Home » वाघाच्या अंगावर काळे पट्टे का असतात?

वाघाच्या अंगावर काळे पट्टे का असतात?

by Team Gajawaja
0 comment
Tigers
Share

प्राण्यांचे आकार, त्यांचा रंग हे सर्व जरी नैसर्गिक असले तरीही प्रत्येकाला स्वत:ची अशी वेगळी ओळख आहे. तर प्राण्यांचा आकार आणि त्यांचा रंग हे त्यांना इतरांपासून बचाव करण्यास फार मदत करतात. अशातच तुम्ही कधी विचार केला आहे का की, वाघाच्या (Tigers) अंगावर काळ्या रंगाचे पट्टे का असतात? याच बद्दल आपण अधिक जाणून घेणार आहोत.

लपून हल्ला करण्याची प्रवृत्ती
जेव्हा वाघ आपल्या शिकारवर हल्ला करतात तेव्हा ती गोष्ट कमी प्रकाशात करतात. एकतर पहाटे किंवा रात्रीच्या वेळी. तर सकाळच्या वेळेस शिकार करताना त्यांच्या अंगावरील रंग आणि जंगलातील गवत यामुळे ते अगदी सहज लपून राहू शकतात. त्याउलट रात्रीच्या वेळी सुद्धा वाघाचा रंग फार दिसत नाही फक्त त्यांचे डोळे चमकतात. अशातच त्यांना दोन्ही वेळेस शिकार करणे फार अवघड जात नाही.

काही खास गोष्टी असतात प्राण्यांमध्ये
सामान्यत: प्राण्यांमध्ये त्यांचे हात, पाय, डोळे किंवा शरिराची कातडी हे आपल्या साथीदाराला आकर्षित करण्यासाठी मदत करतात. अथवा त्यांना एखाद्यापासून लपण्यासाठी मदत करतात. शरिरावर असलेल्या या काही खास गोष्टींमुळे प्रत्येक प्राण्याला एकमेकांपासून बचाव करता येतो. मात्र वाघ हा आपली शिकार बरोबर ओळखतो.

Tigers
Tigers

वाघांना कोणापासूनच बचाव करण्याची गरज नाही
खाद्य शृंखलेत मुख्य शिकारी असल्याकारणास्तव वाघाला कोणत्याही जनावरापासून बचाव करण्याची गरज भासत नाही. ते स्वत: मांसाहारी जीव असून ते यशस्वीपणे आपली शिकार करण्यास सक्षम असतात.या व्यतिरिक्त त्यांना आपल्या आवडीच्या शिकाराच्या मर्यादित दृष्टीचा सुद्धा फायदा घेता येतो.

हे देखील वाचा- विशालकाय अजगराने चक्क ५४ वर्षीय महिलेला जीवंत गिळले

दुसऱ्या जनावरांचे करतात नुकसान
हरण किंवा अन्य जनावर सुद्धा सर्व रंग पाहू शकत नाहीत. त्यांना अंधारात स्पष्ट दिसते पण त्यांचे नुकसान सुद्धा होते. त्यांना वाघाचे डोळे पटकन ओळखता येत नाहीत. त्यामुळे त्यांचे आणि वाघांचे डोळे हे समान असल्याकारणास्तव वाघ (Tigers) अगदी हरणाची किंवाा त्यांच्यासारख्या अन्य प्राण्याची शिकार करु शकतात.

अंगावरील पट्टेच नव्हे तर त्वचा सुद्धा असते काळी
मजेशीर बाब अशी की, वाघाच्या अंगावर काळे पट्टे असतात त्यावर काळ्या रंगाचे केसच नव्हे तर त्यांच्या त्वचेचा तो भाग ही त्याच रंगाचा असतो. या व्यतिरिक्त पट्ट्यांचा पॅटर्न ही वेगळा असतो. वाघांच्या अंगांवरील पट्ट्यांवरुन वनविभागाचे अधिकारी सहज त्यांची ओळख करु शकतात.


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.