Home » रात्रीच्या वेळी वारंवार तुम्ही उठता, ‘या’ गोष्टींकडे वेळीच लक्ष द्या

रात्रीच्या वेळी वारंवार तुम्ही उठता, ‘या’ गोष्टींकडे वेळीच लक्ष द्या

by Team Gajawaja
0 comment
Tips for better sleep
Share

Tips for better sleep– पुरेशी झोप ही आपल्या आरोग्यासाठी खुप महत्वाची असते. परंतु सध्याच्या बदलेल्या जीनवशैलीमुळे बहुतांश लोकांना शांत आणि उत्तम झोप लागत नाही. त्याचा आपल्या आरोग्यावर खुप वाईट परिणम होतो. या दिवसात लोकांना काही समस्यांचा सुद्धा सामना करावा लागतो. रात्रीच्या वेळी झोप पूर्ण न झाल्यास दिवसभर थकवा जाणवतो. कामची प्रोडक्टिव्हिटी सुद्धा कमी होते. अशातच तुम्ही हेल्थी जीनवशैली जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर जाणून घेऊयात रात्रीच्या वेळी वारंवार तुम्ही उठत असाल तर कोणत्या गोष्टींकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे त्याबद्दल अधिक.

उत्तम आणि शांत झोप घेतल्याने आपण ताजेतवाने राहतो. तसेच अधिक उर्जेने काम करतो आणि आपल्या दिवसभरात थकवा सुद्धा दूर होतो. तणाव सुद्धा दूर होतो. कारण झोपल्यानंतर आपल्याला आपले शरिर आराम करत असल्याचे वाटते कारण, संपूर्ण दिवसभरातील धावपळ केल्यानंतर आपले शरिराची हालचाल होत नाही. त्यामुळे तुम्ही दिवसाच्या सुरुवातीला फ्रेश दिसता. त्यामुळे पुरेशी झोप घेणे फार महत्वाचे आहे.

रिपोर्ट्सनुसार, झोपण्याची वेळ ही तुमच्या वयावर ही अवलंबुन आहे. नवजात बालकाने दररोज १४-१५ तासांची झोप घेतली पाहिजे. मुलांची १२ ते १४ तास, टीनएजर्स १०-१२ तास, अडल्ट ८-१० तास, ५०-६० वर्ष वयोगटातील लोक ७-८ तास आणि ६० वर्षावरील लोकांना ६-७ तास झोपले पाहिजे.

हे देखील वाचा- मासिक पाळी आल्यानंतर व्यायाम करावा का?

Tips for better sleep
Tips for better sleep

झोपण्यासंदर्भातील समस्या कोणत्या?
झोपण्यासंबंधित समस्या या चार प्रकारच्या असतात. त्यामध्ये इंसोमनिया, पॅरासोमनिया, हायपरसोमनिया आणि सर्केडियन रिदम डिसऑर्डरचा समावेश आहे. इंसोमनिया दरम्यान व्यक्तीला झोप येत नाही. तर पॅरासोमनिया वेळ व्यक्ती असामान्य वागतो. त्यामध्ये झोपते फिरणे किंवा बोलणे. हायपरसोमनिया मध्ये अधिक झोप येते. सर्केडियन रिदम डिसऑर्डर एक अशी स्थिती आहे ज्यामध्ये व्यक्ती रात्री जागतो पण सकाळी झोपतो. या समस्यांची विविध कारणं आहेत.

-खुप वेळ स्क्रिन पाहणे
तुम्हाला झोपेसंदर्भातील एखादी समस्या असो किंवा नाही पण उत्तम आणि पूर्ण झोप घेण्यासाठी लॅपटॉप, टेलिव्हिजन आणि मोबाईल फोन सारख्या उपकरणांपासून झोपण्याच्या वेळी दूर रहा. जेणेकरुन तुम्हाला उत्तम झोप येईल.(Tips for better sleep)

-जीनवशैलीत बदल
उत्तम झोप घेण्यासाठी आपल्या जीवनशैलीत बदल करणे फार आवश्यक आहे. वेळेवर खाणे, वेळेवर झोपणे. तसेच झोपण्यापूर्वी २-३ तास आधी जेवावे असा सल्ला दिला जातो. हेल्दी ड्रिंक्सचे सेवन करावे, पुस्तक वाचावीत किंवा झोपण्याची वेळ ठरवावी.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.