काही दिवसांपूर्वीच झालेल्या आशिया कप फायनलच्या मॅचमध्ये पाकिस्तानच्या तोंडातील विजयाचा घास पळवत भारताला विजय मिळवून देणारा तिलक वर्मा कोणाला माहित नाही असे शक्य नाही. तिलक वर्माने आशिया कपच्या अंतिम सामन्यात दमदार खेळ खेळात पाकिस्तानच्या हातातून सामना खेचून आणला आणि भारताला आशिया कप जिंकून देण्यामध्ये मोठी आणि महत्त्वाची भूमिका बजावली. तेव्हा तिलक वर्मा कमालीचा गाजला. त्याचे संपूर्ण देशातच काय तर विदेशात देखील मोठे कौतुक झाले. मात्र आता अचानक तिलक वर्मा पुन्हा एकदा सगळीकडे झळकत आहे. मात्र यावेळेस तिलक वर्मा चर्चेत येण्याचे कारण खूपच धक्कादायक आहे. (Tilak Varma)
नुकतेच एका मुलाखतीमध्ये तिलक वर्माने एका गंभीर आजाराशी सामना केल्याचे मोठे सत्य सांगितले आहे. एका मुलाखतीत तिलकने त्याचा धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. ‘ब्रेकफास्ट विथ चॅम्पियन्स’ या कार्यक्रमात गौरव कपूर यांच्याशी बोलताना २२ वर्षीय तिलक वर्माने सांगितले की, २०२२ मध्ये त्याला Rhabdomyolysis नावाचा दुर्धर आजार झाला होता. ‘रॅब्डोमायोलिसिस’ या आजारात स्नायू अचानकपणे तुटायला लागतात. (Marathi)
‘ब्रेकफास्ट ऑफ चॅम्पियन्स’ या शोच्या पॉडकास्टच्या नवीन भागात बोलताना तिलक वर्मा म्हणाला, “मी हे यापूर्वी कोणालाही सांगितले नव्हते. माझ्या पहिल्या आयपीएल सीझननंतर मला आरोग्याच्या काही समस्या जाणवायला लागल्या. मात्र मला कायम तंदुरुस्त राहायचे होते. पण मला रॅब्डोमायोलिसिसचे निदान झाले, ज्यामुळे तुमच्या स्नायूंचे तुकडे पडतात. त्यावेळी मी देशांतर्गत क्रिकेट आणि ‘ए’ मालिका खेळताना कसोटी संघात स्थान मिळवण्यावर लक्ष केंद्रित केले होते. (Marathi News)
त्यामुळेच मी सुट्टीच्या, आरामच्या दिवशी देखील मी जिममध्ये जायचो. मला जगातील सर्वात फिट खेळाडू तसेच फील्डर बनायचे होते, त्यामुळे मी माझ्या रिकव्हरीकडे जास्त लक्ष देत नव्हतो. मी ‘आइस बाथ’ करत होतो, पण माझ्या शरीराला पूर्णपणे बरे होण्यासाठी अजिबातच वेळ देत नव्हतो. विश्रांतीच्या दिवसातही मी स्वतःवर खूप जोर राहिलो. त्यामुळे माझ्या स्नायूंवर गरजेपेक्षा जास्त ताण पडला आणि ते तुटले, नसा खूप कडक झाल्या. याचा थेट किडनीवर परिणाम होतो. (Todays Marathi Headline)

यासोबतच तिलकने त्याच्या या आजाराचा एक अतिशय धक्कादायक अनुभव देखील सांगितला. तो म्हणाला, बांगलादेशमध्ये ‘ए सीरिज’ खेळत असताना मी शतक पूर्ण करण्यासाठी जोर लावला, तेव्हा माझ्या डोळ्यातून पाणी येऊ लागले. माझी बोटे अजिबात हलत नव्हती आणि सर्व काही इतके कडक झाले होते की, जणू ते दगडच आहेत. मला ‘रिटायर हर्ट’ व्हावे लागले आणि बोटे हलत नसल्यामुळे ग्लोव्हज कापावे लागले. यानंतर लगेच मला आकाश अंबानी यांचा फोन आला आणि त्यांनी बीसीसीआयशी बोलून मला खूप मदत केली. (Latest Marathi News)
तेव्हा डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले होते की, उपचारात जर काही तासांचा जरी विलंब झाला असता, तरी परिणाम गंभीर झाले असते. रुग्णालयात माझ्या नसा इतक्या कडक झाल्या होत्या की IV लाईनसाठी लावलेली सुई वारंवार तुटत होती. अनेक महिने उपचार आणि विश्रांती घेतल्यानंतर मी आता पूर्णपणे बरा झालो आहे. आज मी आकाश अंबानी, जय शहा आणि बीसीसीआयचे आभार मानतो त्यांनी मला या काळात खूपच मदत केली.” (Top Marathi Headline)
यानंतर तिलकने IPL 2023 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध ८४ धावांची शानदार नाबाद खेळी करत जोरदार पुनरागमन केले. आज तो भारताच्या टी२० संघाचा महत्त्वाचा भाग आहे. तिलक वर्मा हा गेल्या काही वर्षांपासून मुंबई इंडियन्स संघाचा एक महत्त्वाचा भाग राहिला आहे. मेगा लिलावापूर्वी संघाने त्याला कायम ठेवले होते. आयपीएलमधील त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळेच त्याला भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळाले. (Marathi Trending News)
रॅबडोमायोलिसिस आजार म्हणजे काय?
