आपण जर पाहिले तर असे अनेक आजार आहेत, जे दिसून येत नाही, ज्यांची लक्षणं दिसून येत नाही. मात्र ते असतात गंभीर. आजार अगदी छोटा असला तरी तो कोणत्यातरी मोठ्या अवयवावर परिणाम करतो आणि त्यानंतर एक भयानक आजार समोर येतो. असा एक छोटा मात्र तरीही अतिशय गंभीर आजार म्हणजे थायरॉइड. (Home Remedies for Thyroid)
तसे पाहिले तर म्हणायला अतिशय सोपा मात्र तरीही अतिशय अवघड असा हा आजार आहे. हा आजार हार्मोन्स संबंधित असून, तो संपूर्ण शरीरावर परिणाम करत असतो. हा आजार आपल्या शरीरातील अनेक मोठ्या गोष्टींमध्ये अडसर ठरतो. तसे पाहिले तर हा आजार महिलांमध्ये जास्त दिसून येतो. याचे अनेक गंभीर परिणाम आहेत. जाणून घ्या नक्की थायरॉइड म्हणजे काय? आणि थायरॉइड असणाऱ्या व्यक्तींनी काय खावे आणि काय खाऊ नये?
थायरॉइड म्हणजे काय?
थायरॉईड ही फुलपाखराच्या आकाराची एक ग्रंथी असते. जी आपल्या मानेच्या पुढच्या बाजूला, खालच्या बाजूला असते. थायरॉईड संप्रेरकांमध्ये असंतुलन तयार होते तेव्हा ते त्यांचे कार्य योग्य प्रकारे करू शकत नाही. याचा परिणाम आपल्या शरीरावर दिसून येतो. आयोडीनच्या कमतरतेमुळे थायरॉइड आजार होत असतो. यात वजनात बदल, उच्च कोलेस्टेरॉल, केसांची गळती आदी विविध समस्या उद्भवतात. (Home Remedies for Thyroid)
थायरॉइडचे प्रकार
थायरॉईडचे दोन प्रकार असतात. हायपरथायरॉईडीझम आणि हायपोथायरॉईडीझम. हायपरथायरॉईडीझममध्ये आपल्या शरीराची चयापचय क्रिया वाढते आणि आपले वजन झपाट्याने कमी होते. तर हायपोथायरॉईडीझममध्ये अगदी उलट होत चयापचय क्रिया कार्य करत नाही, आणि त्यामुळे आपले वजन वाढते. आता या थायरॉइडवर अनेक उपचार आहेत. मात्र हा आजार काही घरगुती उपाय करत आपण घरच्या घरी नियंत्रणात आणू शकतो.
सफरचंद
‘रोज एक सफरचंद खा आणि निरोगी राहा’ असे म्हटले जाते. रोज सफरचंद खाल्ल्याने अनेक आजार आपल्यापासून दूर राहतात. सफरचंद हे रक्तातील साखर राखण्यास मदत करते. शिवाय थायरॉईड ग्रंथीचे व्यवस्थापन करण्यास मदत होते. सोबतच कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करते आणि मधुमेह, लठ्ठपणा आणि रोग कमी करण्यास मदत करते. (Home Remedies for Thyroid)
बेरी
बेरीचे सेवन केल्याने थायरॉईड कमी होण्यास मदत होते. बेरीमध्ये भरपूर अँटी-ऑक्सिडंट्स असतात. हे थायरॉईड संप्रेरकांचे उत्पादन योग्यरित्या कार्य करण्यास मदत करतात. बेरी हे जीवनसत्त्वे आणि खनिजे याने समृध्द आहे. थायरॉईडमध्ये मधुमेह आणि वजन वाढणे सामान्य आहे. बेरींमुळे ते कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते.
विविध बिया
थायरॉइड रुग्णांनी विविध बियांचे सेवन करणे देखील लाभदायक असते. यात सूर्यफुलाच्या बिया, फ्लेक्स सीड्स, चिया सीड्स, भोपळ्याच्या बिया, तीळ, जवस आदींचा समावेश केला जाऊ शकतो.
======
हे देखील वाचा : गरोदरपणात महिलांनी गाडीने प्रवास करताना सीट बेल्ट लावावा की नाही?
======
नारळ
नारळाच्या पाण्यामुळे शरीराची चयापचय क्रिया सुरळीत होण्यास मदत होते. सोबतच नारळाचे तेल, नारळाची चटणी, कच्चे नारळ आदी देखील खाऊ शकतात. (Home Remedies for Thyroid)
हळदीचे दूध
हळद अतिशय गुणकारी आणि औषधी समजली जाते. थायरॉइडमध्ये देखील हळद उपयोगी आहे. रोज रात्री हळदीचे दूध पिणे देखील थायरॉइड नियंत्रण ठेवण्यास मदत करते.