रोज सकाळी उठल्यानंतर प्रत्येक व्यक्ती सर्वात आधी कोणते काम करते…तर ब्रश करण्याचे. आपले दात स्वच्छ झाले की दिवसाची फ्रेश सुरुवात झाल्याची भावना येते. आपण नेहमीच आपली स्वतःची काळजी घेतो, आपल्या घरातील लहान मोठ्या वस्तूंची काळजी घेत असतो. मात्र या सगळ्यामध्ये आपण आपल्या टूथब्रशला नेहमीच विसरतो किंवा त्याकडे दुर्लक्ष करतो. (tips for how to take care of our Toothbrush )
आपण आपल्या शरीराची, शरीरातील इतर अवयवांची जशी काळजी घेतो. तशी ब्रशची पर्यायाने दातांची घेतो का? नाही. ओरल हेल्थमध्ये टूथब्रशला सर्वात महत्वाचे सांगितले आहे. या भागात ब्रश अतिशय महत्वाची भूमिका बजावत असतो. असं म्हणतात की सर्वात जास्त दातांची ट्रीटमेंट महाग असते. मग जे दात स्वच्छ करण्यासाठी आपण ब्रश वापरतो त्याच्या स्वच्छतेबद्दल आपण जास्त मेहनत का घेत नाही?
ज्या ब्रशने आपण दात घासतो त्या ब्रशच्या स्वच्छतेबद्दल आपल्याला जास्त माहितीची नसते. त्यामुळे आपण आपला ब्रश खराब होईपर्यत वर्षानुवर्षे ब्रश वापरतो आणि ब्रश खराब झाला की, तो फेकून देतो. आज आपण या लेखातून याच टूथब्रशच्या स्वच्छतेबद्दल आणि काळजी घेण्याबद्दल जाणून घेऊ या.
सर्व प्रथम आपण टूथब्रश वापरण्यापूर्वी ब्रश स्वच्छ केला पाहिजे. ब्रश वापरल्यानंतर प्रत्येक जण तो साफ करतो. मात्र वापरण्यापूर्वी देखील ब्रश स्वच्छ करणे आवश्यक आहे. असे केल्यामुळे ब्रशवर जमा झालेले जीव जंतू निघून जाण्यास मदत होते.
ब्रश वापरून झाल्यानंतर आपल्या टूथब्रशला कोणत्याही बॅक्टेरिया, जंतूंपासून वाचवण्यासाठी त्याला दुसऱ्या टूथब्रशपासून दूर ठेवा. दोन ब्रश एकमेकांना चिकटता कामा नये. तसेच, आपला ब्रश कोणत्याही प्रकारे पृष्ठभागाला टेकणार नाही याची काळजी घेत जा. टूथब्रश नेहमी उभ्या स्थितीत म्हणजे अपराइट पोझिशनमध्ये ठेवा.
आजकाल बऱ्याच ब्रशसोबत एक कव्हर अथवा एक कॅप येते. ब्रश वापरून झाल्यानंतर ही कॅप आपण ब्रशला घालतो. मात्र या सवयीमुळे टूथब्रशमध्ये बॅक्टेरिया निर्माण होऊ शकतात. कारण हवेत ब्रश उघडा ठेवला तर तो कोरडा होऊ शकतो. मात्र आपण बाथरूममधील बॅक्टेरिया ब्रिस्टल्सला ब्रशला लागू नये म्हणून ब्रश झाकत असतो. मात्र आर्द्रता आणि अन्न कणांमुळे ब्रशमध्ये जंतू वाढण्याच्या शक्यता जास्त असतात. त्यामुळे ब्रश झाकून ठेऊ नये.
हे देखील वाचा : गरोदरपणात महिलांनी गाडीने प्रवास करताना सीट बेल्ट लावावा की नाही?
वेळच्या वेळेवर टूथब्रश बदलला गेला पाहिजे. आपला ब्रश खराब किंवा जुना झाल्यावर बदलू हा विचार सोडून ३/४ महिन्यांनी आपला ब्रश बदलला पाहिजे. ब्रश जितका जुना असेल तितके जास्त बॅक्टेरिया असतील. शिवाय तुम्ही जर एखाद्या आजारातून बरे झाले असाल तर त्यानंतर देखील ब्रश बदलला गेला पाहिजे.