Home » Thyroid : जगभरात वाढत आहेत थायरॉईड कॅन्सरचे रुग्ण ही आजारपणं लाइलाज आहे का ?

Thyroid : जगभरात वाढत आहेत थायरॉईड कॅन्सरचे रुग्ण ही आजारपणं लाइलाज आहे का ?

by Team Gajawaja
0 comment
Thyroid
Share

Thyroid : जगभरात थायरॉईड कॅन्सरची वाढती धोक्याची घंटा अलीकडच्या काही वर्षांत थायरॉईड कॅन्सरच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे आरोग्य क्षेत्रातील अहवालांमधून स्पष्ट दिसत आहे.  महिलांमध्ये हा कॅन्सर जास्त प्रमाणात आढळतो. जीवनशैली, ताणतणाव, हार्मोन्समधील बदल आणि रेडिएशन एक्सपोजर हे यामागील प्रमुख घटक मानले जात आहेत. तज्ञांचे म्हणणे आहे की, वाढते केसेस चिंताजनक असले तरी याचे निदान लवकर झाले तर उपचार अत्यंत प्रभावी ठरतात. (Thyroid)

थायरॉईड कॅन्सर लाइलाज आहे का? तज्ञांनी स्पष्ट केला मोठा गैरसमज ‘कॅन्सर’ हे नाव ऐकल्या ऐकल्या लोकांच्या मनात भीती निर्माण होते. परंतु तज्ज्ञ सांगतात की थायरॉईड कॅन्सर हा इतर कॅन्सरच्या तुलनेत कमी आक्रमक असतो आणि पूर्णपणे बरा होऊ शकतो. ‘लाइलाज’ असल्याचा गैरसमज चुकीचा आहे. योग्यवेळी निदान, शस्त्रक्रिया, रेडिओआयोडीन थेरपी आणि हार्मोन ट्रीटमेंट यांच्या साहाय्याने रुग्ण पूर्णपणे निरोगी आयुष्य जगू शकतो. अनेक रुग्णांना आयुष्यभर औषधे घ्यावी लागतात, पण ते पूर्णपणे सामान्य जीवन जगतात. (Thyroid)

Thyroid

Thyroid

लक्षणे वेळेवर ओळखणे अत्यंत महत्त्वाचे थायरॉईड कॅन्सरची प्राथमिक लक्षणे अनेकदा सामान्य आजारासारखी वाटतात आणि दुर्लक्ष केली जातात. गळ्यात गाठ दिसणे, आवाज बसणे, गिळताना त्रास होणे, मानेला किंवा जबड्याखाली दुखणे, वजनातील अनियमित बदल ही काही लक्षणे त्वरित तपासण्याची गरज दर्शवतात. अनेकवेळा लक्षणे न दिसता केवळ तपासण्यांमधून कॅन्सर आढळतो. त्यामुळे नियमित हेल्थ चेकअप्स ही एक महत्त्वाची गरज ठरते. (Thyroid)

उपचार पद्धतीत झालेले तांत्रिक बदल रुग्णांसाठी दिलासा देणारे आजच्या आधुनिक वैद्यकीय क्षेत्रात थायरॉईड कॅन्सरचे उपचार अधिक सुरक्षित आणि प्रभावी झाले आहेत. बहुतेक रुग्णांमध्ये शस्त्रक्रिया करून थायरॉईड ग्रंथी काढून टाकली जाते. त्यानंतर रेडिओआयोडीन थेरपीद्वारे शरीरातील उरलेल्या कॅन्सर पेशी नष्ट केल्या जातात. शस्त्रक्रियेनंतर हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी सुरू ठेवली जाते, ज्यामुळे रुग्णाची शारीरिक कार्ये व्यवस्थित चालू राहतात. नवीन तंत्रज्ञान आणि अनुभवी डॉक्टरांच्या टीममुळे उपचारांचे यश प्रमाण लक्षणीय वाढले आहे. (Thyroid)

======================

हे देखिल वाचा :

Pedicure : घरीच करा डीप क्लीनिंग! पेडिक्योरसारखा रिजल्ट मिळवण्यासाठी सोपी होम केअर टिप्स            

Lip Care in Winter : थंडीत ओठ फुटण्याच्या समस्येवर घरगुती उपाय, आठवड्याभरात दिसेल फरक

Skin Care : स्किनकेअर रूटीन करूनही मिळत नाही रिजल्ट? या चुका ठरतायत मोठी कारणं!

=======================                       

जीवनशैलीतील बदलांनीही मिळू शकतो मोठा फायदा थायरॉईड कॅन्सर टाळण्यासाठी काही आरोग्यदायी सवयींचा अवलंब करणे फायदेशीर ठरते. पोषक आहार, आयोडीनची योग्य मात्रा, स्ट्रेस मॅनेजमेंट, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम यामुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखले जाते. धूम्रपान, मद्यपान, प्रदूषण आणि अनावश्यक रेडिएशनपासून दूर राहणेही आवश्यक आहे. कॅन्सरचा धोका कमी करणे शक्य असले तरी पूर्णपणे रोखता येत नाही; मात्र सजगता आणि वेळेवर तपासणी यामुळे जीव वाचू शकतो. थायरॉईड कॅन्सरची भीती वाटण्यापेक्षा योग्य माहिती आणि तज्ञांचा सल्ला महत्त्वाचा आहे. ही आजारपणं लवकर ओळखली तर उपचार पूर्णपणे शक्य आहेत आणि रुग्ण निरोगी, दीर्घायुषी जीवन जगू शकतो.

Latest Marathi News | News in Marathi |  Live news Updates in Marathi on Trending Topics


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.