्या
आरोग्य तज्ञांनुसार, स्विमिंग करण्यापूर्वी कॉफीचे सेवन करा. यामुळे थकवा दूर होतो. त्यामुळे एक कप कॉफी जरुर प्या.(Tips for swimmer)
स्विमिंग केल्यानंतर काय खाल्ले पाहिजे?
-चिकन खा
चिकन हा प्रोटीनचा मुख्य स्रोत आहे. त्यामुळे स्विमिंग केल्यानंतर तुम्ही चिकन खाऊ शकता. त्याचसोबत ब्राउन राइसचा सुद्धा समावेश करा.
हे देखील वाचा- सत्तरीतही राहा तंदुरुस्त नियमित करा हे 3 योगप्रकर; 3 नंबरचा आहे एकदम सोपा…
-भात आणि करी
स्विमिंग केल्यानंतर भात आणि करीचे सेवन करा किंवा डाळ, भाजी, सलाड यांचा सुद्धा तुम्ही तुमच्या जेवणात समावेश करु शकता.
दरम्यान, असा सल्ला दिला जातो की स्विमिंग करण्यापूर्वी आणि केल्यानंतर तळलेले पदार्थ, मसल्यातील पदार्थांचे सेवन करणे टाळावे. त्याचसोबत दारुचे अधिक सेवन करुन कधीच स्विमिंग करु नका.