रॅबडोमायोलिसिस हा एक जीवघेणा आजार आहे. यामध्ये शरीरावर जास्त ताण आल्याने स्नायूंचा पूर्णपणे विद्राव होतो, म्हणजे स्नायू तुटून त्यातील घातक घटक रक्तात मिसळतात. सामान्य व्यायामात काही प्रमाणात स्नायूंवर ताण येणे स्वाभाविक असते. किंबहुना, त्यामुळे स्नायू मजबूत होतात. पण, जेव्हा व्यायामाचा ताण क्षमतेच्या पलीकडे जातो, तेव्हा स्नायूंचे तुकडे होऊ लागतात आणि रॅबडो तयार होतो. बहुतेक वेळा हे नव्याने व्यायाम सुरू करणार्या अतिउत्साही व्यक्तींमध्ये होते. (Top Marathi News)
रॅबडो किंवा रॅबडोमायोलिसिस लक्षणे
एका ठरावीक स्नायूगटात कमकुवतपणा जाणवतो.
व्यायाम केलेल्या भागात फुगवटा निर्माण होतो.
स्नायू आखडल्यासारख्या वेदना होतात. (Latest Marathi Headline)
व्यायामानंतर १ ते ३ दिवसांत युरीनचा रंग बदलतो. साधारणतः गडद तपकिरी युरीन दिसू लागते.
एखाद्या विशिष्ट स्नायूमध्ये अत्यंत वेदना जाणवू लागतात.
रॅबडोमायोलिसिस आजारावरील उपचार
सामान्य व्यायामानंतर शरीर दुखणे स्वाभाविक आहे. पण, फक्त एखाद्या स्नायूमध्ये अधिक वेदना होत असतील किंवा युरीनचा रंग बदलला असेल, स्नायूंमध्ये फुगवटा जाणवत असेल तर डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या. या रॅबडोमायोलिसिस आजाराच्या उपचारामध्ये प्रचंड प्रमाणात द्रवपदार्थ दिले जातात. जेणेकरून मूत्रपिंडातून विषारी द्रव्ये बाहेर पडतील. वेळेवर उपचार मिळाल्यास रॅबडो गंभीर होत नाही. त्यामुळे सुरुवातीची लक्षणे दुर्लक्षित करू नका. (Top Trending News)
=======
Weight Loss : दिवाळी झाली मात्र आता वजन वाढीची चिंता सतावते? मग फॉलो करा ‘या’ टिप्स
=======
जर तुम्हाला रॅबडोमायोलिसिस हा आजार झाला असेल तर तुमच्या शरीराला पूर्ण विश्रांती द्या, योग्य आहार घ्या आणि विश्रांतीनंतर डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हळूहळू पुन्हा व्यायाम सुरू करा. कोणताही नवा व्यायाम प्रकार हळूहळू आणि तीव्रता वाढवत सुरू करा. व्यायामाच्या आधी, दरम्यान आणि नंतर भरपूर पाणी प्या. उष्ण, दमट हवामानात व्यायाम टाळा. व्यायामाआधी क्रिएटिनयुक्त किंवा ऊर्जावर्धक पेयांचे अति सेवन करू नका. आपल्या शरीराची मर्यादा ओळखा. (Social News)
(टीप: वरील टिप्स सामान्य माहितीवर आधारित आहे. कोणतेही उपाय करताना वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
