आजच्या काळात थायरॉइड होण्याचे प्रमाण कमालीचे वाढलेले दिसत आहे. पूर्वी हा आजार वयाच्या पन्नाशीनंतर व्हायचा. मात्र आता थायरॉइड २५ ते ३० या वयोगटातील लोकांना सर्रास होत आहे. शिवाय पूर्वी केवळ महिलांना होणार हा त्रास आता पुरुषांना देखील होण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने स्वतःकडे लक्ष देणे अत्यावश्यक झाले आहे. थायरॉईड ही एक महत्त्वाची ग्रंथी आहे, जी व्यक्तीच्या मानेच्या समोर असते. शरीराचा विकास आणि चयापचय नियंत्रित करण्यासाठी अनेक हार्मोन्स तयार करण्याव्यतिरिक्त मानवी शरीराच्या विविध चयापचय प्रक्रियांमध्ये ही ग्रंथी मदत करते. (Health)
पण जेव्हा हार्मोन्सच्या उत्पादनात असंतुलन होते तेव्हा थायरॉईड ग्रंथीला अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. थायरॉईड वाढण्याची अनेक कारणं आहेत, ज्यात आपली खराब जीवनशैली जसे की झोपेचा अभाव, रात्री उशिरा झोपणं, खाण्याच्या चुकीच्या सवयी, आयोडीनची कमतरता, ऑटोइम्यून विकार, जास्त ताण, अनुवंशिकता, चुकीच्या खाण्याच्या सवयी आणि हार्मोनल असंतुलन यांचा समावेश आहे. थायरॉइड कमी करण्यासाठी तुम्ही तुमची गोळी दररोज सकाळी घेत असालच मात्र त्यासोबतच जर तुम्ही अजून काही उपाय केले तर नक्कीच तुमचा थायरॉइड हा नियंत्रणात येऊन तुमचा त्रास कमी होऊ शकतो. (Health Care)
अश्वगंधा
अश्वगंधा या औषधामुळे, ताण आणि चिंता कमी करायला मदत होते. हे औषध थायरॉईड असंतुलनाशी संबंधित असतं. याशिवाय, ही आयुर्वेदिक औषधी वनस्पती कॉर्टिसोल नियंत्रित करण्यासाठी देखील मदत करू शकते. या तणाव संप्रेरकामुळे थायरॉईडच्या कार्यावर परिणाम होतो. अश्वगंधामुळे थायरॉईड ग्रंथी निरोगी राहण्यास मदत होते. कॅप्सूल, पावडर किंवा हर्बल टीच्या स्वरूपात अश्वगंधा समाविष्ट करू शकता. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. (Thyroid)
त्रिफळा
त्रिफळा हे आमलकी, बिभीताकी आणि हरिताकी या तीन फळांचं मिश्रण आहे. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून विषमुक्ती आणि पचन सुधारण्यासाठी त्रिफळा हा सर्वोत्तम आयुर्वेदिक उपायांपैकी एक आहे. यामुळे थायरॉईडच्या कार्यावर परिणाम होतो. निरोगी पचनसंस्था पोषक तत्वांचं शोषण करण्यास मदत करते आणि थायरॉईड नियंत्रित करण्यास मदत करते. (Marathi)
नट
बदाम, अक्रोड आणि ब्राझील नट्स थायरॉईडसाठी चांगले आहेत, कारण त्यात सेलेनियम आणि झिंक सारखी महत्त्वपूर्ण खनिजे असतात. नटांच्या सेवनाने थायरॉईडच्या समस्या नियंत्रणात ठेवता येतात. (Marathi NEws)
दही
दह्यामध्ये प्रोबायोटिक्स असतात, जे तुमच्या आतड्यांमधील निरोगी जीवाणूंना प्रोत्साहन देतात. हे थायरॉईडच्या समस्या कमी करण्यास मदत करते. थायरॉईडने त्रासलेल्या लोकांना दही आणि दूधाचे अधिक सेवन करायला हवे. दूध आणि दह्यातील कॅल्शियम, मिनरल्स, व्हिटॉमिन्स थायरॉईडने ग्रासलेल्यांना विशेषतः पुरुषांना स्वस्थ ठेवण्यास मदत करतात. (Top Marathi News)
आलं
थायरॉईडसाठी हा सर्वात सोपा घरगुती उपाय आहे कारण तो सहज उपलब्ध आहे. आल्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखी आवश्यक खनिजे असतात म्हणून ते थायरॉईड समस्यांचे प्राथमिक कारण असलेल्या सूज कमी करण्यास मदत करते. आले तुम्ही रोज सेवन करू शकता. (Todays Marathi Headline)

अॅपल सायडर व्हिनेगर
अॅपल सायडर व्हिनेगर हार्मोन्सचे संतुलित उत्पादन करण्यास मदत करते. हे चयापचय सुधारते आणि शरीराच्या वातावरणातील अल्कलीझ करण्यास मदत करते. अॅपल सायडर व्हिनेगर शरीरातील चरबीचे नियमन करण्यास, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास आणि पोषक तत्वांचे शोषण करण्यास मदत करते. दररोज सकाळी एक ग्लास पाण्यात दोन चमचे सफरचंद अॅपल व्हिनेगर प्या. (Latest Marathi Headline)
हळद
हळद ही एक शक्तिशाली आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. ज्यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. हे आयुर्वेदिक गुणधर्म संतुलन सुधारण्यास मदत करतात. यातलं कर्क्युमिन नावाचं संयुग जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करण्यास मदत करू शकतं. (Top Trending News)
धने
धन्यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. दररोज एका ग्लास पाण्यात २ चमचे संपूर्ण धणे घाला आणि रात्रभर भिजवा. ही धने घातलेले पाणी सकाळी पाण्यात पाच मिनिटे उकळवा आणि नंतर गाळून सेवन करा, फायदा होईल. (Top Stories)
========
Health : काळे गाजर आहेत आरोग्याची खाण, सेवनाने मिळतील ‘हे’ जबरदस्त फायदे
Abdominal Pain : सतत ओटीपोटात दुखणे धोक्याचे लक्षण? ‘या’ गंभीर आजारांचा संकेत असू शकतो
========
थायरॉईडमध्ये काय खाऊ नये
सोयाबीन किंवा डाळीमध्ये भरपूर प्रथिने असतात. थायरॉईडमध्ये प्रथिनांचे सेवन मर्यादित असावे. तुम्हाला हा आजार असल्यास आणि प्रक्रिया केलेले अन्न खाल्ल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे कोलेस्टेरॉलची पातळी आणखी वाढू शकते. कॉफी, चॉकलेट, ब्रोकोली आणि फुलकोबी खाणे टाळले पाहिजे. या पदार्थांमध्ये थायरॉईडला उत्तेजीत करणारे गुणधर्म असतात. ज्यामुळे हा आजार वाढू शकतो. ग्लूटेनमुळे थायरॉइडची समस्या वाढू शकते, त्यामुळे ग्लूटेनयुक्त पदार्थ कमी करावेत. थायरॉइडची समस्या नैसर्गिकरीत्या बरी होण्यासाठी वर नमूद केलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करा आणि टाळावे लागणारे पदार्थ कमी करा. तसेच, नियमित व्यायाम आणि तणावमुक्त जीवनशैलीचा अवलंब केल्यास थायरॉईडच्या समस्याही सुधारू शकतात. (Social News)
(टीप : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. कोणतेही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा)
Latest Marathi News | News in Marathi | Live news Updates in Marathi on Trending Topics
